जात पडताळणीसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार; विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा पुणे : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला तरी नागरिकांचा वेळ खर्ची पडत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी गतिमान करण्यासाठी अर्जाची प्रत दाखल करण्यासाठी जात पडताळणी कार्यालयात येण्याची अट काढून टाकावी आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइनच करावी यासाठी अधिनियमात बदल करावा, असा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. हा निर्णय झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विविध योजना, निवडणूक, विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिष्यवृत्ती यासह अनेक कारणांसाठी जातीचा दाखला महत्त्वाचा असतो. पण जातीचा बनावट दाखला घेऊन शासनाची फसवणूक केली जाते. त्यासाठी जातीच्या दाखल्याची पडताळणी करून त्याचे प्रमाणपत्र देण्याचे काम समाज कल्याण विभागाकडून केले जाते. जात पडताळणीची प्रक्रिया किचकट असल्याने अर्ज केल्यानंतर दाखला मिळण्यासाठी किमान ९० दिवस तर काही वेळेस ही मुदत १५० दिवसांपर्यंत वाढविली जाते. -  हे वाचा - फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी सध्या जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या ऑनलाइन अर्जाची प्रत त्वरित संबंधित जात पडताळणी समिती समोर सादर करणे बंधनकारक आहे. अनेकांना हे माहिती नसल्याने ते केवळ ऑनलाइन अर्ज करतात व त्याची प्रत कार्यालयात जमा करत नाहीत, त्यामुळे त्यांचे प्रकरण लवकर निकाली लागत नाही. शिवाय प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करून जिल्ह्‍याच्या ठिकाणी जावे लागते, त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहे, तसेच लवकर प्रक्रिया करावी म्हणून अनेकजण कार्यालयात खेटे मारतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी ही प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. येत्या विधिमंडळ अधिवेशनात अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. - रिहाना, ग्रेटा, मियाँनंतर शेतकऱ्यांवर बोलणारी अमांडा सर्नी आहे तरी कोण? ‘‘जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येत असले तरी अधिनियमातील तरतुदीनुसार या अर्जाची प्रत आणि मूळ कागदपत्र घेऊन जात पडताळणी समिती समोर जाणे बंधनकारक आहे. बरेच जण ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष समितीकडे जात नाहीत. पण आता या अधिनियमात बदल करावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यास विधीमंडळात मंजुरी मिळाल्यावर अर्जदारास प्रत्यक्ष समितीकडे जाण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी गतिमान होईल.’’ - धम्मदीप गजभिये, महासंचालक, बार्टी - Video: पाकिस्तानात रस्त्याच्या उद्घाटनाला आले परराष्ट्रमंत्री अन् लोक केकसाठी तुटून पडले​ रक्त नाते संबंधातील प्रमाणपत्रही ऑनलाइन रक्त नाते संबंधात जर कोणाचे प्रमाणपत्र असेल आणि अर्ज करताना ते जोडले तर अशा अर्जदारास एका महिन्यात ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकेल. सध्या पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर याची चाचपणी सुरू असून, त्यास चांगला प्रतिसाद आहे. लवकरच याची राज्यभर अंमलबजावणी केली जाईल, असे गजभिये यांनी सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

जात पडताळणीसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार; विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा पुणे : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला तरी नागरिकांचा वेळ खर्ची पडत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी गतिमान करण्यासाठी अर्जाची प्रत दाखल करण्यासाठी जात पडताळणी कार्यालयात येण्याची अट काढून टाकावी आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइनच करावी यासाठी अधिनियमात बदल करावा, असा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. हा निर्णय झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विविध योजना, निवडणूक, विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिष्यवृत्ती यासह अनेक कारणांसाठी जातीचा दाखला महत्त्वाचा असतो. पण जातीचा बनावट दाखला घेऊन शासनाची फसवणूक केली जाते. त्यासाठी जातीच्या दाखल्याची पडताळणी करून त्याचे प्रमाणपत्र देण्याचे काम समाज कल्याण विभागाकडून केले जाते. जात पडताळणीची प्रक्रिया किचकट असल्याने अर्ज केल्यानंतर दाखला मिळण्यासाठी किमान ९० दिवस तर काही वेळेस ही मुदत १५० दिवसांपर्यंत वाढविली जाते. -  हे वाचा - फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी सध्या जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या ऑनलाइन अर्जाची प्रत त्वरित संबंधित जात पडताळणी समिती समोर सादर करणे बंधनकारक आहे. अनेकांना हे माहिती नसल्याने ते केवळ ऑनलाइन अर्ज करतात व त्याची प्रत कार्यालयात जमा करत नाहीत, त्यामुळे त्यांचे प्रकरण लवकर निकाली लागत नाही. शिवाय प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करून जिल्ह्‍याच्या ठिकाणी जावे लागते, त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहे, तसेच लवकर प्रक्रिया करावी म्हणून अनेकजण कार्यालयात खेटे मारतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी ही प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. येत्या विधिमंडळ अधिवेशनात अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. - रिहाना, ग्रेटा, मियाँनंतर शेतकऱ्यांवर बोलणारी अमांडा सर्नी आहे तरी कोण? ‘‘जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येत असले तरी अधिनियमातील तरतुदीनुसार या अर्जाची प्रत आणि मूळ कागदपत्र घेऊन जात पडताळणी समिती समोर जाणे बंधनकारक आहे. बरेच जण ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष समितीकडे जात नाहीत. पण आता या अधिनियमात बदल करावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यास विधीमंडळात मंजुरी मिळाल्यावर अर्जदारास प्रत्यक्ष समितीकडे जाण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी गतिमान होईल.’’ - धम्मदीप गजभिये, महासंचालक, बार्टी - Video: पाकिस्तानात रस्त्याच्या उद्घाटनाला आले परराष्ट्रमंत्री अन् लोक केकसाठी तुटून पडले​ रक्त नाते संबंधातील प्रमाणपत्रही ऑनलाइन रक्त नाते संबंधात जर कोणाचे प्रमाणपत्र असेल आणि अर्ज करताना ते जोडले तर अशा अर्जदारास एका महिन्यात ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकेल. सध्या पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर याची चाचपणी सुरू असून, त्यास चांगला प्रतिसाद आहे. लवकरच याची राज्यभर अंमलबजावणी केली जाईल, असे गजभिये यांनी सांगितले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rFized

No comments:

Post a Comment