लष्कराला मिळणार रोबोटिक्सची ताकद; ‘डीआयएटी’मध्ये खास अभ्यासक्रम सुरू पुणे - जगभरातील लष्करी सामर्थ्यामध्ये रोबोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता आपल्या देशातही त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) मध्ये खास अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. येथे तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा हातभार लष्कराचे सामर्थ्य वाढण्यास होणार आहे.    स्वयंचलित वाहने, उपकरणे, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा युद्ध प्रणालीमध्ये समावेश झाला आहे. लष्कराबरोबरच उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रांतही कुशल मनुष्यबळ म्हणून रोबोटचा वापर वाढणार आहे. ‘डीआयएटी’मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’ची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून रोबोटिक्समधील नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तसेच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘डीआयएटी’तील एम. टेक विभागात रोबोटिक्सचा अभ्यासक्रम २०१५ पासून आहे. मात्र आता या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ह्युमेनॉइड, मोबाईल आणि एरियल रोबोटिक्स, मोशन प्लॅनिंग, इंटेलिजंट रोबोटिक्स, मेडिकल रोबोटिक्स, मशिन लर्निंग आणि रोबोटिक्समधील एआय, रोबोट डायनॅमिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यात हा विभाग सहभागी आहे. यामध्ये रोबोटिक्समधील एम. टेक, एमएस (संशोधनानुसार) आणि पीएचडीसाठीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन प्रयोगशाळा होणार अत्याधुनिक  एरिअल रोबोटिक्स व ‘ॲडव्हान्स रोबोटिक्स अँड सिस्टिमचा समावेश प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेत ‘हाय एंड सॉफ्टवेअर आणि सिम्युलेटरचे शिक्षण देण्यात येईल. रोबोटिक्सच्या दृष्टीने आवश्यक सेन्सर्स, मोशन ट्रेकिंग सेटअप प्रयोगशाळेत असेल. त्याचबरोबर आरओएस आणि मॅटलॅब या सॉफ्टवेअरबरोबरच स्वयंचलित रोबोटिक्स संबंधिच्या सुविधा यात उपलब्ध असतील. पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी विविध संस्थांशी समन्वय ‘एम. टेक.’च्या विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प राबविण्याची संधी मिळावी, यासाठी ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’च्या वतीने डीआरडीओ, डीपीयूएस या लष्करी संस्था तसेच उद्योग व विकास प्रयोगशाळांशी समन्वय करण्यात आला आहे. सध्या चेन्नई येथील सीव्हीआरडीई, सीएआर, एडीई, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), पुण्यातील टीसीएस, इस्रो, आयआयआयटी हैदराबाद आदी ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’चे समन्वयक आहेत. बारामतीच्या राजेंद्र ठवरे यांनी विक्रमी वेळेत पुर्ण केला Trail Run सध्या अंतराळ, संशोधन, लष्कर, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स विज्ञानाचा वापर वाढत आहे. या अनुषंगाने या अभ्यासक्रमावर भर देण्यात येत आहे. तसेच याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा व वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. - डॉ. बालासुब्रमन्यण के., अधिष्ठाता, ‘डीआयएटी’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

लष्कराला मिळणार रोबोटिक्सची ताकद; ‘डीआयएटी’मध्ये खास अभ्यासक्रम सुरू पुणे - जगभरातील लष्करी सामर्थ्यामध्ये रोबोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता आपल्या देशातही त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) मध्ये खास अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. येथे तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा हातभार लष्कराचे सामर्थ्य वाढण्यास होणार आहे.    स्वयंचलित वाहने, उपकरणे, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा युद्ध प्रणालीमध्ये समावेश झाला आहे. लष्कराबरोबरच उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रांतही कुशल मनुष्यबळ म्हणून रोबोटचा वापर वाढणार आहे. ‘डीआयएटी’मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’ची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून रोबोटिक्समधील नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तसेच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘डीआयएटी’तील एम. टेक विभागात रोबोटिक्सचा अभ्यासक्रम २०१५ पासून आहे. मात्र आता या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ह्युमेनॉइड, मोबाईल आणि एरियल रोबोटिक्स, मोशन प्लॅनिंग, इंटेलिजंट रोबोटिक्स, मेडिकल रोबोटिक्स, मशिन लर्निंग आणि रोबोटिक्समधील एआय, रोबोट डायनॅमिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यात हा विभाग सहभागी आहे. यामध्ये रोबोटिक्समधील एम. टेक, एमएस (संशोधनानुसार) आणि पीएचडीसाठीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन प्रयोगशाळा होणार अत्याधुनिक  एरिअल रोबोटिक्स व ‘ॲडव्हान्स रोबोटिक्स अँड सिस्टिमचा समावेश प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेत ‘हाय एंड सॉफ्टवेअर आणि सिम्युलेटरचे शिक्षण देण्यात येईल. रोबोटिक्सच्या दृष्टीने आवश्यक सेन्सर्स, मोशन ट्रेकिंग सेटअप प्रयोगशाळेत असेल. त्याचबरोबर आरओएस आणि मॅटलॅब या सॉफ्टवेअरबरोबरच स्वयंचलित रोबोटिक्स संबंधिच्या सुविधा यात उपलब्ध असतील. पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी विविध संस्थांशी समन्वय ‘एम. टेक.’च्या विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प राबविण्याची संधी मिळावी, यासाठी ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’च्या वतीने डीआरडीओ, डीपीयूएस या लष्करी संस्था तसेच उद्योग व विकास प्रयोगशाळांशी समन्वय करण्यात आला आहे. सध्या चेन्नई येथील सीव्हीआरडीई, सीएआर, एडीई, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), पुण्यातील टीसीएस, इस्रो, आयआयआयटी हैदराबाद आदी ‘स्कूल ऑफ रोबोटिक्स’चे समन्वयक आहेत. बारामतीच्या राजेंद्र ठवरे यांनी विक्रमी वेळेत पुर्ण केला Trail Run सध्या अंतराळ, संशोधन, लष्कर, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स विज्ञानाचा वापर वाढत आहे. या अनुषंगाने या अभ्यासक्रमावर भर देण्यात येत आहे. तसेच याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा व वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. - डॉ. बालासुब्रमन्यण के., अधिष्ठाता, ‘डीआयएटी’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39WYZnA

No comments:

Post a Comment