सावंतवाडीची ताकद दाखवणारी कारकीर्द सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी संस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात संघर्षाचा इतिहास आहे. असे असले तरी ही दोन राजांमधील लढाई होती. त्यांच्यामध्ये झालेला तह दोन मराठा राज्यकर्ते एकत्र यावे या मुद्‌द्‌यावर होता. शिवाय सावंतवाडी संस्थानच्या पराक्रमाचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ इतिहासात आहेत. सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत यांच्या कारकीर्दीत हा संघर्ष झाला. लखम सावंत यांची कारकीर्द पराक्रमाबरोबरच राज्याच्या स्थैर्य आणि सुबत्तेसाठी महत्त्वाची होती. या काळात सावंतवाडी संस्थानची ताकदही वाढली होती. तिच समजून घेण्याचा हा प्रयत्न...  ओटवणे येथे संस्थानची गादी स्थापन करणाऱ्या खेमसावंत यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र सोमसावंत हे गादीवर बसले. त्यांनी 1640-41 असा अवघा दीड वर्षे कारभार पाहिला. यानंतर त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू फोंड सावंत गादीवर आले. शांत, संयमी असलेल्या फोंड सावंत यांची कारकीर्द 1641 ते 1659 अशी राहिली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू लखम सावंत गादीवर आले. 1659 ते 1675 या दरम्यान त्यांनी सावंतवाडी संस्थानच्या विस्तारासाठी खूप मोठे काम केले. त्यांची कारकीर्द खूप संघर्षमय राहिली.  लखम सावंत हे शूर आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या जोडीला त्यांचे पुतणे खेम सावंत हेही होते. या दोघांनी मिळून खूप मोठा पराक्रम गाजवला. खेम सावंत यांच्याच कारकीर्दीत कुडाळ परगण्यावर असलेली कुडाळदेशस्थ प्रभूंची सत्ता पूर्णपणे जावून सावंतवाडी संस्थानचे वर्चस्व निर्माण झाले. लखम सावंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन. त्या काळात सावंतवाडी संस्थानकडे 12 हजार इतकी फौज होती. पायदळ आणि स्वतंत्र घोडदल याचाही संस्थानच्या सैन्यदलात समावेश होता. त्याही काळात संस्थानकडे स्वतःचे आरमार होते हे विशेष. संस्थानच्या हद्दीत मोठ्या नद्या, समुद्र होता. त्यामुळे आरमार ही त्या काळात गरज होती. लखम सावंत यांच्या कारकीर्दीत युद्धासाठी सक्षम व्यवस्था उभी केली होती. समुद्र मार्गातून मोठ्याप्रमाणात व्यापार चालत असे. यामुळे सागरावर आपले स्वामित्व असावे म्हणून हे आरमार उभारले होते. अरब आणि इतर व्यापाऱ्यांवर वचक बसण्यासाठी ही व्यवस्था होती. त्याकाळात आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद आणि साहेबराव ही तीन गुराबा होती. गुराबा हा शब्द घोराव अर्थात डोंबकावळा यात अरबी शब्दाच्या अपभ्रंशातून बनला आहे. यात दोन ढोलकाठ्या असायच्या. दीडशे ते तीनशे टनापर्यंत वजन नेण्याची यात क्षमता होती. गुराबाचा तळ पाण्यात खोलपर्यंत जात नसे. त्यामुळे हळुवार वाऱ्यावरही ते अतिशय गतीने चालत असे. या गुराब्याची नाळ पाण्याच्या सपाटीपासून तिरकस खोलवर लांबपर्यंत जात असे. त्यामुळे तोल सावरणेही सहज शक्‍य होते. त्यामुळे लढाईमध्ये अतिशय चपळपणे शत्रूवर हल्ला करता येणे शक्‍य असायचे. या तुलनेत परदेशातून येणारी गलबते अवजड असायची. त्यांना गाठून हल्ला करून जेरीस आणणे सहज शक्‍य व्हायचे. त्या काळात आरमारामध्ये रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत अशी सहा गलबते होती. ती आकाराने लहान होती; मात्र लढाईत त्यांचा खूप उपयोग व्हायचा. यामध्ये तलवारी, खंजीर, खांडा, बर्ची अशा शस्त्रांचा साठा असायचा. अठराव्या शतकाच्या अखेरीस या आरमारात 331 सैनिक, 206 दर्यावर्दी असे 537 जण सेवेत होते.  अशी होती तयारी  या संदर्भात फ्रायर या नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने केलेले वर्णनही या आरमाराची ताकद सांगायला पुरेसे आहे. त्यावेळी वेंगुर्ले बंदरात या आरमाराचा वावर होता. 1674 मध्ये लखम सावंत यांचे पुतणे खेम सावंत यांनी गोवा आणि वेंगुर्ले या किनाऱ्यावर एक इंग्रज व्यापाऱ्यांचे गलबत पकडले. या इंग्रजांच्या गलबतावर असलेल्या फ्रायर याने केलेल्या वर्णनानुसार त्यांनी (सावंतवाडी संस्थानचे आरमार) आमच्या गलबतावर कौच्यांचे गोळे फेकले; पण आमच्या गलबतावरील कोणीही त्यामुळे जखमी झाला नाही; मात्र अचानक सुरू झालेल्या या वर्षावाने गलबतावरील वल्हेवाले खूपच घाबरले. समोरून दारूगोळा आणि गोफणीतून दगड फेकले जात होते. ढाल फिरवून भालेही फेकले जावू लागले. त्यांचे गलबत आमच्या गलबतापेक्षा दहापट मोठे होते. त्यांची तयारीही कडेकोट होती. त्या गलबतावर वल्हे मारणाऱ्यांशिवाय सुमारे 60 जण होते. आमच्या गलबतावर तोफगोळा होता, पण तो उडवण्यासाठी गोलंदाज नव्हता; मात्र शेवटी सावंतवाडी संस्थानचे गलबत मागे फिरले. इंग्रज व्यापाऱ्यांच्या गलबताच्या तुलनेत सावंतवाडी संस्थानच्या आरमाराची किती तयारी होती, याचा या वर्णनावरून अंदाज येतो.  नरेंद्रावर हलवले संस्थानचे ठाणे  लखम सावंत यांच्याच कारकीर्दीत संस्थानचे ठाणे ओटवणेतून आताच्या सावंतवाडीकडे सरकले. तत्कालीन चराठे गावच्या हद्दीत असलेल्या नरेंद्र डोंगरावर लखम सावंत यांच्या काळात राजवाडा उभारण्यात आला. याचे अवशेष आताही पहायला मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने त्या काळात राजधानीचे ठिकाण दुर्गम भागात असायचे. कदाचित त्याच हेतूने हे ठाणे वसवले गेले असावे. अधिकाधिक भूभागावर वर्चस्व मिळवून राज्याच्या विस्ताराच्या दृष्टीने लखम सावंत यांच्याच काळात खऱ्या अर्थाने विचार करायची सुरूवात झाली. नरेंद्र डोंगरावरील ठाणे हे याचेच उदाहरण म्हणता येईल.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

सावंतवाडीची ताकद दाखवणारी कारकीर्द सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी संस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात संघर्षाचा इतिहास आहे. असे असले तरी ही दोन राजांमधील लढाई होती. त्यांच्यामध्ये झालेला तह दोन मराठा राज्यकर्ते एकत्र यावे या मुद्‌द्‌यावर होता. शिवाय सावंतवाडी संस्थानच्या पराक्रमाचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ इतिहासात आहेत. सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत यांच्या कारकीर्दीत हा संघर्ष झाला. लखम सावंत यांची कारकीर्द पराक्रमाबरोबरच राज्याच्या स्थैर्य आणि सुबत्तेसाठी महत्त्वाची होती. या काळात सावंतवाडी संस्थानची ताकदही वाढली होती. तिच समजून घेण्याचा हा प्रयत्न...  ओटवणे येथे संस्थानची गादी स्थापन करणाऱ्या खेमसावंत यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र सोमसावंत हे गादीवर बसले. त्यांनी 1640-41 असा अवघा दीड वर्षे कारभार पाहिला. यानंतर त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू फोंड सावंत गादीवर आले. शांत, संयमी असलेल्या फोंड सावंत यांची कारकीर्द 1641 ते 1659 अशी राहिली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू लखम सावंत गादीवर आले. 1659 ते 1675 या दरम्यान त्यांनी सावंतवाडी संस्थानच्या विस्तारासाठी खूप मोठे काम केले. त्यांची कारकीर्द खूप संघर्षमय राहिली.  लखम सावंत हे शूर आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या जोडीला त्यांचे पुतणे खेम सावंत हेही होते. या दोघांनी मिळून खूप मोठा पराक्रम गाजवला. खेम सावंत यांच्याच कारकीर्दीत कुडाळ परगण्यावर असलेली कुडाळदेशस्थ प्रभूंची सत्ता पूर्णपणे जावून सावंतवाडी संस्थानचे वर्चस्व निर्माण झाले. लखम सावंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन. त्या काळात सावंतवाडी संस्थानकडे 12 हजार इतकी फौज होती. पायदळ आणि स्वतंत्र घोडदल याचाही संस्थानच्या सैन्यदलात समावेश होता. त्याही काळात संस्थानकडे स्वतःचे आरमार होते हे विशेष. संस्थानच्या हद्दीत मोठ्या नद्या, समुद्र होता. त्यामुळे आरमार ही त्या काळात गरज होती. लखम सावंत यांच्या कारकीर्दीत युद्धासाठी सक्षम व्यवस्था उभी केली होती. समुद्र मार्गातून मोठ्याप्रमाणात व्यापार चालत असे. यामुळे सागरावर आपले स्वामित्व असावे म्हणून हे आरमार उभारले होते. अरब आणि इतर व्यापाऱ्यांवर वचक बसण्यासाठी ही व्यवस्था होती. त्याकाळात आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद आणि साहेबराव ही तीन गुराबा होती. गुराबा हा शब्द घोराव अर्थात डोंबकावळा यात अरबी शब्दाच्या अपभ्रंशातून बनला आहे. यात दोन ढोलकाठ्या असायच्या. दीडशे ते तीनशे टनापर्यंत वजन नेण्याची यात क्षमता होती. गुराबाचा तळ पाण्यात खोलपर्यंत जात नसे. त्यामुळे हळुवार वाऱ्यावरही ते अतिशय गतीने चालत असे. या गुराब्याची नाळ पाण्याच्या सपाटीपासून तिरकस खोलवर लांबपर्यंत जात असे. त्यामुळे तोल सावरणेही सहज शक्‍य होते. त्यामुळे लढाईमध्ये अतिशय चपळपणे शत्रूवर हल्ला करता येणे शक्‍य असायचे. या तुलनेत परदेशातून येणारी गलबते अवजड असायची. त्यांना गाठून हल्ला करून जेरीस आणणे सहज शक्‍य व्हायचे. त्या काळात आरमारामध्ये रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत अशी सहा गलबते होती. ती आकाराने लहान होती; मात्र लढाईत त्यांचा खूप उपयोग व्हायचा. यामध्ये तलवारी, खंजीर, खांडा, बर्ची अशा शस्त्रांचा साठा असायचा. अठराव्या शतकाच्या अखेरीस या आरमारात 331 सैनिक, 206 दर्यावर्दी असे 537 जण सेवेत होते.  अशी होती तयारी  या संदर्भात फ्रायर या नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने केलेले वर्णनही या आरमाराची ताकद सांगायला पुरेसे आहे. त्यावेळी वेंगुर्ले बंदरात या आरमाराचा वावर होता. 1674 मध्ये लखम सावंत यांचे पुतणे खेम सावंत यांनी गोवा आणि वेंगुर्ले या किनाऱ्यावर एक इंग्रज व्यापाऱ्यांचे गलबत पकडले. या इंग्रजांच्या गलबतावर असलेल्या फ्रायर याने केलेल्या वर्णनानुसार त्यांनी (सावंतवाडी संस्थानचे आरमार) आमच्या गलबतावर कौच्यांचे गोळे फेकले; पण आमच्या गलबतावरील कोणीही त्यामुळे जखमी झाला नाही; मात्र अचानक सुरू झालेल्या या वर्षावाने गलबतावरील वल्हेवाले खूपच घाबरले. समोरून दारूगोळा आणि गोफणीतून दगड फेकले जात होते. ढाल फिरवून भालेही फेकले जावू लागले. त्यांचे गलबत आमच्या गलबतापेक्षा दहापट मोठे होते. त्यांची तयारीही कडेकोट होती. त्या गलबतावर वल्हे मारणाऱ्यांशिवाय सुमारे 60 जण होते. आमच्या गलबतावर तोफगोळा होता, पण तो उडवण्यासाठी गोलंदाज नव्हता; मात्र शेवटी सावंतवाडी संस्थानचे गलबत मागे फिरले. इंग्रज व्यापाऱ्यांच्या गलबताच्या तुलनेत सावंतवाडी संस्थानच्या आरमाराची किती तयारी होती, याचा या वर्णनावरून अंदाज येतो.  नरेंद्रावर हलवले संस्थानचे ठाणे  लखम सावंत यांच्याच कारकीर्दीत संस्थानचे ठाणे ओटवणेतून आताच्या सावंतवाडीकडे सरकले. तत्कालीन चराठे गावच्या हद्दीत असलेल्या नरेंद्र डोंगरावर लखम सावंत यांच्या काळात राजवाडा उभारण्यात आला. याचे अवशेष आताही पहायला मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने त्या काळात राजधानीचे ठिकाण दुर्गम भागात असायचे. कदाचित त्याच हेतूने हे ठाणे वसवले गेले असावे. अधिकाधिक भूभागावर वर्चस्व मिळवून राज्याच्या विस्ताराच्या दृष्टीने लखम सावंत यांच्याच काळात खऱ्या अर्थाने विचार करायची सुरूवात झाली. नरेंद्र डोंगरावरील ठाणे हे याचेच उदाहरण म्हणता येईल.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Obp49X

No comments:

Post a Comment