जपान आणि संधी : सुरक्षित जपान जपानमधील प्रत्येक नागरिक हा प्रामाणिक आहे, असे आपण ऐकत असतो. माझे मित्र एकदा वाढदिवसासाठी जाताना सबवे ट्रेनमध्ये पॅक केलेले गिफ्ट विसरले आणि तसेच वाढदिवसाच्या ठिकाणी पोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपण गिफ्ट तर ट्रेनमध्येच विसरलो आहोत. त्यांनी लगेच सबवे स्टेशनला फोन केला आणि गिफ्टचे वर्णन सांगितले. सबवेच्या कर्मचाऱ्यांनी ते गिफ्ट ३० मिनिटांमध्ये स्टेशनवर येऊन घेऊन जा, असे सांगितले. आणि त्यांना ते ३० मिनिटांमध्ये मिळालेसुद्धा. त्यांना आपले गिफ्ट हरवून जाईल अशी शंका सुद्धा वाटली नाही. अशीच एकदा स्टेशनवर फोन करताना माझी फोनची डायरी मी फोनजवळ विसरले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या ते २ दिवसांनी लक्षात आले. मी स्टेशनवर चौकशी केली, तेव्हा मला माझी डायरी परत मिळाली. माझे बाबा एकदा एका दुकानांमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यांना जपानी भाषा अजिबात येत नव्हती. त्यांनी खरेदी केली आणि सुट्टे पैसे विसरून दुकानाच्या बाहेर पडले, तेव्हा दुकानातील मुलगा सुट्टे पैसे घेऊन धावत आला आणि त्यांना ते पैसे देऊन गेला. इतका प्रामाणिक पणा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकंदरीत, जपान हा सर्वांसाठी एक अतिशय सुरक्षित देश मानला जातो. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तो पहिल्या दहामध्ये आहे. कोणत्याही देशाप्रमाणे, जपानमध्येही अशी क्षेत्रे आहेत, जी इतरांपेक्षा कमी सुरक्षित आहेत.  मात्र, अशी ठिकाणे खूप कमी आहेत. जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. २०१९ मध्ये, खुनाचा गुन्हा करणाऱ्याचा दर दहालाख लोकांमागे केवळ ०.३ होता. जपानमध्ये कमी गुन्हेगारीचे प्रमाण असण्याचे कारण वेळोवेळी  घेतल्या गेलेल्या काही गुन्हेगारी न्यायाच्या पद्धती आहेत. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर गप्पा मारत फिरलो आहोत, किंवा ऑफिसमधून उशिरा परत आलो आहोत, परंतु त्यामुळे घराच्या कुणालाच आमची कोणतीच चिंता वाटत नव्हती.  मद्यपान आणि वाहन चालविणे जपानमध्ये ड्रिंक ड्रायव्हिंगबाबतचे धोरण अनुसरण करण्यासारखे आहे. ड्रिंक ड्रायव्हिंगला झिरो टॉलरन्स आहे, याचा अर्थ असा की आपण मद्यपान करणार असालस तर आपली कार घरीच सोडा. आपली गाडी आपल्याकडे असल्यास आपण आणि आपली कार दोघांनाही सुरक्षितपणे आणि कायदेशीररित्या, डाईकुला कॉल करून घरी परत जाण्याचा एक पर्याय आहे. टॅक्सी सेवेचा हा एक खास विभाग आहे, जो अतिरिक्त ड्रायव्हर आणतो. आपण टॅक्सीमध्ये घरी जाता  आणि आपली गाडी चालकाद्वारे सुरक्षित घरी पोचवली जाते. जपानी पोलिस स्टेशन्स (कोबान)  जपानमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनपाशी एक कोबान असतेच, तसेच बऱ्याच गर्दीच्या ठिकाणीही कोबान असतातच. हे कोबान एका छोट्या खोलीच्या आकाराचे असतात. पोलिस अगदी विश्वासू असतात आणि त्यांच्याकडे पत्ता विचारल्यास ते अगदी नीट सांगतात, हरवलेल्या वस्तूही तिथे मिळतात. मुळातच गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्यामुळे कोबानमध्ये गर्दी किंवा गोंधळ अजिबात नसतो. जपानचे पोलिस विनयशील असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला कुणालाच अजिबात भीती वाटत नाही.  मी बरीच वर्षे जपानच्या संपर्कात आहे किंवा तिथे राहिले आहे, परंतु मी कधीच माझ्या मित्रपरिवाराकडून जपानमध्ये गुन्हा अनुभवाला मिळाला, असे ऐकले नाही. म्हणूनच जपान हा कमीत कमी गुन्हे घडणारा देश आहे, याची मला खात्री आहे. जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास भाग्यच म्हणावे लागेल, परंतु किमान जपान पाहायला नक्की जा... सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा... Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

जपान आणि संधी : सुरक्षित जपान जपानमधील प्रत्येक नागरिक हा प्रामाणिक आहे, असे आपण ऐकत असतो. माझे मित्र एकदा वाढदिवसासाठी जाताना सबवे ट्रेनमध्ये पॅक केलेले गिफ्ट विसरले आणि तसेच वाढदिवसाच्या ठिकाणी पोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपण गिफ्ट तर ट्रेनमध्येच विसरलो आहोत. त्यांनी लगेच सबवे स्टेशनला फोन केला आणि गिफ्टचे वर्णन सांगितले. सबवेच्या कर्मचाऱ्यांनी ते गिफ्ट ३० मिनिटांमध्ये स्टेशनवर येऊन घेऊन जा, असे सांगितले. आणि त्यांना ते ३० मिनिटांमध्ये मिळालेसुद्धा. त्यांना आपले गिफ्ट हरवून जाईल अशी शंका सुद्धा वाटली नाही. अशीच एकदा स्टेशनवर फोन करताना माझी फोनची डायरी मी फोनजवळ विसरले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या ते २ दिवसांनी लक्षात आले. मी स्टेशनवर चौकशी केली, तेव्हा मला माझी डायरी परत मिळाली. माझे बाबा एकदा एका दुकानांमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यांना जपानी भाषा अजिबात येत नव्हती. त्यांनी खरेदी केली आणि सुट्टे पैसे विसरून दुकानाच्या बाहेर पडले, तेव्हा दुकानातील मुलगा सुट्टे पैसे घेऊन धावत आला आणि त्यांना ते पैसे देऊन गेला. इतका प्रामाणिक पणा फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकंदरीत, जपान हा सर्वांसाठी एक अतिशय सुरक्षित देश मानला जातो. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तो पहिल्या दहामध्ये आहे. कोणत्याही देशाप्रमाणे, जपानमध्येही अशी क्षेत्रे आहेत, जी इतरांपेक्षा कमी सुरक्षित आहेत.  मात्र, अशी ठिकाणे खूप कमी आहेत. जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. २०१९ मध्ये, खुनाचा गुन्हा करणाऱ्याचा दर दहालाख लोकांमागे केवळ ०.३ होता. जपानमध्ये कमी गुन्हेगारीचे प्रमाण असण्याचे कारण वेळोवेळी  घेतल्या गेलेल्या काही गुन्हेगारी न्यायाच्या पद्धती आहेत. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर गप्पा मारत फिरलो आहोत, किंवा ऑफिसमधून उशिरा परत आलो आहोत, परंतु त्यामुळे घराच्या कुणालाच आमची कोणतीच चिंता वाटत नव्हती.  मद्यपान आणि वाहन चालविणे जपानमध्ये ड्रिंक ड्रायव्हिंगबाबतचे धोरण अनुसरण करण्यासारखे आहे. ड्रिंक ड्रायव्हिंगला झिरो टॉलरन्स आहे, याचा अर्थ असा की आपण मद्यपान करणार असालस तर आपली कार घरीच सोडा. आपली गाडी आपल्याकडे असल्यास आपण आणि आपली कार दोघांनाही सुरक्षितपणे आणि कायदेशीररित्या, डाईकुला कॉल करून घरी परत जाण्याचा एक पर्याय आहे. टॅक्सी सेवेचा हा एक खास विभाग आहे, जो अतिरिक्त ड्रायव्हर आणतो. आपण टॅक्सीमध्ये घरी जाता  आणि आपली गाडी चालकाद्वारे सुरक्षित घरी पोचवली जाते. जपानी पोलिस स्टेशन्स (कोबान)  जपानमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनपाशी एक कोबान असतेच, तसेच बऱ्याच गर्दीच्या ठिकाणीही कोबान असतातच. हे कोबान एका छोट्या खोलीच्या आकाराचे असतात. पोलिस अगदी विश्वासू असतात आणि त्यांच्याकडे पत्ता विचारल्यास ते अगदी नीट सांगतात, हरवलेल्या वस्तूही तिथे मिळतात. मुळातच गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्यामुळे कोबानमध्ये गर्दी किंवा गोंधळ अजिबात नसतो. जपानचे पोलिस विनयशील असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला कुणालाच अजिबात भीती वाटत नाही.  मी बरीच वर्षे जपानच्या संपर्कात आहे किंवा तिथे राहिले आहे, परंतु मी कधीच माझ्या मित्रपरिवाराकडून जपानमध्ये गुन्हा अनुभवाला मिळाला, असे ऐकले नाही. म्हणूनच जपान हा कमीत कमी गुन्हे घडणारा देश आहे, याची मला खात्री आहे. जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास भाग्यच म्हणावे लागेल, परंतु किमान जपान पाहायला नक्की जा... सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा... Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WXgQU5

No comments:

Post a Comment