इचलकरंजीत ब्रेक फेल एसटीचा थरार ; चालकाने बस चढविली दुभाजकावर इचलकरंजी - भरधाव एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे आज सकाळी फिल्टर हाउसजवळ थरार निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत चालकाने बस थेट दुभाजकावर घातली. याच दरम्यान बसने दोन दुचाकींना धडक दिल्याने तिघे जखमी झाले. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.  नृसिंहवाडीहून अब्दुललाटमार्गे सात प्रवासी घेऊन एसटी बस येथील मध्यवर्ती बसस्थानकात येत होती. जुन्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या इमारतीनजीक दुचाकीस्वार आडवा आल्यामुळे चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. यानंतर प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकाने फिल्टर हाऊसनजीक आल्यानंतर थेट बस दुभाजकांवर घातली. या वेळी बस दुभाजकाच्या मध्यभागी आल्याने जागेवर थांबली.  याच दरम्यान, एसटी बसची दोन दुचाकींना धडक बसली. यामध्ये शेखर राजाराम बडगुजर (घोरपडे नाट्यगृहानजीक), गौरय्या लचय्या अडीगोपूळ (पाटील मळा, सांगली रोड), महेश किसनगोपाल सारडा (महेशनगर) जखमी झाले.  हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न   जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुभाजकावर अडकलेली एसटी बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 9, 2021

इचलकरंजीत ब्रेक फेल एसटीचा थरार ; चालकाने बस चढविली दुभाजकावर इचलकरंजी - भरधाव एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे आज सकाळी फिल्टर हाउसजवळ थरार निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत चालकाने बस थेट दुभाजकावर घातली. याच दरम्यान बसने दोन दुचाकींना धडक दिल्याने तिघे जखमी झाले. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.  नृसिंहवाडीहून अब्दुललाटमार्गे सात प्रवासी घेऊन एसटी बस येथील मध्यवर्ती बसस्थानकात येत होती. जुन्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या इमारतीनजीक दुचाकीस्वार आडवा आल्यामुळे चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. यानंतर प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकाने फिल्टर हाऊसनजीक आल्यानंतर थेट बस दुभाजकांवर घातली. या वेळी बस दुभाजकाच्या मध्यभागी आल्याने जागेवर थांबली.  याच दरम्यान, एसटी बसची दोन दुचाकींना धडक बसली. यामध्ये शेखर राजाराम बडगुजर (घोरपडे नाट्यगृहानजीक), गौरय्या लचय्या अडीगोपूळ (पाटील मळा, सांगली रोड), महेश किसनगोपाल सारडा (महेशनगर) जखमी झाले.  हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न   जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुभाजकावर अडकलेली एसटी बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3sdnzaM

No comments:

Post a Comment