आजगाव अपघातप्रश्नी मायनिंग कंपनी धारेवर  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आजगाव-वाघबीळ येथे झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत तसेच दोन दुचाकीस्वाराना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातग्रस्त डंपरसहीत इतर दुचाकी ताब्यात घेतल्या असून पसार डंपर चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती वेंगुर्ले पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामस्थांची बैठक झाली असून यावेळी मायनिंग कंपनीला धारेवर धरले.  ही घटना काल (ता. 3) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी ते मळेवाड, आजगाव दिशेने वाहतूक करणाऱ्या (एम. एच. 07 सी 6306) डंपर चालकाने शिरोडा आजगाव - वाघबीळ वळणावर तीन दुचाकीना धडक दिली. यात एका दुचाकीवरील मधुकर शंकर रेवाडकर व माधुरी मधुकर रेवाडकर या दाम्पत्याचा मृत्यू झाला. इतर दोन दुचाकीस्वार शरद हरिश्‍चंद्र उगवेकर (रा. शिरोडा - केरवडा) व संजय नारायण कावले (रा. टांक) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यातील श्री. उगवेकर व श्री. कावले यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यातील श्री. उगवेकर यांची प्रकृती स्थिर असून श्री. कावले हे गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. व अपघातग्रस्त दुचाकींसह डंपर ताब्यात घेतला आहे. डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला असून या अपघातात एका दाम्पत्याच्या मृत्यूस हयगयीने कारणीभूत ठरल्या प्रकरणी तसेच इतर दोन दुचाकीस्वाराना गंभीर जखमी केल्याप्रकरणी पसार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रात्री येथील ग्रामस्थांनी या मार्गाने होणाऱ्या डंपर वाहतुकीवर रोष वाक्‍य करत मृत कुटुंबाला न्याय मिळावा, नुकसान भरपाई मिळावी, पोरके झालेल्या मुलांच्या पालन, पोषण व शिक्षणाची जबाबदारी स्विकारुन रेवाडकर कुटुंबाला मिळावा न्याय द्यावा अशी मागणी करत जोपर्यंत यावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आजगाव ग्रामस्थांची घेतला होता.  मायनिंग कंपनी धारेवर  ग्रामस्थांची येथील वेतोबा मंदिरात याबाबत तातडीची बैठक घेतली. यावेळी मायनिंग कंपनीला धारेवर धरले. हा अपघात वाहतूक व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळेच झाला असल्याने लवकरात लवकर न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा आक्रमक पवित्राही ग्रामस्थांनी घेतला. यावेळी आजगाव सरपंच सुप्रिया मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते मामा शिंदे, राजेश आजगावकर, प्रशांत काकतकर,ओंकार प्रभू, बाबू मेस्त्री, बाळा हळदणकर, अमित प्रभूआजगावकर यांच्यासह शेकडो आजगाव ग्रामस्थ उपस्थित होते.  रेवाडकर कुटुंबावर मोठा आघात  या अपघातामुळे आजगाव गावावर शोककळा पसरली होती. रेवाडकर दाम्पत्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुली, एक मुलगा पोरके झाले. यावेळी आजगाव ग्रामस्थ आक्रमक झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच दंगल विरोधी पथक, पोलिस यंत्रणा घटनास्थळी तैनात केली होती.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

आजगाव अपघातप्रश्नी मायनिंग कंपनी धारेवर  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आजगाव-वाघबीळ येथे झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत तसेच दोन दुचाकीस्वाराना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातग्रस्त डंपरसहीत इतर दुचाकी ताब्यात घेतल्या असून पसार डंपर चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती वेंगुर्ले पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामस्थांची बैठक झाली असून यावेळी मायनिंग कंपनीला धारेवर धरले.  ही घटना काल (ता. 3) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी ते मळेवाड, आजगाव दिशेने वाहतूक करणाऱ्या (एम. एच. 07 सी 6306) डंपर चालकाने शिरोडा आजगाव - वाघबीळ वळणावर तीन दुचाकीना धडक दिली. यात एका दुचाकीवरील मधुकर शंकर रेवाडकर व माधुरी मधुकर रेवाडकर या दाम्पत्याचा मृत्यू झाला. इतर दोन दुचाकीस्वार शरद हरिश्‍चंद्र उगवेकर (रा. शिरोडा - केरवडा) व संजय नारायण कावले (रा. टांक) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यातील श्री. उगवेकर व श्री. कावले यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यातील श्री. उगवेकर यांची प्रकृती स्थिर असून श्री. कावले हे गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. व अपघातग्रस्त दुचाकींसह डंपर ताब्यात घेतला आहे. डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला असून या अपघातात एका दाम्पत्याच्या मृत्यूस हयगयीने कारणीभूत ठरल्या प्रकरणी तसेच इतर दोन दुचाकीस्वाराना गंभीर जखमी केल्याप्रकरणी पसार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रात्री येथील ग्रामस्थांनी या मार्गाने होणाऱ्या डंपर वाहतुकीवर रोष वाक्‍य करत मृत कुटुंबाला न्याय मिळावा, नुकसान भरपाई मिळावी, पोरके झालेल्या मुलांच्या पालन, पोषण व शिक्षणाची जबाबदारी स्विकारुन रेवाडकर कुटुंबाला मिळावा न्याय द्यावा अशी मागणी करत जोपर्यंत यावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आजगाव ग्रामस्थांची घेतला होता.  मायनिंग कंपनी धारेवर  ग्रामस्थांची येथील वेतोबा मंदिरात याबाबत तातडीची बैठक घेतली. यावेळी मायनिंग कंपनीला धारेवर धरले. हा अपघात वाहतूक व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळेच झाला असल्याने लवकरात लवकर न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा आक्रमक पवित्राही ग्रामस्थांनी घेतला. यावेळी आजगाव सरपंच सुप्रिया मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते मामा शिंदे, राजेश आजगावकर, प्रशांत काकतकर,ओंकार प्रभू, बाबू मेस्त्री, बाळा हळदणकर, अमित प्रभूआजगावकर यांच्यासह शेकडो आजगाव ग्रामस्थ उपस्थित होते.  रेवाडकर कुटुंबावर मोठा आघात  या अपघातामुळे आजगाव गावावर शोककळा पसरली होती. रेवाडकर दाम्पत्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुली, एक मुलगा पोरके झाले. यावेळी आजगाव ग्रामस्थ आक्रमक झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच दंगल विरोधी पथक, पोलिस यंत्रणा घटनास्थळी तैनात केली होती.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36LmxtL

No comments:

Post a Comment