सावंतवाडीत लवकरच "मत्स्य महोत्सव"  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.  महोत्सवाचे उद्‌घाटन भाजप प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. 6 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभ माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  श्री. काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोजन प्रमुख नगराध्यक्ष संजू परब, निलक्रांती मत्स्य सहकारी संस्थेचे रविकिरण तोरसकर, भाजप जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, सावंतवाडी प्रभारी राजू राऊळ, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, अमित परब आदी उपस्थित होते.  काळसेकर म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउन काळात अनेक उद्योगांवर परिणाम झाला. यात व्यापारी शेतकरी मच्छीमार व सर्वसामान्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे रोजगाराचे नवे दालन उत्पन्न व्हावे, या उद्देशाने या मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांची चव बदलावी व लोकांसाठी माशांचे नवे दालन उभे राहावे यासाठीच हा प्रयत्न आहे. या महोत्सवात गोवा व महाराष्ट्रातील फाईव्हस्टार हॉटेलचे कुक सहभागी होणार असून हॉटेल व्यावसायिक व स्थानिक कुक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या "बर्ड फ्लू'च्या पार्श्‍वभूमीवर चिकनला पर्याय म्हणून गोड्या पाण्यातील मासळीचा पर्याय लोकांना उपलब्ध करून देतानाच गोड्या पाण्यातील मासळीपासून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 20 डिशेस तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. माशांचे लाईव्ह विक्री केंद्र व लाईव्ह पाककृती ही येथे उपलब्ध होणार आहेत.''  विविध स्पर्धांचे आयोजन  ते पुढे म्हणाले, ""या महोत्सवाच्या माध्यमातून माशांशी संबंधित विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहेत. यात 5 फेब्रुवारीला मत्स्य चित्र व मत्स्य शिल्प स्पर्धा, 6 फेब्रुवारीला महिलांसाठी मत्स्य पाककला स्पर्धा, खुली मत्स्य फोटोग्राफी स्पर्धा तसेच वैयक्तिक कोळी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून या स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील "बासा' या माशाचे "चिली फिश' नामकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सत्कार सोहळाही  महोत्स्वाच्यानिमित्ताने मत्स्य खाद्य जत्रा, रेडी टू इट, शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती, जिवंत मत्स्य विक्री केंद्र, मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून आत्मनिर्भर फेरीवाला कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा व ही योजना मोठ्या प्रमाणात राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नगराध्यक्ष परब यांचा व आत्मनिर्भर योजनेचे अधिकारी पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.''  महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन  सावंतवाडी येथे 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या मत्स्य महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मत्स्य महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सिंधू आत्म निर्भर योजना संयोजक तथा जिल्हा बॅंक संचालक श्री. काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

सावंतवाडीत लवकरच "मत्स्य महोत्सव"  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.  महोत्सवाचे उद्‌घाटन भाजप प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. 6 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभ माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  श्री. काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोजन प्रमुख नगराध्यक्ष संजू परब, निलक्रांती मत्स्य सहकारी संस्थेचे रविकिरण तोरसकर, भाजप जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, सावंतवाडी प्रभारी राजू राऊळ, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, अमित परब आदी उपस्थित होते.  काळसेकर म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाउन काळात अनेक उद्योगांवर परिणाम झाला. यात व्यापारी शेतकरी मच्छीमार व सर्वसामान्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे रोजगाराचे नवे दालन उत्पन्न व्हावे, या उद्देशाने या मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांची चव बदलावी व लोकांसाठी माशांचे नवे दालन उभे राहावे यासाठीच हा प्रयत्न आहे. या महोत्सवात गोवा व महाराष्ट्रातील फाईव्हस्टार हॉटेलचे कुक सहभागी होणार असून हॉटेल व्यावसायिक व स्थानिक कुक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या "बर्ड फ्लू'च्या पार्श्‍वभूमीवर चिकनला पर्याय म्हणून गोड्या पाण्यातील मासळीचा पर्याय लोकांना उपलब्ध करून देतानाच गोड्या पाण्यातील मासळीपासून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 20 डिशेस तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. माशांचे लाईव्ह विक्री केंद्र व लाईव्ह पाककृती ही येथे उपलब्ध होणार आहेत.''  विविध स्पर्धांचे आयोजन  ते पुढे म्हणाले, ""या महोत्सवाच्या माध्यमातून माशांशी संबंधित विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहेत. यात 5 फेब्रुवारीला मत्स्य चित्र व मत्स्य शिल्प स्पर्धा, 6 फेब्रुवारीला महिलांसाठी मत्स्य पाककला स्पर्धा, खुली मत्स्य फोटोग्राफी स्पर्धा तसेच वैयक्तिक कोळी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून या स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील "बासा' या माशाचे "चिली फिश' नामकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सत्कार सोहळाही  महोत्स्वाच्यानिमित्ताने मत्स्य खाद्य जत्रा, रेडी टू इट, शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती, जिवंत मत्स्य विक्री केंद्र, मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून आत्मनिर्भर फेरीवाला कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा व ही योजना मोठ्या प्रमाणात राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नगराध्यक्ष परब यांचा व आत्मनिर्भर योजनेचे अधिकारी पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.''  महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन  सावंतवाडी येथे 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या मत्स्य महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मत्स्य महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सिंधू आत्म निर्भर योजना संयोजक तथा जिल्हा बॅंक संचालक श्री. काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39A5CvK

No comments:

Post a Comment