जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन  कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला.  यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले.  संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले.  यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते.  जिकरीचे काम  सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे.  तणावामध्ये भरच  जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले.  परिपत्रकाची भाषा कठीण  सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

जीएसटी जाचक तरतुदींविरोधात आंदोलन  कुडाळ (सिंधुदुर्ग) - देशातील विविध कर-सल्लागार, व्यापारी व उद्योजक संघटनांतर्फे जीएसटी जाचक तरतुदींविरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील वस्तू व सेवा कर कार्यालयासमोर निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार्टर्ड अकाउंटंट्‌स, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर, इन्कम टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन व कंजूमर प्रोडक्‍स डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला.  यावेळी व्यापाऱ्यांच्यावतीने अरविंद नेवाळकर व विवेक नेवाळकर यांनी तरतुदींविरोधात मते मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सीए सागर तेली यांनी जीएसटी कायदा सरळ व सोपा करावा व करदात्यांवर जटील तरतुदी आणि अनुपालनाचे ओझे लादू नये, असे मत मांडले. भारतातील सर्व व्यावसायिक कर कायद्याचे पालन कसे करावे याबद्दल नेहमीच तणावात आणि संभ्रमात असतात असेही सांगितले.  संस्थेचे सदस्य सीए सुधीर नाईक व सीए हर्षल नाडकर्णी यांनीही मते मांडली. या आंदोलनात जीएसटी व इन्कम टॅक्‍स कर कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे निवेदन जीएसटी प्रॅक्‍टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे डेप्यूटी कमिशनर प्रताप आजगेकर यांना देण्यात आले.  यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद जांभेकर, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सेक्रेटरी सीए जयंती कुलकर्णी, संस्थेचे सदस्य ऍड विनायक जांभेकर, सीए शैलेश मुंडये, सीए विवेक धुरी, सीए जबक मालदार, सीए दामोदर खानोलकर, सीए नीलकंठ मराठे, नागेश नाईक, सीए सुधाकर परांजपे, सीए दर्शना देसाई, सीए लक्ष्मण नाईक, राजेंद्र डोंगरे, सदानंद बांदेकर, गोपाल वावळीये, शंकर तेजम, सदानंद सामंत, मनोज माठेकर, राहुल वरसकर आदी सदस्य उपस्थित होते.  जिकरीचे काम  सीए अशोक सारंग म्हणाले, ""जीएसटी कायद्याअंतर्गत व्यापारी व उद्योजकांना न परवडणारी लेट फी व न परवडणारे व्याजदर 18 ते 24 टक्के आकारले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व धंद्यातील अडचणींचा विचार न करता जीएसटीचे रजिस्ट्रेशन, विवरण पत्र न भरल्याने रद्द करण्यात येत आहे. जीएसटी कायदा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे पंधराशे नोटिफिकेशन्स व परिपत्रके काढली आहेत. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत व्यापाऱ्यांना सल्ला देणे हे कर सल्लागार व सनदी लेखापालांसाठी जिकरीचे काम बनले आहे.  तणावामध्ये भरच  जीएसटी कायदा अंतर्गत जीएसटी रिटर्नमध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची किंवा सुधारित माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामाच्या तणावामध्ये भर पडते. मोठे व छोटे व्यापारी प्रत्येकासाठी नियम समान आहेत, मोठ्या कंपन्यांकडे कर कायद्याचे पालन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे; परंतु लहान आणि मध्यम व्यवसायिकांना कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्या मदतीची आवश्‍यकता आहे, असे सारंग म्हणाले.  परिपत्रकाची भाषा कठीण  सरकार आणि व्यापारी समुदायामधील दुवा हा कर सल्लागार आहे. सरकारी कायदे, नियम, विधान, परिपत्रकांची भाषा संदिग्ध आहे आणि ती समजणे फार कठीण आहे. या सर्व जबाबदाऱ्या कर सल्लागार पार पाडून व्यापाऱ्यांना त्या सोप्या भाषेत समजावून आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्पष्ट करतात, असे सारंग यांनी सांगितले. संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pBFI0o

No comments:

Post a Comment