आजीला पुन्हा मिळाला आधार; पोलिसांनी मुलींना शिकवली कायद्याची भाषा पुणे - त्या ज्येष्ठ महिलेला चार मुली, चार जावई अन्‌ नातवंडांचा भलामोठा गोतावळा आहे, पण इतके सर्वजण असूनही त्यांचा सांभाळ करण्याची कोणाची इच्छा नव्हती. म्हणून त्या महिलेने घर सोडले. एक-एक शहर करीत त्या पुण्यात आल्या. शनिवारपेठेतील एका पदपथावर राहून, मिळेल ते अन्न खावून दिवस ढकलू लागल्या. पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरीक कक्षाच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. त्यांनी त्यांच्या मुलींशी संपर्क साधून त्यांना ‘कायद्याची भाषा’ शिकवली. त्यानंतर मुलींनी आपली चूक मान्य करीत, तब्बल दोन वर्षांनी आईला पुन्हा एकदा घरात स्थान दिले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे आजी पुन्हा आपल्या माणसात पोचल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शनिवार पेठेतील एका दुकानाच्या कठड्यासमोर एक ज्येष्ठ महिला काही दिवसांपासून थकलेल्या अवस्थेत बसून असल्याची खबर संतोष खाटपे यांनी ज्येष्ठ नागरीक कक्षाला दिली. पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक स्वाती केदार, पोलिस कर्मचारी जयश्री जाधव यांच्या पथकाने महिलेचा शोध घेतला. त्यावेळी शनिवार पेठेतील वर्तक गार्डनच्याकडेला असलेल्या एका दुकानासमोर महिला आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केली.  कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप या ज्येष्ठ महिलेस चार मुली व जावई आहेत. मात्र, त्यांनी महिलेचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही महिला घर सोडून शनिवार पेठेत राहू लागली. लोकांकडून देण्यात येणारे अन्न खाऊन त्या एक-एक दिवस काढत होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांचे खूप हाल होत असल्याचे तसेच त्यांना त्यांच्या मुली व नातवंडासमवेत राहाण्याची इच्छा या महिलेने पोलिसांकडे बोलून दाखविली. पोलिसांनी महिलेच्या मुली व जावयांचा शोध घेतला. ज्येष्ठ नागरिकांना सोडून देणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर मुली व जावयांनीही महिलेचा सांभाळ करण्याची ग्वाही देत महिलेची माफी मागितली.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

आजीला पुन्हा मिळाला आधार; पोलिसांनी मुलींना शिकवली कायद्याची भाषा पुणे - त्या ज्येष्ठ महिलेला चार मुली, चार जावई अन्‌ नातवंडांचा भलामोठा गोतावळा आहे, पण इतके सर्वजण असूनही त्यांचा सांभाळ करण्याची कोणाची इच्छा नव्हती. म्हणून त्या महिलेने घर सोडले. एक-एक शहर करीत त्या पुण्यात आल्या. शनिवारपेठेतील एका पदपथावर राहून, मिळेल ते अन्न खावून दिवस ढकलू लागल्या. पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरीक कक्षाच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. त्यांनी त्यांच्या मुलींशी संपर्क साधून त्यांना ‘कायद्याची भाषा’ शिकवली. त्यानंतर मुलींनी आपली चूक मान्य करीत, तब्बल दोन वर्षांनी आईला पुन्हा एकदा घरात स्थान दिले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे आजी पुन्हा आपल्या माणसात पोचल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शनिवार पेठेतील एका दुकानाच्या कठड्यासमोर एक ज्येष्ठ महिला काही दिवसांपासून थकलेल्या अवस्थेत बसून असल्याची खबर संतोष खाटपे यांनी ज्येष्ठ नागरीक कक्षाला दिली. पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक स्वाती केदार, पोलिस कर्मचारी जयश्री जाधव यांच्या पथकाने महिलेचा शोध घेतला. त्यावेळी शनिवार पेठेतील वर्तक गार्डनच्याकडेला असलेल्या एका दुकानासमोर महिला आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केली.  कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप या ज्येष्ठ महिलेस चार मुली व जावई आहेत. मात्र, त्यांनी महिलेचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही महिला घर सोडून शनिवार पेठेत राहू लागली. लोकांकडून देण्यात येणारे अन्न खाऊन त्या एक-एक दिवस काढत होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांचे खूप हाल होत असल्याचे तसेच त्यांना त्यांच्या मुली व नातवंडासमवेत राहाण्याची इच्छा या महिलेने पोलिसांकडे बोलून दाखविली. पोलिसांनी महिलेच्या मुली व जावयांचा शोध घेतला. ज्येष्ठ नागरिकांना सोडून देणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर मुली व जावयांनीही महिलेचा सांभाळ करण्याची ग्वाही देत महिलेची माफी मागितली.  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YqlY40

No comments:

Post a Comment