गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित? पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.  मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.  ‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर  तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?     तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’      झटपट पैसा कमाविण्याची लालसा      चांगले राहणीमान व मौजमजेची आवड      गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम      शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी      स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे. -अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. - दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित? पुणे - कधी किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी थेट कोयता, पिस्तूल घेऊन निर्माण केली जाणारी दहशत, तर कधी आपसांतील भांडणातून वाहनांची केली जाणारी तोडफोड... कधी टोळी बनवून एखाद्यावर धारदार शस्त्रांनी केलेला जाणारा जीवघेणा हल्ला... या स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडत आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. अशा गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.  मार्केट यार्ड येथे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत ४० ते ४५ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, ते सर्वजण १९ ते २२ या वयोगटातील आहे. दत्तवाडी पोलिसांनी दहा लाख रुपयांच्या वाहनचोरीप्रकरणी पकडलेले दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांचे होते. तळजाई वसाहतीत तडीपार केलेल्या गुंडाने कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. या गुन्ह्यातील आरोपीही २० वर्षांचा आहे. या सारख्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे या स्वरूपाचे गुन्हे संबंधित गुन्हेगारांकडून केले जात आहेत.  आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याच्या जिवावर उठणे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.  ‘फ्रेंड्स सर्कल’चे वाढदिवस रस्त्यांवर  तरुणांकडून त्यांचे ‘फ्रेंड्स सर्कल’ बनवून टोळक्‍या-टोळक्‍याने रस्त्यांवर वाढदिवस साजरे केले जातात. तसेच कारागृहातून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांचेही याच टोळक्‍यांकडून जंगी स्वागत केले जाते. चिकन-मटण, दारूच्या पार्ट्याही दिल्या जातात. हे तरुण विविध कार्यक्रमांच्या नावाखाली विक्रेते, व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे. आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन गुन्हेगारीकडे तरुण का होतात आकर्षित?     तरुणांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील वाढती ‘भाईगिरी’      झटपट पैसा कमाविण्याची लालसा      चांगले राहणीमान व मौजमजेची आवड      गुन्हेगारीवरील वेबसीरिज, चित्रपट, मालिकांचा परिणाम      शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी      स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची हौस गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.  सातत्याने गुन्हे करणाऱ्या तरुणांवर गुन्हे शाखेच्या पथकांचे विशेष लक्ष असून त्यांच्यावर सध्या कडक कारवाई करण्यात येत आहे. -अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेगवेगळ्या कारणांमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून नागरिक, विक्रेते व महिलांना त्रास होतो. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास संबंधित व्यक्तीला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असणे गरजेचे आहे. - दत्ता जाधव,  सामाजिक कार्यकर्ते Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cp5EZv

No comments:

Post a Comment