हनुमंत गडाचे प्रवेशद्वार आले जगासमोर  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वर्षानुवर्ष जमिनीत दबलेल्या फुकेरी येथील हनुमंत गडाच्या प्रवेशद्‌वाराने मोकळा श्‍वास घेतला. कित्येक वर्षानंतर हा ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला. जुन्या तोफाही बाहेर काढण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या कार्यकर्त्यांनी हे ऐतिहासिक संचित बाहेर काढण्यासाठी हातभार लावला.  हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत बाहेर काढून प्रवेशद्‌वाराला मोकळा केले. या दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थितीत आहेत. या मोहिमेत संस्थेचे सदस्य सुनील राऊळ, सुधीर राऊळ, प्रकाश सावंत, रितेश राऊळ, रोहन सावंत, विवेक गावडे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. त्यांना श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व फुकेरी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.  जिल्ह्यातील किल्ले हनुमंत गड हा आता संवर्धनातून पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गडावर सतत भविष्यात संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून गडावर नव्याने निदर्शनास आलेली तोफ आणि गावातील तोफ या दोन तोफांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ तोफगाड्यांवर विराजमान करण्यात येणार असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सह्याद्रीच्या कार्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सिंधुदूर्ग विभागाकडून जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींना केले आहे.  दरम्यान, सह्याद्रीच्या गडांवरील कार्य पहाता हनुमंतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्‍यातील फुकेरी गावात आहे. सावंतवाडी तालुक्‍याच्या ठिकाणापासून 31 किलोमीटर अंतरावर फुकेरी गावातून गडावर जाता येते. गडावरील तोफांविषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी 5 तोफा होत्या. त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या. गावात प्रवेशकरतेवेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात. त्यातील एक तोफ जमिनीत गाडलेली होती. ती 30 जुलै 2018 ला बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफसंवर्धन करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले. या गावातून वर चढताना खिंड लागते. या खिंडीतील झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या. या तोफा गावकऱ्यांनी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथजयावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिंधुदुर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे.  सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अनेक कामे  सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे गडावर संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ याचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. गडावर जाणाऱ्या वाटा दुरुस्ती करणे, तटबंदी, बुरुजावरील झुडपे काढणे, दिशा दर्शक, सूचना फलक आणि वास्तू दर्शक लावणे अशी कामे नियमितपणे प्रतिष्ठानतर्फे सुरु आहेत. गडाच्या दुर्ग अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थांच्या मदतीने ही सुद्धा कार्य सुरु आहेत.  पाचव्या तोफेची शोध मोहीम  गडावर 26 आणि 27 डिसेंबरला झालेल्या मोहिमेदरम्यान गडावर येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य राजमार्गावर वाटांची दुरुस्ती करण्यात आली. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे तोफेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्यावेळी गडावरील 5 वी तोफ निदर्शनास आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आप्पा आईर यांच्या निदर्शनास तोफ आली, त्यांनी संस्थेचे सदस्य रामचंद्र आईर, न्हानू आईर यांना कळविले. त्यांनी 4 जानेवारीला रामचंद्र आईर, न्हानू आईर यांच्या नेतृत्वखाली स्थानिक ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य विठ्ठल आईर, संदीप आईर, सदाशिव आईर, सिद्धेश आईर, अप्पा आईर यांच्या मदतीने यांनी फुकेरी गावातून गडावर जाण्याजया दिंडी दरवाजाच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या ओहळात पूर्णपणे गाडलेली तोफ बाहेर काढली. या सर्व तोफांचे संवर्धन फुकेरी ग्रामस्थ व सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  इतिहास काय सांगतो  - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणचा प्राचिन इतिहास हा इ. स. पूर्व पहिल्या, दुसऱ्या काळापासून मोर्या यांच्या सत्तेपासून सुरू होतो. त्यानंतर सातवाहन, चालुक्‍य, राष्ट्रकृट, मोर्या शिलाहार अशा राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती केली होती. असा प्राचीन इतिहास हा कोकणाला लाभलेला आहे. त्यानंतरच्या काळात मध्ययुगीन आदिलशहा निजामशहा, मुघल, पोतुर्गीज, डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिला आहे.  - खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली तर काही नवीन किल्ले बांधले. त्यातील समुद्रातील राजधानी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. कोल्हापूरमार्गे, दोडामार्गमार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची निर्मिती केली असून किल्ल्‌यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्‍या आहेत. पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणीसाठी वापरात असावा. बांदा किल्ला हा जवळच असलेला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला ज्ञात आहेत.  - हनुमंत गडावरील फोंड दुसरा सावंत (इ. 1709 मध्ये) यांच्या काळात किल्ल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतांच्या काळात किल्ल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर इ. स. 1808 मध्ये निपानीकर निंबाळकर यांच्या ताब्यात किल्ला होता. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा 19 डिसेंबर 1938 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, अशी माहिती गडाविषयी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून देण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

हनुमंत गडाचे प्रवेशद्वार आले जगासमोर  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - वर्षानुवर्ष जमिनीत दबलेल्या फुकेरी येथील हनुमंत गडाच्या प्रवेशद्‌वाराने मोकळा श्‍वास घेतला. कित्येक वर्षानंतर हा ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला. जुन्या तोफाही बाहेर काढण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या कार्यकर्त्यांनी हे ऐतिहासिक संचित बाहेर काढण्यासाठी हातभार लावला.  हनुमंत गडावरील वर्षानुवर्ष जमिनीत गाडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारास सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागामार्फत बाहेर काढून प्रवेशद्‌वाराला मोकळा केले. या दरवाजाची कमान पडलेली असून देवड्या या सुस्थितीत आहेत. या मोहिमेत संस्थेचे सदस्य सुनील राऊळ, सुधीर राऊळ, प्रकाश सावंत, रितेश राऊळ, रोहन सावंत, विवेक गावडे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. त्यांना श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व फुकेरी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.  जिल्ह्यातील किल्ले हनुमंत गड हा आता संवर्धनातून पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गडावर सतत भविष्यात संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून गडावर नव्याने निदर्शनास आलेली तोफ आणि गावातील तोफ या दोन तोफांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ तोफगाड्यांवर विराजमान करण्यात येणार असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सह्याद्रीच्या कार्यात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सिंधुदूर्ग विभागाकडून जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींना केले आहे.  दरम्यान, सह्याद्रीच्या गडांवरील कार्य पहाता हनुमंतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्‍यातील फुकेरी गावात आहे. सावंतवाडी तालुक्‍याच्या ठिकाणापासून 31 किलोमीटर अंतरावर फुकेरी गावातून गडावर जाता येते. गडावरील तोफांविषयी माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मते गडावर पूर्वी 5 तोफा होत्या. त्या तोफा या घळीत ढकलून देण्यात आल्या होत्या. गावात प्रवेशकरतेवेळी आपल्याला सुरवातीलाच दोन तोफा दिसतात. त्यातील एक तोफ जमिनीत गाडलेली होती. ती 30 जुलै 2018 ला बाहेर काढण्यात आली. त्यानंतर तोफेचे महत्व पटवून देत तोफसंवर्धन करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीत पत्र देण्यात आले. या गावातून वर चढताना खिंड लागते. या खिंडीतील झाडीत सहा फुट लांबीच्या दोन तोफा पडलेल्या होत्या. या तोफा गावकऱ्यांनी गडाच्या पायथ्याकडे असलेल्या देवी माऊली मंदिराजवळ ठेवल्या आहेत. या तोफांना चौथजयावर बसविण्याची ना हरकत सह्याद्री सिंधुदुर्ग विभागाला ग्रामस्थांनी दिलेली आहे.  सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अनेक कामे  सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे गडावर संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ याचे सहकार्य नेहमीच लाभले आहे. गडावर जाणाऱ्या वाटा दुरुस्ती करणे, तटबंदी, बुरुजावरील झुडपे काढणे, दिशा दर्शक, सूचना फलक आणि वास्तू दर्शक लावणे अशी कामे नियमितपणे प्रतिष्ठानतर्फे सुरु आहेत. गडाच्या दुर्ग अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थांच्या मदतीने ही सुद्धा कार्य सुरु आहेत.  पाचव्या तोफेची शोध मोहीम  गडावर 26 आणि 27 डिसेंबरला झालेल्या मोहिमेदरम्यान गडावर येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य राजमार्गावर वाटांची दुरुस्ती करण्यात आली. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे तोफेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्यावेळी गडावरील 5 वी तोफ निदर्शनास आली नाही. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आप्पा आईर यांच्या निदर्शनास तोफ आली, त्यांनी संस्थेचे सदस्य रामचंद्र आईर, न्हानू आईर यांना कळविले. त्यांनी 4 जानेवारीला रामचंद्र आईर, न्हानू आईर यांच्या नेतृत्वखाली स्थानिक ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य विठ्ठल आईर, संदीप आईर, सदाशिव आईर, सिद्धेश आईर, अप्पा आईर यांच्या मदतीने यांनी फुकेरी गावातून गडावर जाण्याजया दिंडी दरवाजाच्या वाटेवर असलेल्या पाण्याच्या ओहळात पूर्णपणे गाडलेली तोफ बाहेर काढली. या सर्व तोफांचे संवर्धन फुकेरी ग्रामस्थ व सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  इतिहास काय सांगतो  - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणचा प्राचिन इतिहास हा इ. स. पूर्व पहिल्या, दुसऱ्या काळापासून मोर्या यांच्या सत्तेपासून सुरू होतो. त्यानंतर सातवाहन, चालुक्‍य, राष्ट्रकृट, मोर्या शिलाहार अशा राजवटी होऊन गेल्या. त्या काळात घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यांची निर्मिती केली होती. असा प्राचीन इतिहास हा कोकणाला लाभलेला आहे. त्यानंतरच्या काळात मध्ययुगीन आदिलशहा निजामशहा, मुघल, पोतुर्गीज, डच मराठे असा अंमल हा कोकणावर राहिला आहे.  - खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली तर काही नवीन किल्ले बांधले. त्यातील समुद्रातील राजधानी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. कोल्हापूरमार्गे, दोडामार्गमार्गे येथे जाणाऱ्या प्रमुख घाटमार्गवर हनुमंत गडाची निर्मिती केली असून किल्ल्‌यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्‍या आहेत. पूर्वी हा गड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणीसाठी वापरात असावा. बांदा किल्ला हा जवळच असलेला किल्ला असून या किल्ल्याच्या अनेक घडामोडी या इतिहासाला ज्ञात आहेत.  - हनुमंत गडावरील फोंड दुसरा सावंत (इ. 1709 मध्ये) यांच्या काळात किल्ल्याची बांधकाम आणि डागडुजी झाल्याची नोंद आहे. सावंतांच्या काळात किल्ल्यावर बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर इ. स. 1808 मध्ये निपानीकर निंबाळकर यांच्या ताब्यात किल्ला होता. शेवटी अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हनुमंत गड हा 19 डिसेंबर 1938 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, अशी माहिती गडाविषयी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून देण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rgGHDz

No comments:

Post a Comment