Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश अमरावती : आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे फारच कमी लोकांच्या नशिबी येते. दैनंदिन जीवनात याचा अनुभव आपल्याला येत असतो. मात्र, आवड म्हणून सुरू केलेली शेतीच एखाद्याचे करिअर होऊ शकते, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, तिवसा तालुक्‍यातील कुऱ्हा येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा नितीन इखार यांनी हे साध्य करून दाखविले आहे. हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण आहे. एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुवर्णा इखार यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. मात्र, त्यांना त्यातील परिपूर्ण माहिती नव्हती. सामान्यपणे शेतकरी करतात तशी शेती त्यांच्या कुटुंबात होत होती. कालांतराने साडेदहा एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. पती नितीन हे शेतकरीच असल्यामुळे पारंपरिक शेती करण्यावरच त्यांचा भर होता. अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज मात्र, पत्नी सुवर्णा इखार यांनी स्वतः काही तरी करायचे, असा ठाम निर्धार मनात बांधला. त्यानंतर त्यांनी इतर पिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. साडेदहा एकरांपैकी अर्ध्या भागात त्यांनी सुरुवातीला काकडीची लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली. विशेष म्हणजे त्यात त्यांना चांगलाच नफा मिळाला. पहिल्याच प्रयोगात काकडीपासून त्यांना ७० ते ८० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे सुवर्णा यांच्यातील आत्मविश्‍वास अधिकच बळकट झाला. आपणही या माध्यमातून पुढे प्रगती करू शकतो, असा दांडगा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण झाला. हेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर यानंतर त्यांनी लागवडीचे तंत्रशुद्ध ज्ञान मिळवित कारले, टमाटर, काकडी, वांगे व फुलकोबीची लागवड केली. मात्र, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचे पाच एकरातील टमाटर विकले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. मात्र, तरीही न डगमगता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर काकडी, कारली, वांग्याचे पीक घेतले. त्यांनी तयार केलेल्या पिकांना कुऱ्हासह शेंदूरजनाबाजार, तिवसा, मोझरी, चांदूररेल्वे इत्यादी ठिकाणची बाजारपेठ मिळाली. याठिकाणी दररोज त्यांचा माल जाऊ लागला आणि उत्पन्नाचे एक नवीन स्त्रोत निर्माण झाले. स्वतःची मेहनत, जिद्दीच्या जोरावर शेतीसारख्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सुवर्णा इखार यांनी या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. जाणून घ्या - 'शौक के लिये कुछ भी करेगा' आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला शेतीचे कुठलेही ज्ञान नसताना आपण या क्षेत्रात आलो. महिलांनीही न डगमगता खंबीरपणे आपल्या शेतात अशाच प्रकारे प्रयोग करून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा. - सुवर्णा इखार, प्रयोगशील शेतकरी, कुऱ्हा संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश अमरावती : आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे फारच कमी लोकांच्या नशिबी येते. दैनंदिन जीवनात याचा अनुभव आपल्याला येत असतो. मात्र, आवड म्हणून सुरू केलेली शेतीच एखाद्याचे करिअर होऊ शकते, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, तिवसा तालुक्‍यातील कुऱ्हा येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा नितीन इखार यांनी हे साध्य करून दाखविले आहे. हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण आहे. एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुवर्णा इखार यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. मात्र, त्यांना त्यातील परिपूर्ण माहिती नव्हती. सामान्यपणे शेतकरी करतात तशी शेती त्यांच्या कुटुंबात होत होती. कालांतराने साडेदहा एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. पती नितीन हे शेतकरीच असल्यामुळे पारंपरिक शेती करण्यावरच त्यांचा भर होता. अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज मात्र, पत्नी सुवर्णा इखार यांनी स्वतः काही तरी करायचे, असा ठाम निर्धार मनात बांधला. त्यानंतर त्यांनी इतर पिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. साडेदहा एकरांपैकी अर्ध्या भागात त्यांनी सुरुवातीला काकडीची लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली. विशेष म्हणजे त्यात त्यांना चांगलाच नफा मिळाला. पहिल्याच प्रयोगात काकडीपासून त्यांना ७० ते ८० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे सुवर्णा यांच्यातील आत्मविश्‍वास अधिकच बळकट झाला. आपणही या माध्यमातून पुढे प्रगती करू शकतो, असा दांडगा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण झाला. हेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर यानंतर त्यांनी लागवडीचे तंत्रशुद्ध ज्ञान मिळवित कारले, टमाटर, काकडी, वांगे व फुलकोबीची लागवड केली. मात्र, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचे पाच एकरातील टमाटर विकले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. मात्र, तरीही न डगमगता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर काकडी, कारली, वांग्याचे पीक घेतले. त्यांनी तयार केलेल्या पिकांना कुऱ्हासह शेंदूरजनाबाजार, तिवसा, मोझरी, चांदूररेल्वे इत्यादी ठिकाणची बाजारपेठ मिळाली. याठिकाणी दररोज त्यांचा माल जाऊ लागला आणि उत्पन्नाचे एक नवीन स्त्रोत निर्माण झाले. स्वतःची मेहनत, जिद्दीच्या जोरावर शेतीसारख्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सुवर्णा इखार यांनी या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. जाणून घ्या - 'शौक के लिये कुछ भी करेगा' आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला शेतीचे कुठलेही ज्ञान नसताना आपण या क्षेत्रात आलो. महिलांनीही न डगमगता खंबीरपणे आपल्या शेतात अशाच प्रकारे प्रयोग करून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा. - सुवर्णा इखार, प्रयोगशील शेतकरी, कुऱ्हा संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3k0hr0f

No comments:

Post a Comment