अनधिकृत स्टॉल शिवसेना काळातले : परब सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  शहरातील 136 पैकी 133 अनधिकृत स्टॉल शिवसेनेच्या सत्ता कार्यकाळातीलच आहेत. नगरविकास मंत्र्यांच्या तोंडी आदेशामुळे त्यावर कारवाई करावी लागल्यास त्याला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि नगरविकास मंत्री जबाबदार असतील, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.  अनधिकृत स्टॉलवरून गेले काही दिवस येथे वाद सुरू आहेत. रवी जाधव यांनी स्टॉल हटविल्याप्रकरणी नुकतेच उपोषण केले होते. यावेळी श्री. केसरकर यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले होते. श्री. केसरकर यांनी त्यांना नगरविकास मंत्र्यांमार्फत न्याय देवू, असे सांगत स्थगित केले होते.  याबाबत श्री. परब म्हणाले, ""नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना रवी जाधव यांचा स्टॉल लावून देण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. हा स्टॉल लावू न दिल्यास शहरातील अनधिकृत 136 स्टॉलवर कारवाई करण्याचेही तोंडी आदेश दिले आहेत; मात्र शहरातील 136 पैकी 133 अनधिकृत स्टॉल हे शिवसेनेच्या कारकिर्दीत लागले असून फक्त 3 स्टॉल हे गेल्या एका वर्षात लागले आहेत.''  ते म्हणाले, ""न्यायालयाने डीक्री केलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्टॉल मिळावा, अशी मागणी करत रवी जाधव यांनी पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. हे उपोषण आमदार केसरकर यांनी उठविल्यानंतर त्यांनी नगरविकास मंत्री यांची भेट घेत तो स्टॉल लावू देण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली; मात्र नगरविकास मंत्री यांच्या तोंडी आदेशाच्या दबावाखातर मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करू.''  ते म्हणाले, ""सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी शहरातील जागेत काही स्टॉल अनधिकृतपणे उभे करण्यात आले आहेत. हे स्टॉल उभे राहिल्याने शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत असे लेखी पत्र आपण बांधकाम विभागाला दिले आहे; मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्रही दिले आहे. त्यामुळे त्याबाबत त्यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल.''  ते म्हणाले, ""मी नगराध्यक्षपदी आल्यानंतर शहरात 100 ते 200 अनधिकृत स्टॉल लागले असल्याची ओरड करणाऱ्या शिवसेनेचा या निमित्ताने पर्दाफाश झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सहीसह दिलेल्या लेखी पत्रात शहरातील अनधिकृत 136 स्टॉलपैकी केवळ 3 स्टॉल मागील एका वर्षात लागले आहेत. 133 स्टॉल हे शिवसेना काळातील आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर बकाल करण्यास शिवसेनाच जबाबदार आहे. नगरविकास मंत्र्यांच्या तोंडी आदेशाने त्या 136 स्टॉलवर कारवाई झाल्यासही शिवसेनाच पूर्णपणे जबाबदार असेल.''  आधी केलेली घाण साफ करतोय  भाजप आणि नगराध्यक्ष या नात्याने नगरविकास मंत्री किंवा प्रशासनाच्या दबावाला भीक घालणार नाही. शहराच्या सौंदर्यात स्टॉल उभारून शिवसेनेने घाण केली होती. त्याची साफसफाई नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केली आहे. त्यामुळे मागील सत्ताधाऱ्यांनी केलेली घाण भाजपच्या डोक्‍यावर टाकली जाऊ नये, असा इशारा नगराध्यक्ष परब यांनी दिला.  संपादन - राहुल पाटील  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 5, 2021

अनधिकृत स्टॉल शिवसेना काळातले : परब सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  शहरातील 136 पैकी 133 अनधिकृत स्टॉल शिवसेनेच्या सत्ता कार्यकाळातीलच आहेत. नगरविकास मंत्र्यांच्या तोंडी आदेशामुळे त्यावर कारवाई करावी लागल्यास त्याला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि नगरविकास मंत्री जबाबदार असतील, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.  अनधिकृत स्टॉलवरून गेले काही दिवस येथे वाद सुरू आहेत. रवी जाधव यांनी स्टॉल हटविल्याप्रकरणी नुकतेच उपोषण केले होते. यावेळी श्री. केसरकर यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले होते. श्री. केसरकर यांनी त्यांना नगरविकास मंत्र्यांमार्फत न्याय देवू, असे सांगत स्थगित केले होते.  याबाबत श्री. परब म्हणाले, ""नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना रवी जाधव यांचा स्टॉल लावून देण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. हा स्टॉल लावू न दिल्यास शहरातील अनधिकृत 136 स्टॉलवर कारवाई करण्याचेही तोंडी आदेश दिले आहेत; मात्र शहरातील 136 पैकी 133 अनधिकृत स्टॉल हे शिवसेनेच्या कारकिर्दीत लागले असून फक्त 3 स्टॉल हे गेल्या एका वर्षात लागले आहेत.''  ते म्हणाले, ""न्यायालयाने डीक्री केलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्टॉल मिळावा, अशी मागणी करत रवी जाधव यांनी पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. हे उपोषण आमदार केसरकर यांनी उठविल्यानंतर त्यांनी नगरविकास मंत्री यांची भेट घेत तो स्टॉल लावू देण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली; मात्र नगरविकास मंत्री यांच्या तोंडी आदेशाच्या दबावाखातर मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करू.''  ते म्हणाले, ""सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी शहरातील जागेत काही स्टॉल अनधिकृतपणे उभे करण्यात आले आहेत. हे स्टॉल उभे राहिल्याने शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत असे लेखी पत्र आपण बांधकाम विभागाला दिले आहे; मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्रही दिले आहे. त्यामुळे त्याबाबत त्यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल.''  ते म्हणाले, ""मी नगराध्यक्षपदी आल्यानंतर शहरात 100 ते 200 अनधिकृत स्टॉल लागले असल्याची ओरड करणाऱ्या शिवसेनेचा या निमित्ताने पर्दाफाश झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सहीसह दिलेल्या लेखी पत्रात शहरातील अनधिकृत 136 स्टॉलपैकी केवळ 3 स्टॉल मागील एका वर्षात लागले आहेत. 133 स्टॉल हे शिवसेना काळातील आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर बकाल करण्यास शिवसेनाच जबाबदार आहे. नगरविकास मंत्र्यांच्या तोंडी आदेशाने त्या 136 स्टॉलवर कारवाई झाल्यासही शिवसेनाच पूर्णपणे जबाबदार असेल.''  आधी केलेली घाण साफ करतोय  भाजप आणि नगराध्यक्ष या नात्याने नगरविकास मंत्री किंवा प्रशासनाच्या दबावाला भीक घालणार नाही. शहराच्या सौंदर्यात स्टॉल उभारून शिवसेनेने घाण केली होती. त्याची साफसफाई नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केली आहे. त्यामुळे मागील सत्ताधाऱ्यांनी केलेली घाण भाजपच्या डोक्‍यावर टाकली जाऊ नये, असा इशारा नगराध्यक्ष परब यांनी दिला.  संपादन - राहुल पाटील  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cMVWAm

No comments:

Post a Comment