Budget 2021: पुण्याच्या मेट्रोबाबत ‘नो टेन्शन’ पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळत आहे आणि तो पुढेही मिळणार असल्याचे महामेट्रोकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. कामाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध होत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.  Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा   नागपूरमधील दुसरा टप्पा आणि नाशिकमधील पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची घोषणा करण्यात आली. परंतु, पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबद्दल कोणतीही घोषणा न झाल्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात २०२१-२२ साठी महामट्रोने २ हजार ४६१ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. देशातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध होईल. अन्य शहरांतील ज्या प्रकल्पांसाठी घोषणा झालेली नाही, त्यांनाही निधी मिळतोच आणि त्यानुसार पुणे मेट्रोलाही निधी उपलब्ध होईल.’’ पुण्यात पिंपरी- स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गावर ३१ किलोमीटर मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. ते सध्या ४८ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२४ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी पुणेकरांसाठी २०२१ हे वर्ष अतिशय सुखकारक ठरणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावेल, असा असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी हे बैठकीस उपस्थित होते. पाटील म्हणाले की, पुणे मेट्रोचे समाधानकारक चित्र असून, पाच मार्ग डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण करून त्यावर मेट्रो धावू शकेल. त्यातील एक मार्गावर मार्चपासून मेट्रो धावू शकेल. तसेच, कोथरूडमधील नळस्टॉप चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे कामही अतिशय वेगाने सुरू असून, जून २०२१ पर्यंत तो पूर्ण होईल, असा महामेट्रोचा दावा आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 1, 2021

Budget 2021: पुण्याच्या मेट्रोबाबत ‘नो टेन्शन’ पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळत आहे आणि तो पुढेही मिळणार असल्याचे महामेट्रोकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. कामाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध होत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.  Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा   नागपूरमधील दुसरा टप्पा आणि नाशिकमधील पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची घोषणा करण्यात आली. परंतु, पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबद्दल कोणतीही घोषणा न झाल्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात २०२१-२२ साठी महामट्रोने २ हजार ४६१ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. देशातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध होईल. अन्य शहरांतील ज्या प्रकल्पांसाठी घोषणा झालेली नाही, त्यांनाही निधी मिळतोच आणि त्यानुसार पुणे मेट्रोलाही निधी उपलब्ध होईल.’’ पुण्यात पिंपरी- स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गावर ३१ किलोमीटर मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. ते सध्या ४८ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२४ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी पुणेकरांसाठी २०२१ हे वर्ष अतिशय सुखकारक ठरणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावेल, असा असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी हे बैठकीस उपस्थित होते. पाटील म्हणाले की, पुणे मेट्रोचे समाधानकारक चित्र असून, पाच मार्ग डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण करून त्यावर मेट्रो धावू शकेल. त्यातील एक मार्गावर मार्चपासून मेट्रो धावू शकेल. तसेच, कोथरूडमधील नळस्टॉप चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे कामही अतिशय वेगाने सुरू असून, जून २०२१ पर्यंत तो पूर्ण होईल, असा महामेट्रोचा दावा आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39E6TSD

No comments:

Post a Comment