महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवछत्रपती क्रीडा संकुल व पुणे शहरालगत असल्याने निमशहरी रूप असलेल्या महाळुंगे (पाडाळे) येथील दिवसेंदिवस होत चाललेली अर्निबंध बांधकामे, रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे या मुख्य समस्यांबरोबरच कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न ग्रामस्थांना भेडसावत आहे. मूळ लोकसंख्येच्या कैकपटीने स्थलांतरित, शेतमजूर व भाड्याने राहणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर गावाचा  सर्वांगीण विकास होईल, ही अपेक्षा येथील रहिवासी बाळगून  आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ६४७२ ही लोकसंख्या असून अधिकृत नोंद नसलेल्यांची संख्या तीस हजारांहून अधिक झाली आहे. या गावातील सरपंचपद शिवसेनेकडे असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा प्रभाव असल्याने येत्या महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली, तर त्यांची ताकद वाढू शकते. असे असले तरी भाजपनेही आपला पाया मजबूत करायला सुरवात केली आहे. ग्रामपंचायतीने पीएमआरडीएच्या माध्यमातून नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे, परंतु पाणी वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने अनेकांनी बेकायदेशीर नळजोडणी करून विजपंपाचा वापर करून पाण्याचा उपसा केला जात आहे. नळजोडणीचे सर्व्हेक्षण करून नियमानुसार नळजोड  देणे आवश्‍यक आहे, अस नागरिकांचे म्हणणे आहे. वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? यापूर्वी समाविष्ट अकरा गावांसारखी आमची अवस्था होऊ नये, यासाठी गावाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा. बांधकामे नियमित करण्यासह सुरळीत पाणीपुरवठा केला जावा.  - मयूर भांडे, सरपंच, महाळुंगे (पाडाळे) पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  ग्रामस्थ म्हणतात...  लक्ष्मण पाडाळे - गावातील बेकायदा बांधकामांमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर अग्निशामक दलाची गाडी, रुग्णवाहिका पोहचणे अवघड आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासह अवैधपणे चाललेल्या कामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकाच सक्षम आहे. महापालिकेत झालेला समावेश ही चांगली बाब आहे. वाघोलीकरांना वेध विकासाचे  रोहित सुरतवाला (व्यावसायिक) - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टॅंकरद्वारेच पाणी घ्यावे लागते. त्यावर लाखो रुपये महिन्याकाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर किमान पाण्याची समस्या सुटावी. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले अतिक्रमण यावरही अंकुश यायला हवा.  रोहिणी बाबासाहेब सुतार (गृहिणी) - सांडपाणी विनाप्रक्रिया उघड्यावर सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर आरक्षण टाकू नये, यावर विचार व्हावा.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात... ३० हजारपेक्षा अधिक  - लोकसंख्या ५२३.९५ हेक्‍टर - क्षेत्रफळ सरपंच - मयूर भांडे (शिवसेना) अंतर - पुणे स्टेशनपासून १४ किलोमीटर गावाचे वेगळेपण : पुण्यालगत असल्याने निमशहरीपणा, गावात प्राचीन महादेव मंदिर, तळजाई मंदिर (उद्याच्या अंकात वाचा  मांजरी बुद्रुक​ गावाचा लेखाजोखा.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवछत्रपती क्रीडा संकुल व पुणे शहरालगत असल्याने निमशहरी रूप असलेल्या महाळुंगे (पाडाळे) येथील दिवसेंदिवस होत चाललेली अर्निबंध बांधकामे, रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे या मुख्य समस्यांबरोबरच कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न ग्रामस्थांना भेडसावत आहे. मूळ लोकसंख्येच्या कैकपटीने स्थलांतरित, शेतमजूर व भाड्याने राहणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर गावाचा  सर्वांगीण विकास होईल, ही अपेक्षा येथील रहिवासी बाळगून  आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ६४७२ ही लोकसंख्या असून अधिकृत नोंद नसलेल्यांची संख्या तीस हजारांहून अधिक झाली आहे. या गावातील सरपंचपद शिवसेनेकडे असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा प्रभाव असल्याने येत्या महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली, तर त्यांची ताकद वाढू शकते. असे असले तरी भाजपनेही आपला पाया मजबूत करायला सुरवात केली आहे. ग्रामपंचायतीने पीएमआरडीएच्या माध्यमातून नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे, परंतु पाणी वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने अनेकांनी बेकायदेशीर नळजोडणी करून विजपंपाचा वापर करून पाण्याचा उपसा केला जात आहे. नळजोडणीचे सर्व्हेक्षण करून नियमानुसार नळजोड  देणे आवश्‍यक आहे, अस नागरिकांचे म्हणणे आहे. वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? यापूर्वी समाविष्ट अकरा गावांसारखी आमची अवस्था होऊ नये, यासाठी गावाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा. बांधकामे नियमित करण्यासह सुरळीत पाणीपुरवठा केला जावा.  - मयूर भांडे, सरपंच, महाळुंगे (पाडाळे) पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  ग्रामस्थ म्हणतात...  लक्ष्मण पाडाळे - गावातील बेकायदा बांधकामांमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर अग्निशामक दलाची गाडी, रुग्णवाहिका पोहचणे अवघड आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासह अवैधपणे चाललेल्या कामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकाच सक्षम आहे. महापालिकेत झालेला समावेश ही चांगली बाब आहे. वाघोलीकरांना वेध विकासाचे  रोहित सुरतवाला (व्यावसायिक) - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टॅंकरद्वारेच पाणी घ्यावे लागते. त्यावर लाखो रुपये महिन्याकाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर किमान पाण्याची समस्या सुटावी. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले अतिक्रमण यावरही अंकुश यायला हवा.  रोहिणी बाबासाहेब सुतार (गृहिणी) - सांडपाणी विनाप्रक्रिया उघड्यावर सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर आरक्षण टाकू नये, यावर विचार व्हावा.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दृष्टिक्षेपात... ३० हजारपेक्षा अधिक  - लोकसंख्या ५२३.९५ हेक्‍टर - क्षेत्रफळ सरपंच - मयूर भांडे (शिवसेना) अंतर - पुणे स्टेशनपासून १४ किलोमीटर गावाचे वेगळेपण : पुण्यालगत असल्याने निमशहरीपणा, गावात प्राचीन महादेव मंदिर, तळजाई मंदिर (उद्याच्या अंकात वाचा  मांजरी बुद्रुक​ गावाचा लेखाजोखा.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nKal1S

No comments:

Post a Comment