'मुग्धाची डॅशिंग गोष्ट' ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेची संवादलेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे हिचं हास्य पण नावाप्रमाणेच एकदम मुग्ध करणारं आहे. तिच्या हास्याप्रमाणेच तिच्या लेखनातही एक अफलातून जादू आहे. अशा या प्रतिभाशाली आणि दर्जेदार लेखिकेच्या आवडी-निवडीही दर्जेदार आहेत. लेखन आणि अभिनय क्षेत्रात अतिशय व्यस्त असूनसुद्धा तिला छान छान साड्या नेसायला, साड्या खरेदी करायला, त्या भेट म्हणून द्यायला आणि जतन करून संग्रह करायला जाम आवडतात. तिच्याकडे म्हणे असंख्य साड्या आहेत... पण या तिच्या असंख्य साड्यांमध्ये तिची अतिशय खास अशी एक साडी आहे...  साडी नेसायला कोणत्याही कारणाची वाट न बघणारी, अगदी सहज, मूड आला म्हणून साडी नेसणारी लाघवी हास्य, स्वप्नाळू डोळ्यांची आणि मधाळ बोलणारी मुग्धा तितकीच ‘डॅशिंग’ पण आहे! जून २०१९ मध्ये ही रणरागिणी चक्क ३५० सीसीची ‘रॉयल एन्फिल्ड’ बाईक चालवत ८ दिवसांच्या लेह लडाखच्या फेरफटक्याला गेली होती! तिच्या त्या ‘अमेझिंग’ अनुभवाचा ब्लॉग, सायली राजाध्यक्ष हिनं वाचला. सायली म्हणजे अतिशय सुंदर साड्यांचा संग्रह असलेला एक लोकप्रिय ब्रँड. तर मुग्धाचा तो थरार वाचून सायली इतकी प्रभावित झाली, की तिनं मुग्धाचा पत्ता मागवून घेतला आणि चक्क तिच्या स्वतःच्या ब्रँडची एक मस्त खणाची साडी मुग्धाला भेट म्हणून पाठवून दिली. मुग्धाला तो आश्चर्याचा धक्का होता.  हेही वाचा : केरळची ‘कसावू’ साडीप्रिय मुग्धा तर हरखूनच गेली. खणाची सुंदर साडी, त्यावर सायलीनं केलेलं रेशीमकाम! मुग्धाच्या धाडसाचं कौतुक म्हणून मिळालेली ही साडी मुग्धासाठी खूपच खास आहे. इतकी खास, की मुग्धाच्या लेह-लडाखच्या ‘बाईक-राईड’बद्दल ‘चतुरंग प्रतिष्ठान’नं आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी मुग्धा हीच साडी नेसून गेली होती. मुग्धाची धडाडी आणि सायलीची कौतुक करण्याची ही अदा- या दोन धाग्यांची एक घट्ट वीण म्हणजे ही साडी- जी मुग्धासाठी कायमच स्पेशल राहील!  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

'मुग्धाची डॅशिंग गोष्ट' ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेची संवादलेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे हिचं हास्य पण नावाप्रमाणेच एकदम मुग्ध करणारं आहे. तिच्या हास्याप्रमाणेच तिच्या लेखनातही एक अफलातून जादू आहे. अशा या प्रतिभाशाली आणि दर्जेदार लेखिकेच्या आवडी-निवडीही दर्जेदार आहेत. लेखन आणि अभिनय क्षेत्रात अतिशय व्यस्त असूनसुद्धा तिला छान छान साड्या नेसायला, साड्या खरेदी करायला, त्या भेट म्हणून द्यायला आणि जतन करून संग्रह करायला जाम आवडतात. तिच्याकडे म्हणे असंख्य साड्या आहेत... पण या तिच्या असंख्य साड्यांमध्ये तिची अतिशय खास अशी एक साडी आहे...  साडी नेसायला कोणत्याही कारणाची वाट न बघणारी, अगदी सहज, मूड आला म्हणून साडी नेसणारी लाघवी हास्य, स्वप्नाळू डोळ्यांची आणि मधाळ बोलणारी मुग्धा तितकीच ‘डॅशिंग’ पण आहे! जून २०१९ मध्ये ही रणरागिणी चक्क ३५० सीसीची ‘रॉयल एन्फिल्ड’ बाईक चालवत ८ दिवसांच्या लेह लडाखच्या फेरफटक्याला गेली होती! तिच्या त्या ‘अमेझिंग’ अनुभवाचा ब्लॉग, सायली राजाध्यक्ष हिनं वाचला. सायली म्हणजे अतिशय सुंदर साड्यांचा संग्रह असलेला एक लोकप्रिय ब्रँड. तर मुग्धाचा तो थरार वाचून सायली इतकी प्रभावित झाली, की तिनं मुग्धाचा पत्ता मागवून घेतला आणि चक्क तिच्या स्वतःच्या ब्रँडची एक मस्त खणाची साडी मुग्धाला भेट म्हणून पाठवून दिली. मुग्धाला तो आश्चर्याचा धक्का होता.  हेही वाचा : केरळची ‘कसावू’ साडीप्रिय मुग्धा तर हरखूनच गेली. खणाची सुंदर साडी, त्यावर सायलीनं केलेलं रेशीमकाम! मुग्धाच्या धाडसाचं कौतुक म्हणून मिळालेली ही साडी मुग्धासाठी खूपच खास आहे. इतकी खास, की मुग्धाच्या लेह-लडाखच्या ‘बाईक-राईड’बद्दल ‘चतुरंग प्रतिष्ठान’नं आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी मुग्धा हीच साडी नेसून गेली होती. मुग्धाची धडाडी आणि सायलीची कौतुक करण्याची ही अदा- या दोन धाग्यांची एक घट्ट वीण म्हणजे ही साडी- जी मुग्धासाठी कायमच स्पेशल राहील!  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38JwA3E

No comments:

Post a Comment