लसीकरणाला हवा सहभागाचा ‘बूस्टर’ गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या जीवनावर कोरोनाचा परिणाम झाला. त्यामुळे सारे कोरोनावरील लशीची वाट पाहात होते. जगभरातील शास्त्रज्ञांनी अहोरात्र संशोधनातून लस शोधून काढली आणि कोरोनामुक्तीच्या दिशेने दमदार पाऊल पडले. मात्र, आता लस उपलब्ध झाली असताना वेगळेच चित्र दिसते आहे. लशीची आतुरतेने वाट पाहणारे लोक आता लस घेण्यास तितकेसे उत्साही नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील लसीकरणाची गती पाहिल्यास धक्का बसेल, अशी स्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा टप्पा संपण्यास आता जेमतेम आठवडाच राहिला असून, या काळात अपेक्षेइतके लसीकरण होईल याबाबत खात्री नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला त्यातील त्रुटी दूर करून प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुण्यात मोठी पिछाडी पुण्यापुरते बोलायचे झाल्यास शहरातील कोरोना प्रसाराचा वेग आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मात्र, कोरोनाच्या साथीतून अजून आपली पूर्णपणे मुक्तता झालेले नाही. यासाठी अजूनही बराच कालावधी लागणार आहे. याचे पुरेसे भान नसल्याचे लसीकरणाच्या सध्याच्या संथ वेगावरून जाणवते. लसीकरणाचा १६ जानेवारीपासून सुरू झालेला पहिला टप्पा येत्या १४ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. या कालावधीत पुणे जिल्ह्यात एकूण सुमारे एक लाख दहा हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ ३६ हजार जणांचेच लसीकरण झालेले आहे. केवळ पुणे शहराचा विचार केल्यास अपेक्षित ४७ हजारपैकी केवळ १२ हजार जणांनीच आतापर्यंत लस घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३३ टक्के लसीकरण झाले असून, शहरात हेच प्रमाण अजूनही कमी म्हणजे केवळ २७ टक्के आहे.  इंदापूर तालुक्यातील सर्व पाणी प्रश्‍न सोडविणार - अजित पवार लसीकरण आवश्‍यक का? खरे तर सरकारने आरोग्यसेवेतील फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा खास विचार करून लसीकरणात त्यांना प्राधान्य दिले. यामध्ये सरकारी, तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे एकप्रकारे योग्यच पाऊल आहे. त्यासाठी त्यांच्या नोंदीपासून ते लस वितरणापर्यंत सारी जय्यत तयारी करण्यात आली. मात्र, या आरोग्यसेवकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीला ॲपमधील गोंधळामुळे अडचणी आल्या. मात्र त्यात सुधारणा होऊनही लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. कोरोनाचा कमी झालेला प्रसार हे त्यामागील कारण असावे. मात्र अजूनही पुण्यात रोज कोरोनाचे सरासरी किमान दोनशे तरी रुग्ण सापडत आहेत. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत हा आकडा जरी कमी असला तरी तो संपलेला नाही. आजच्या घडीला अजूनही देशातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्येच सापडत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरात पुण्याचा समावेश आहे. एकट्या पुण्यातील बळींची संख्या पाच हजारापयर्यंत पोहोचली आहे. कोरोनाने पुण्याच्या अर्थव्यवस्थेवरदेखील तितकाच विपरीत परिणाम केला आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही याची दक्षता प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. आता शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू होत आहे. त्यामुळे शहारातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा स्थितीत किमान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे. कोरोना रुग्णांशी त्यांचाच सर्वांत आधी संपर्क येतो. भविष्यातही त्यांचा रुग्णांशी संबंध कायम राहणार आहे. त्यामुळे लस घेण्यास त्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.  पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी त्रुटी त्वरित दूर व्हाव्यात लसीकरणाचा पहिला टप्पा संपण्यास आता अवघा आठवड्याचा कालावधी राहिला आहे. या मोजक्या दिवसांत सर्वांना लस देण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. सरकारी यंत्रणेने त्यासाठी अधिक जोमाने पावले टाकायला हवीत. लसीकरणातील अडथळे, तसेच किचकट बाबी त्वरित दूर करून सोपी पद्धत आणायला पाहिजे. यादीत नाव असेल, तर केवळ आधार कार्ड पाहूनही खासगी डॉक्टरांना हवी तेव्हा लस देण्याची सोय केली पाहिजे. कारण कोरोना साथीच्या काळात खासगी डॉक्टर व रुग्णालयांवर सर्वाधिक ताण आला. आता लसीकरणात मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची भावना आहे. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन   डॉक्टरांचे स्वतःचे तसेच त्यांच्या स्टाफमधील अनेकांचे नाव ॲपमध्ये नसल्याची शेकडो खासगी डॉक्टरांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारी त्वरित जाणून त्या दूर केल्या तर लसीकरणाचा वेग निश्चित वाढणार आहे. ज्या लसीची आपण आतुरतेने वाट पाहिली ती लस घेण्याबाबतची अनास्था व लसीकरणातील त्रुटी जितक्या पटकन दूर होतील तितके ते सर्वांच्याच फायद्याचे आहे, हे मात्र नक्की! या फ्रंटलायनर्सनीच लस घेणे टाळल्यास त्याचा विपरित परिणाम सामान्य माणसांच्या मानसिकतेवर होईल आणि ते लस घेण्यात टाळाटाळ करण्याची भीती आहे, याचा नक्की विचार व्हावा. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 6, 2021

लसीकरणाला हवा सहभागाचा ‘बूस्टर’ गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या जीवनावर कोरोनाचा परिणाम झाला. त्यामुळे सारे कोरोनावरील लशीची वाट पाहात होते. जगभरातील शास्त्रज्ञांनी अहोरात्र संशोधनातून लस शोधून काढली आणि कोरोनामुक्तीच्या दिशेने दमदार पाऊल पडले. मात्र, आता लस उपलब्ध झाली असताना वेगळेच चित्र दिसते आहे. लशीची आतुरतेने वाट पाहणारे लोक आता लस घेण्यास तितकेसे उत्साही नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील लसीकरणाची गती पाहिल्यास धक्का बसेल, अशी स्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा टप्पा संपण्यास आता जेमतेम आठवडाच राहिला असून, या काळात अपेक्षेइतके लसीकरण होईल याबाबत खात्री नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला त्यातील त्रुटी दूर करून प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुण्यात मोठी पिछाडी पुण्यापुरते बोलायचे झाल्यास शहरातील कोरोना प्रसाराचा वेग आता बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मात्र, कोरोनाच्या साथीतून अजून आपली पूर्णपणे मुक्तता झालेले नाही. यासाठी अजूनही बराच कालावधी लागणार आहे. याचे पुरेसे भान नसल्याचे लसीकरणाच्या सध्याच्या संथ वेगावरून जाणवते. लसीकरणाचा १६ जानेवारीपासून सुरू झालेला पहिला टप्पा येत्या १४ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. या कालावधीत पुणे जिल्ह्यात एकूण सुमारे एक लाख दहा हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ ३६ हजार जणांचेच लसीकरण झालेले आहे. केवळ पुणे शहराचा विचार केल्यास अपेक्षित ४७ हजारपैकी केवळ १२ हजार जणांनीच आतापर्यंत लस घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३३ टक्के लसीकरण झाले असून, शहरात हेच प्रमाण अजूनही कमी म्हणजे केवळ २७ टक्के आहे.  इंदापूर तालुक्यातील सर्व पाणी प्रश्‍न सोडविणार - अजित पवार लसीकरण आवश्‍यक का? खरे तर सरकारने आरोग्यसेवेतील फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा खास विचार करून लसीकरणात त्यांना प्राधान्य दिले. यामध्ये सरकारी, तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे एकप्रकारे योग्यच पाऊल आहे. त्यासाठी त्यांच्या नोंदीपासून ते लस वितरणापर्यंत सारी जय्यत तयारी करण्यात आली. मात्र, या आरोग्यसेवकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीला ॲपमधील गोंधळामुळे अडचणी आल्या. मात्र त्यात सुधारणा होऊनही लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. कोरोनाचा कमी झालेला प्रसार हे त्यामागील कारण असावे. मात्र अजूनही पुण्यात रोज कोरोनाचे सरासरी किमान दोनशे तरी रुग्ण सापडत आहेत. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत हा आकडा जरी कमी असला तरी तो संपलेला नाही. आजच्या घडीला अजूनही देशातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्येच सापडत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरात पुण्याचा समावेश आहे. एकट्या पुण्यातील बळींची संख्या पाच हजारापयर्यंत पोहोचली आहे. कोरोनाने पुण्याच्या अर्थव्यवस्थेवरदेखील तितकाच विपरीत परिणाम केला आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही याची दक्षता प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. आता शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू होत आहे. त्यामुळे शहारातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा स्थितीत किमान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे. कोरोना रुग्णांशी त्यांचाच सर्वांत आधी संपर्क येतो. भविष्यातही त्यांचा रुग्णांशी संबंध कायम राहणार आहे. त्यामुळे लस घेण्यास त्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.  पुणेकरांनो ऐकलंत का? 10 महिन्यांनी कोरोनाबाबत पहिल्यांदाच मोठी बातमी त्रुटी त्वरित दूर व्हाव्यात लसीकरणाचा पहिला टप्पा संपण्यास आता अवघा आठवड्याचा कालावधी राहिला आहे. या मोजक्या दिवसांत सर्वांना लस देण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. सरकारी यंत्रणेने त्यासाठी अधिक जोमाने पावले टाकायला हवीत. लसीकरणातील अडथळे, तसेच किचकट बाबी त्वरित दूर करून सोपी पद्धत आणायला पाहिजे. यादीत नाव असेल, तर केवळ आधार कार्ड पाहूनही खासगी डॉक्टरांना हवी तेव्हा लस देण्याची सोय केली पाहिजे. कारण कोरोना साथीच्या काळात खासगी डॉक्टर व रुग्णालयांवर सर्वाधिक ताण आला. आता लसीकरणात मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची भावना आहे. अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन   डॉक्टरांचे स्वतःचे तसेच त्यांच्या स्टाफमधील अनेकांचे नाव ॲपमध्ये नसल्याची शेकडो खासगी डॉक्टरांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारी त्वरित जाणून त्या दूर केल्या तर लसीकरणाचा वेग निश्चित वाढणार आहे. ज्या लसीची आपण आतुरतेने वाट पाहिली ती लस घेण्याबाबतची अनास्था व लसीकरणातील त्रुटी जितक्या पटकन दूर होतील तितके ते सर्वांच्याच फायद्याचे आहे, हे मात्र नक्की! या फ्रंटलायनर्सनीच लस घेणे टाळल्यास त्याचा विपरित परिणाम सामान्य माणसांच्या मानसिकतेवर होईल आणि ते लस घेण्यात टाळाटाळ करण्याची भीती आहे, याचा नक्की विचार व्हावा. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36PN1dx

No comments:

Post a Comment