ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय? ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात सर्वाधिक धोका कोणाला? साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले. हे करणे आवश्‍यक फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा निष्कर्ष  दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात  ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात ‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

ऑर्गनोफॉस्फेट रसायनामुळे श्र्वसनाच्या समस्यांचा धोका पुणे- वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अधिक उत्पन्नाकरिता कृषी क्षेत्रापासून उद्योगापर्यंत विविध प्रकाराच्या रसायनांचा वापर केला जातो. कीटकनाशक, औषधे, गृहोपयोगी रसायने आदींमध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ या रसायनाचा मोठ्या प्रामाणावर वापर होतो. मात्र, त्यामुळे श्र्वसनमार्गाशी निगडित समस्या तर वाढतात त्याचबरोबर कोरोनाशी संबंधित धोकाही वाढतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सायंती पोद्दार, पश्‍चिम बंगालच्या काझी नाझरुल विद्यापीठाचे डॉ. प्रेम राजक तसेच, डॉ. ए. गांगुली, डॉ. सौरभ सरकार, डॉ. मोमिता दत्ता, डॉ. सलमा खातून आणि डॉ. सुमेधा राय यांनी हे संशोधन केले. यासंबंधीचे संशोधन ‘एल्सव्हेअर’च्या फूड अँड टॉक्सिकोलॉजी या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे काय? ऑर्गनोफॉस्फेट हे एका प्रकारचे कीटकनाशक आहे. त्याचा वापर करून फळे व भाज्या पिकविण्यात येतात. त्यामुळे हे रसायन काही प्रमाणात खाद्य पदार्थांमध्ये राहतात. तसेच दीर्घकाळ या रसायनाच्या संपर्कात आल्यावर याचा परिणाम मानवी रोगप्रतिकारशक्तीवर (इम्युनिटी) होतो. त्यामुळे याला ‘इम्युनोटॉक्सिक’ म्हणून ओळखले जाते. अशा रसायनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात संपर्क आल्यास शरीराची संसर्गाशी नैसर्गिकपणे लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढू शकते.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात सर्वाधिक धोका कोणाला? साधारणपणे सर्व वयोगटांना या रसायनाचा धोका आहे. परंतु, बऱ्याचवेळी चाळीशीनंतर प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि अशा वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जास्त काळ अर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात येणारे लोकं ‘इम्युनोडेफिशियंट’ असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच, या लोकांना श्र्वसनमार्गाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता आहे. असे या अभ्यासातील डॉ. सायंती पोतदार यांनी सांगितले. हे करणे आवश्‍यक फळ, भाजी किंवा तृणधान्यांसारखे खाद्यपदार्थ स्वच्छ धुणे आणि योग्य प्रकारे शिजवणे साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर नियमितपणे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक तसेच नैसर्गिक किंवा सिंथेटिक अँटी ऑक्सिडंट्सचे सेवन केल्याने ऑर्गनोफॉस्फेट्सचा रोगप्रतिकारशक्तीवर कमी प्रभाव होतो. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा निष्कर्ष  दीर्घकाळ ऑर्गनोफॉस्फेटच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी सार्स कोव्ह-२ सारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. श्वसनाशी निगडित आजार जडू शकतात  ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’मुळे प्रतिकारशक्तीशी संबंधित असलेल्या विविध अवयवांमधील पेशी मरतात ‘लिम्फोसाइट’ आणि ‘अँटीबॉडी’ची संख्या कमी होऊ शकते अतिरिक्त वापराचा पर्यावरणावरही परिणाम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rbutwe

No comments:

Post a Comment