महापालिकेला कर भरतोय; पण आरोग्य सुविधेचे काय? पुणे - महापालिकेचे सर्व कर भरूनही सामान्य पुणेकरांना कोरोनाच्या काळात उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. साथरोगाच्या उद्रेकात आरोग्याची पायाभूत सुविधा मिळत नसेल तर नियमित कर भरून मला काय मिळाले, असा सवाल पुणेकर करत आहेत. कोरोनाकाळात सामान्य पुणेकरांना सुविधा देण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने सादर केले. त्यावर हा सवाल पुणेकरांनी केला. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी मोफत असली तरीही तेथील व्यवस्था सुलभ नव्हती. त्यामुळे खासगी प्रयोगशाळा किंवा रुग्णालयाची वाट धरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. कोरोना उद्रेकामुळे वेतनात झालेली कपात, त्यातून घटलेले उत्पन्न आणि दुसरीकडे आरोग्यावरील खर्च वाढलेला. याचा थेट परिणाम कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडण्यात झाला. अशा वेळी महापालिकेची आरोग्य व्यवस्था उपयोगी पडली नाही. त्यामुळे महापालिकेला कर भरून मला आरोग्याच्या नेमक्या कोणत्या सुविधा मिळाल्या, या प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात ना ऑक्सिजनची व्यवस्था होती, ना अतिदक्षता विभाग होता. पुण्यात १२ वर्षांपूर्वी स्वाइन फ्ल्यूचा उद्रेक झाला होता. हा साथरोग उद्रेकाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली नव्हती. त्याचा थेट फटका नियमित कर भरणाऱ्या करदात्यांना बसला.  Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुण्यात होता. शहरातील ८५ टक्के कोरोनाबाधीत रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले. उर्वरित फक्त १५ टक्के रुग्णांना सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळाले. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर गेला. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची सुरवात या अंदाजपत्रकापासून करण्याची मोठी संधी महापालिका प्रशासनाला होती. पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई पण, कोरोनाचा इतका महाभयंकर उद्रेक जवळून अनुभवल्यानंतरही आरोग्याच्या नेमक्या कोणत्या घटकांमध्ये गुंतवणूक करायची, तेथे कोणत्या सुविधा निर्माण करायच्या याचे नेमकेपणाने ‘निदान’ महापालिका प्रशासनाला झाले नाही. त्यामुळे पुणेकरांच्या करातून आता त्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमला जाईल. त्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाला सादर होईल. त्यावर सर्वांगिण चर्चा होईल. त्याच्या समाधानकारक उत्तरानंतर सल्लागाराने दिलेल्या प्रकल्पाला मान्यता मिळेल. पण, तो प्रत्यक्ष कधी येईल, या बद्दल प्रशासनातील अधिकारीही बोलत नाहीत. अशा वेळी करदात्यांनी करायचे काय, या प्रश्नाचं उत्तर आयुक्तांनी पुणेकरांना द्यावं. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

महापालिकेला कर भरतोय; पण आरोग्य सुविधेचे काय? पुणे - महापालिकेचे सर्व कर भरूनही सामान्य पुणेकरांना कोरोनाच्या काळात उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. साथरोगाच्या उद्रेकात आरोग्याची पायाभूत सुविधा मिळत नसेल तर नियमित कर भरून मला काय मिळाले, असा सवाल पुणेकर करत आहेत. कोरोनाकाळात सामान्य पुणेकरांना सुविधा देण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने सादर केले. त्यावर हा सवाल पुणेकरांनी केला. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी मोफत असली तरीही तेथील व्यवस्था सुलभ नव्हती. त्यामुळे खासगी प्रयोगशाळा किंवा रुग्णालयाची वाट धरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. कोरोना उद्रेकामुळे वेतनात झालेली कपात, त्यातून घटलेले उत्पन्न आणि दुसरीकडे आरोग्यावरील खर्च वाढलेला. याचा थेट परिणाम कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडण्यात झाला. अशा वेळी महापालिकेची आरोग्य व्यवस्था उपयोगी पडली नाही. त्यामुळे महापालिकेला कर भरून मला आरोग्याच्या नेमक्या कोणत्या सुविधा मिळाल्या, या प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात ना ऑक्सिजनची व्यवस्था होती, ना अतिदक्षता विभाग होता. पुण्यात १२ वर्षांपूर्वी स्वाइन फ्ल्यूचा उद्रेक झाला होता. हा साथरोग उद्रेकाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली नव्हती. त्याचा थेट फटका नियमित कर भरणाऱ्या करदात्यांना बसला.  Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुण्यात होता. शहरातील ८५ टक्के कोरोनाबाधीत रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले. उर्वरित फक्त १५ टक्के रुग्णांना सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळाले. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर गेला. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची सुरवात या अंदाजपत्रकापासून करण्याची मोठी संधी महापालिका प्रशासनाला होती. पुण्यात ६३ जणांना अटक; अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई पण, कोरोनाचा इतका महाभयंकर उद्रेक जवळून अनुभवल्यानंतरही आरोग्याच्या नेमक्या कोणत्या घटकांमध्ये गुंतवणूक करायची, तेथे कोणत्या सुविधा निर्माण करायच्या याचे नेमकेपणाने ‘निदान’ महापालिका प्रशासनाला झाले नाही. त्यामुळे पुणेकरांच्या करातून आता त्यासाठी स्वतंत्र सल्लागार नेमला जाईल. त्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाला सादर होईल. त्यावर सर्वांगिण चर्चा होईल. त्याच्या समाधानकारक उत्तरानंतर सल्लागाराने दिलेल्या प्रकल्पाला मान्यता मिळेल. पण, तो प्रत्यक्ष कधी येईल, या बद्दल प्रशासनातील अधिकारीही बोलत नाहीत. अशा वेळी करदात्यांनी करायचे काय, या प्रश्नाचं उत्तर आयुक्तांनी पुणेकरांना द्यावं. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pwIN1V

No comments:

Post a Comment