अनियमितता नव्हे, अपहारच ः वैभववाडी सभापती वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तूचा वापर करून त्यावर हजारो रुपये अधिकाऱ्यांनी उकळले ही प्रशासकीय अनियमितता नसून हा आर्थिक अपहार आहे. त्यामुळे प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून कुणाही अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करू नये, असे खरमरीत पत्र पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांना पाठविले आहे.  राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत 15 व 16 नोव्हेंबर 2019 ला पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात केले होते. या कार्यक्रमावर 1 लाख 31 हजार 520 रुपये खर्च दाखवून अपहार केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर पंचायत समितीच्या तीन सभांमध्ये त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर एकदा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भातदेखील आक्षेप नोंदविल्यानंतर चौकशी अधिकारी दीपाली पाटील यांनी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसमक्ष चौकशी केली.  दरम्यान, पत्रात त्यांनी म्हटले आहे, की स्थायी समितीत केलेला खुलासा वर्तमानपत्रातील बातमीच्या माध्यमातून आमच्या वाचनात आला. हा खुलासा धक्कादायक आहे. आर्थिक अपहार आणि प्रशासकीय अनियमितता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम, प्रोजेक्‍टर, व्हिडिओ शूटिंग कॅमेरा वापरण्यात आला होता. या तीन वस्तूंची खोटी बिले जोडून त्यावर हजारो रुपये अधिकाऱ्यांनी उकळल्याचे चौकशी अधिकारी श्रीमती पाटील यांच्यासमक्ष स्पष्ट झाले. ज्या पुरवठादाराचे बिल जोडले आहे, त्याने चौकशी अधिकारी आणि आमच्या समक्षच आपण कधीही पंचायत समितीला साऊंड सिस्टीम पुरविलेली नाही, असा जबाब दिला आहे. त्यामुळे या तीन वस्तूंवर दाखविलेली रक्कम अधिकाऱ्यांनी हडप केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हा आर्थिक अपहार आहे. याशिवाय चहा, नाश्‍ता, जेवण पुरविणाऱ्या पुरवठादाराने आपण किती रक्कम कुणाच्या सांगण्यावरून कुणाकडे आणि कधी दिली हे चौकशी अधिकाऱ्यांसमोर आणि आम्हा पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सांगितले. सुरमई जेवण कधीही पुरविलेले नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. त्यामुळे हा देखील आर्थिक अपहाराचाच भाग आहे. स्टेशनरीची किंमत बाजारभावातील दरापेक्षा 20 ते 30 पट अधिक दाखवून लूट केली असून हा देखील आर्थिक अपहारच आहे. हा आर्थिक अपहार पचविण्याच्या हेतूने दोन जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थिती नोंदवहीत खोट्या स्वाक्षऱ्या करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी केले आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीदेखील आपण प्रशासकीय अनियमितता अशा गोंडस नावाखाली अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करून पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्याचे काम करीत आहात. या प्रकरणात थेट अपहार केल्याचे स्पष्ट झालेले असून देखील अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार नसेल तर अपहार केला तरी कोणतीही कारवाई होत नाही, असा संदेश समाजात जाणार आहे. त्यामुळे अपहार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.  ..अन्‌ पदाधिकारी संतप्त  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत हा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी हा आर्थिक अपहार नसून प्रशासकीय अनियमितता आहे, त्याबाबत त्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या स्पष्टीकरणानंतर सभापती डाफळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी संतप्त झाले आहेत. याबाबत सभापती सौ. डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र पाठविले आहे.  प्रकार गंभीर; गप्प बसणार नाही  या प्रकरणात अधिकाऱ्यांनी थेट भ्रष्टाचार केला आहे. सर्वच बाबतीत अपहार आहे; परंतु पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तू वापरून खोटी बिले जोडून हजारो रुपये उकळले आहेत, असा स्पष्ट अपहार सिद्ध होत असताना जर जिल्हा प्रशासन कारवाई करणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रकार गंभीर असून आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

अनियमितता नव्हे, अपहारच ः वैभववाडी सभापती वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तूचा वापर करून त्यावर हजारो रुपये अधिकाऱ्यांनी उकळले ही प्रशासकीय अनियमितता नसून हा आर्थिक अपहार आहे. त्यामुळे प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून कुणाही अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करू नये, असे खरमरीत पत्र पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांना पाठविले आहे.  राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत 15 व 16 नोव्हेंबर 2019 ला पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात केले होते. या कार्यक्रमावर 1 लाख 31 हजार 520 रुपये खर्च दाखवून अपहार केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर पंचायत समितीच्या तीन सभांमध्ये त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर एकदा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भातदेखील आक्षेप नोंदविल्यानंतर चौकशी अधिकारी दीपाली पाटील यांनी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसमक्ष चौकशी केली.  दरम्यान, पत्रात त्यांनी म्हटले आहे, की स्थायी समितीत केलेला खुलासा वर्तमानपत्रातील बातमीच्या माध्यमातून आमच्या वाचनात आला. हा खुलासा धक्कादायक आहे. आर्थिक अपहार आणि प्रशासकीय अनियमितता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम, प्रोजेक्‍टर, व्हिडिओ शूटिंग कॅमेरा वापरण्यात आला होता. या तीन वस्तूंची खोटी बिले जोडून त्यावर हजारो रुपये अधिकाऱ्यांनी उकळल्याचे चौकशी अधिकारी श्रीमती पाटील यांच्यासमक्ष स्पष्ट झाले. ज्या पुरवठादाराचे बिल जोडले आहे, त्याने चौकशी अधिकारी आणि आमच्या समक्षच आपण कधीही पंचायत समितीला साऊंड सिस्टीम पुरविलेली नाही, असा जबाब दिला आहे. त्यामुळे या तीन वस्तूंवर दाखविलेली रक्कम अधिकाऱ्यांनी हडप केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हा आर्थिक अपहार आहे. याशिवाय चहा, नाश्‍ता, जेवण पुरविणाऱ्या पुरवठादाराने आपण किती रक्कम कुणाच्या सांगण्यावरून कुणाकडे आणि कधी दिली हे चौकशी अधिकाऱ्यांसमोर आणि आम्हा पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सांगितले. सुरमई जेवण कधीही पुरविलेले नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. त्यामुळे हा देखील आर्थिक अपहाराचाच भाग आहे. स्टेशनरीची किंमत बाजारभावातील दरापेक्षा 20 ते 30 पट अधिक दाखवून लूट केली असून हा देखील आर्थिक अपहारच आहे. हा आर्थिक अपहार पचविण्याच्या हेतूने दोन जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थिती नोंदवहीत खोट्या स्वाक्षऱ्या करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी केले आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीदेखील आपण प्रशासकीय अनियमितता अशा गोंडस नावाखाली अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करून पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्याचे काम करीत आहात. या प्रकरणात थेट अपहार केल्याचे स्पष्ट झालेले असून देखील अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार नसेल तर अपहार केला तरी कोणतीही कारवाई होत नाही, असा संदेश समाजात जाणार आहे. त्यामुळे अपहार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.  ..अन्‌ पदाधिकारी संतप्त  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत हा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी हा आर्थिक अपहार नसून प्रशासकीय अनियमितता आहे, त्याबाबत त्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या स्पष्टीकरणानंतर सभापती डाफळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी संतप्त झाले आहेत. याबाबत सभापती सौ. डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र पाठविले आहे.  प्रकार गंभीर; गप्प बसणार नाही  या प्रकरणात अधिकाऱ्यांनी थेट भ्रष्टाचार केला आहे. सर्वच बाबतीत अपहार आहे; परंतु पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तू वापरून खोटी बिले जोडून हजारो रुपये उकळले आहेत, असा स्पष्ट अपहार सिद्ध होत असताना जर जिल्हा प्रशासन कारवाई करणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रकार गंभीर असून आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3b20n9j

No comments:

Post a Comment