कोरोनाबाधितांना होऊ शकतो फटाक्यांच्या धुराचा त्रास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे मुंबई : मुंबई आणि उपनगरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही. त्यात दिवाळी तोंडावर आल्याने दिवाळीत फटाके फोडू नये यासाठी पर्यावरणवाद्यांकडून मोहीम सुरु केली आहे. त्यामूळे, यावर्षी कोरोनाला हरवण्यासाठी दिवाळी पर्यावरणपुरक साजरी करा असे आवाहन ही पर्यावरण क्षेत्रांत काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केले आहे.  दिवाळीत फटाके फोडले तर त्या धूराचा त्रास कोरोना बाधित रुग्णांना होऊ शकतो किंवा ज्येष्ठांनाही त्या धूराचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कोरोनामुळे रुग्णांची आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणाऱ्या विषारी धूराचा त्रास होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामूळे, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरज आहे.  महत्त्वाची बातमी : ठरलं ! मालमत्ता तारण ठेऊन ST काढणार कर्ज, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता श्वसनविकाराने पीडित नागरिकांनी सर्वात प्रथम हवा किती स्वच्छ आहे, हवेतील धूलिकणांचे प्रमाण विचारात घेणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे फुफ्फुसांवर दुष्परिणाम झाले असून आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांवर उपचाराकरिता वापण्यात आलेल्या काही औषधांमुळे तसेच सुरू असलेल्या औषधोपचारामुळे देखील या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती इतर रुग्णांच्या तुलनेने कमी असून या रुग्णांनी पुढील सहा महिने काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे या रुग्णांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे असून या वातावरणापासून लांब राहणे गरजेचे आहे. कोरोनासारख्या आजाराने फुफ्फुसांवर हल्ला केलेल्या नागरिकांचे फुफ्फुस कमकुवत झाले असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढू शकते असं ग्लोबल हॉस्पिटल मुंबईच्या कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट आणि चेस्ट फिजीशियन डॉ. हरीश चाफले यांनी सांगितलं आहे.  महत्त्वाची बातमी : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही" यावर्षी संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतात, राज्यात आणि मुंबईत अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे, विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो. कोरोना रुग्णांनाच नाहीतर कोणालाही धूराचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी काम सुरु केल्याचे मुंबईतल्या पर्यावरणवादी यांनी सांगितले आहे. समाजमाध्यमांचा देखील यासाठी वापर केला जात असेही काही पर्यावरण वाद्यांनी सांगितले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) poisonous fumes emitted by firecrackers might harm covid patients   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

कोरोनाबाधितांना होऊ शकतो फटाक्यांच्या धुराचा त्रास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे मुंबई : मुंबई आणि उपनगरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही. त्यात दिवाळी तोंडावर आल्याने दिवाळीत फटाके फोडू नये यासाठी पर्यावरणवाद्यांकडून मोहीम सुरु केली आहे. त्यामूळे, यावर्षी कोरोनाला हरवण्यासाठी दिवाळी पर्यावरणपुरक साजरी करा असे आवाहन ही पर्यावरण क्षेत्रांत काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केले आहे.  दिवाळीत फटाके फोडले तर त्या धूराचा त्रास कोरोना बाधित रुग्णांना होऊ शकतो किंवा ज्येष्ठांनाही त्या धूराचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कोरोनामुळे रुग्णांची आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी त्यांना फटाक्यांतून निघणाऱ्या विषारी धूराचा त्रास होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामूळे, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरज आहे.  महत्त्वाची बातमी : ठरलं ! मालमत्ता तारण ठेऊन ST काढणार कर्ज, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता श्वसनविकाराने पीडित नागरिकांनी सर्वात प्रथम हवा किती स्वच्छ आहे, हवेतील धूलिकणांचे प्रमाण विचारात घेणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे फुफ्फुसांवर दुष्परिणाम झाले असून आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांवर उपचाराकरिता वापण्यात आलेल्या काही औषधांमुळे तसेच सुरू असलेल्या औषधोपचारामुळे देखील या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती इतर रुग्णांच्या तुलनेने कमी असून या रुग्णांनी पुढील सहा महिने काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे या रुग्णांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे असून या वातावरणापासून लांब राहणे गरजेचे आहे. कोरोनासारख्या आजाराने फुफ्फुसांवर हल्ला केलेल्या नागरिकांचे फुफ्फुस कमकुवत झाले असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढू शकते असं ग्लोबल हॉस्पिटल मुंबईच्या कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट आणि चेस्ट फिजीशियन डॉ. हरीश चाफले यांनी सांगितलं आहे.  महत्त्वाची बातमी : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही" यावर्षी संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतात, राज्यात आणि मुंबईत अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे, विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो. कोरोना रुग्णांनाच नाहीतर कोणालाही धूराचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी काम सुरु केल्याचे मुंबईतल्या पर्यावरणवादी यांनी सांगितले आहे. समाजमाध्यमांचा देखील यासाठी वापर केला जात असेही काही पर्यावरण वाद्यांनी सांगितले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) poisonous fumes emitted by firecrackers might harm covid patients   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TQ2jIp

No comments:

Post a Comment