पहिल्या टप्प्यात 84 सहकारी संस्थांच्या निवडणुका ओरोस (सिंधुदुर्ग) - सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया येत्या 15 पासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 84 संस्थांच्या निवडणुका होत आहेत. कोरोनामुळे चारवेळा या संस्थांचा निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.  कोरोना संक्रमणामुळे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेल्या संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने दोन फेब्रुवारीला जाहीर केला होता. मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 775 सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. यात जिल्हा बॅंकेसह, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जिल्हा परिषद कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देवगड अर्बन बॅंक आदी महत्वाच्या सहकारी संस्थाचा समावेश आहे.  कोरोनामुळे राज्य शासनाने सहकारी संस्था निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. 18 मार्च 2020 ला आदेश काढत 17 जून 2020 पर्यंत प्रक्रिया आहे त्या टप्प्यात थांबविण्याचे आदेश दिले तर मुदत संपणाऱ्या संस्थाना मुदतवाढ दिली होती. चारदा अशी मुदतवाढ देत अखेर शासनाने दोन फेब्रुवारीला पुन्हा सहावा आदेश काढत स्थगिती सहकारी संस्था व मुदत संपणाऱ्या सहकारी संस्था निवडणुका घेण्याचे नव्याने आदेश दिले होते.  पहिल्या टप्प्यातील संस्था  जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील 78 सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यातील 5 संस्थाची निवडणूक अर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली होती. 40 संस्थाची प्रारूप मतदार यादी जाहीर करीत आक्षेप नोंदवून घेण्यास प्रारंभ झाला होता. पशु, दुग्ध व मत्स्यविकास विभाकडून 6 संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. शासन आदेशामुळे एकूण 84 संस्थाची पुढील निवडणूक प्रक्रिया थांबली होती. आता 15 फेब्रुवारीपासून या संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे; मात्र रद्द झालेल्या स्टेजपासून की पुन्हा नव्याने प्रक्रिया होणार याबाबत शासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

पहिल्या टप्प्यात 84 सहकारी संस्थांच्या निवडणुका ओरोस (सिंधुदुर्ग) - सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया येत्या 15 पासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 84 संस्थांच्या निवडणुका होत आहेत. कोरोनामुळे चारवेळा या संस्थांचा निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.  कोरोना संक्रमणामुळे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेल्या संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने दोन फेब्रुवारीला जाहीर केला होता. मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 775 सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. यात जिल्हा बॅंकेसह, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पतपेढी, जिल्हा परिषद कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देवगड अर्बन बॅंक आदी महत्वाच्या सहकारी संस्थाचा समावेश आहे.  कोरोनामुळे राज्य शासनाने सहकारी संस्था निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. 18 मार्च 2020 ला आदेश काढत 17 जून 2020 पर्यंत प्रक्रिया आहे त्या टप्प्यात थांबविण्याचे आदेश दिले तर मुदत संपणाऱ्या संस्थाना मुदतवाढ दिली होती. चारदा अशी मुदतवाढ देत अखेर शासनाने दोन फेब्रुवारीला पुन्हा सहावा आदेश काढत स्थगिती सहकारी संस्था व मुदत संपणाऱ्या सहकारी संस्था निवडणुका घेण्याचे नव्याने आदेश दिले होते.  पहिल्या टप्प्यातील संस्था  जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील 78 सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यातील 5 संस्थाची निवडणूक अर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली होती. 40 संस्थाची प्रारूप मतदार यादी जाहीर करीत आक्षेप नोंदवून घेण्यास प्रारंभ झाला होता. पशु, दुग्ध व मत्स्यविकास विभाकडून 6 संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. शासन आदेशामुळे एकूण 84 संस्थाची पुढील निवडणूक प्रक्रिया थांबली होती. आता 15 फेब्रुवारीपासून या संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे; मात्र रद्द झालेल्या स्टेजपासून की पुन्हा नव्याने प्रक्रिया होणार याबाबत शासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OqwTsG

No comments:

Post a Comment