"ते' नगरसेवक अखेर शिवबंधनात, वैभववाडीत भाजपला धक्‍का  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भारतीय जनता पक्षाच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. "मातोश्री'वर प्रवेश होताच येथील शिवसैनिकांनी बाजारपेठेत फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे वैभववाडीसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये तीन माजी नगराध्यक्ष आणि एका उपनगराध्यक्षाचा समावेश आहे.  वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्यातच नगरपंचायत आरक्षण सोडतीत अनेकांचे प्रभाग आरक्षित झाले असल्याने नव्या प्रभागाच्या शोधात ते होते. त्यातून पक्षांतर्गत धुसफूस वाढली होती. शहरातील काही कार्यकर्त्यांमध्ये दोनदा धक्काबुक्कीचे प्रकार झाले होते. काल (ता. 8) नगरपंचायतीच्या सात नगरसेवक आणि तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पक्षसदस्त्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे दिला होता. त्यापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार, या चर्चेला उधाण आले होते. आज सायंकाळी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.  सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे, संतोष पवार, स्वप्नील ईस्वलकर यांनी शिवबंधन बांधून घेतले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, मंगेश लोके उपस्थित होते.  वैभववाडी शहराचा अपेक्षित विकास होत नव्हता, म्हणून आपण विकास प्रक्रियेत सामील होत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने वैभववाडीत भाजपला जोरदार धक्का दिला. प्रवेश केलेले सर्व नगरसेवक स्थानिक असून, त्यांचा त्यांच्या प्रभागात चांगला प्रभाव आहे.  नळपाणी योजनेसाठी 14 कोटींचा निधी  प्रवेश केल्यावर नगरसेवकांनी शहरातील पाण्याचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. या वेळी नळपाणी योजनेसाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले. पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना वैभववाडीत जाऊन प्रश्‍न मार्गी लावण्याची सूचना केली.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

"ते' नगरसेवक अखेर शिवबंधनात, वैभववाडीत भाजपला धक्‍का  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भारतीय जनता पक्षाच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. "मातोश्री'वर प्रवेश होताच येथील शिवसैनिकांनी बाजारपेठेत फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे वैभववाडीसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये तीन माजी नगराध्यक्ष आणि एका उपनगराध्यक्षाचा समावेश आहे.  वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्यातच नगरपंचायत आरक्षण सोडतीत अनेकांचे प्रभाग आरक्षित झाले असल्याने नव्या प्रभागाच्या शोधात ते होते. त्यातून पक्षांतर्गत धुसफूस वाढली होती. शहरातील काही कार्यकर्त्यांमध्ये दोनदा धक्काबुक्कीचे प्रकार झाले होते. काल (ता. 8) नगरपंचायतीच्या सात नगरसेवक आणि तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पक्षसदस्त्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे दिला होता. त्यापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार, या चर्चेला उधाण आले होते. आज सायंकाळी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.  सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत "मातोश्री'वर माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे, संतोष पवार, स्वप्नील ईस्वलकर यांनी शिवबंधन बांधून घेतले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, मंगेश लोके उपस्थित होते.  वैभववाडी शहराचा अपेक्षित विकास होत नव्हता, म्हणून आपण विकास प्रक्रियेत सामील होत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने वैभववाडीत भाजपला जोरदार धक्का दिला. प्रवेश केलेले सर्व नगरसेवक स्थानिक असून, त्यांचा त्यांच्या प्रभागात चांगला प्रभाव आहे.  नळपाणी योजनेसाठी 14 कोटींचा निधी  प्रवेश केल्यावर नगरसेवकांनी शहरातील पाण्याचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. या वेळी नळपाणी योजनेसाठी 14 कोटी रुपयांचा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले. पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना वैभववाडीत जाऊन प्रश्‍न मार्गी लावण्याची सूचना केली.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2LH9fqU

No comments:

Post a Comment