गटार बुजविण्याची ठेकेदारावर ओढवली नामुष्की कणकवली (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरणाचे नियम-निकष धाब्यावर बसवून पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार बुजविण्याची वेळ महामार्ग ठेकेदारावर आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हे चुकीचे बांधकाम रोखले गेले. महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतरावर हे गटार बांधकाम होत असल्याने शहरातील पटवर्धन चौकातील रस्ता अरुंद होणार होता; मात्र आता गटार बांधकाम थांबल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्‍त झाले.  शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पटवर्धन चौकात अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. महामार्ग चौपदरीकरणात महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतर सोडून गटार बांधकाम आणि त्यावर फुटपाथचे बांधकाम करणे अपेक्षित होते; मात्र महामार्ग ठेकेदाराने पटवर्धन चौकात महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतर सोडून गटार बांधकाम सुरू केले होते. या बांधकामामुळे पटवर्धन चौकातील सेवा रस्ता आणखी अरुंद होणार होता.  ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी जागेवर येऊन गटाराचे बांधकाम थांबवले होते. येथील जागेची मोजणी करण्यासही ठेकेदाराला भाग पाडले होते. या मोजणीमध्ये पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्‍समधील दर्शनी भागातील दुकानगाळ्यांचा काही भाग बाधित होत असल्याचे निदर्शनास आले.  भविष्यातील अडचण दूर  चुकीच्या गटार बांधकामामुळे सेवा रस्ता अरुंद होणार होता. शहरातील जलवाहिनी, भूमिगत वीज वाहिनी आणि नियोजित गॅस वाहिनी टाकण्यामध्येही पुढील काळात अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे चुकीचे गटार बांधकाम पाडून नव्याने महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतरावर गटाराचे बांधकाम करा, असे निर्देश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग ठेकेदाराला दिले होते. त्यानुसार आज दुपारी पटवर्धन चौकातील सिमेंट क्रॉंक्रिटचे बांधकाम तोडून बुजविण्यात आले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

गटार बुजविण्याची ठेकेदारावर ओढवली नामुष्की कणकवली (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरणाचे नियम-निकष धाब्यावर बसवून पटवर्धन चौकात बांधण्यात आलेले गटार बुजविण्याची वेळ महामार्ग ठेकेदारावर आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हे चुकीचे बांधकाम रोखले गेले. महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतरावर हे गटार बांधकाम होत असल्याने शहरातील पटवर्धन चौकातील रस्ता अरुंद होणार होता; मात्र आता गटार बांधकाम थांबल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्‍त झाले.  शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पटवर्धन चौकात अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. महामार्ग चौपदरीकरणात महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतर सोडून गटार बांधकाम आणि त्यावर फुटपाथचे बांधकाम करणे अपेक्षित होते; मात्र महामार्ग ठेकेदाराने पटवर्धन चौकात महामार्ग हद्दीपासून तीन मिटर अंतर सोडून गटार बांधकाम सुरू केले होते. या बांधकामामुळे पटवर्धन चौकातील सेवा रस्ता आणखी अरुंद होणार होता.  ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी जागेवर येऊन गटाराचे बांधकाम थांबवले होते. येथील जागेची मोजणी करण्यासही ठेकेदाराला भाग पाडले होते. या मोजणीमध्ये पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्‍समधील दर्शनी भागातील दुकानगाळ्यांचा काही भाग बाधित होत असल्याचे निदर्शनास आले.  भविष्यातील अडचण दूर  चुकीच्या गटार बांधकामामुळे सेवा रस्ता अरुंद होणार होता. शहरातील जलवाहिनी, भूमिगत वीज वाहिनी आणि नियोजित गॅस वाहिनी टाकण्यामध्येही पुढील काळात अडचणी निर्माण होणार होत्या. त्यामुळे चुकीचे गटार बांधकाम पाडून नव्याने महामार्ग हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतरावर गटाराचे बांधकाम करा, असे निर्देश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग ठेकेदाराला दिले होते. त्यानुसार आज दुपारी पटवर्धन चौकातील सिमेंट क्रॉंक्रिटचे बांधकाम तोडून बुजविण्यात आले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pDtOmU

No comments:

Post a Comment