SRA प्रकल्पाच्या रात्रपाळीतील अवैध कामामुळे रहिवासी त्रस्त मुंबई : वांद्रे पश्चिम येथील काडेश्वरी मंदिर मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक रात्री 10 नंतर देखील काम करत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमणात ध्वनी तसेच वायू प्रदूषण सुरू आहे. यामुळे येथील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. काडेश्वरी मंदिर मार्गावरील SRA प्रकल्पाचे काम सुरू आहे. हरेकृष्णा बिल्डर ऍण्ड डेव्हलपरकडून हे काम करण्यात येतंय. अनलॉकनंतर पुन्हा एकदा हे काम सुरू करण्यात आले असून रात्री 10 नंतर देखील पहाटे हे काम सुरू असते. रात्रीच्या कामाची परवानगी नसताना देखील अवैधरित्या हे काम सुरू असल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्राय पिंपेटा यांनी सांगितले. महत्त्वाची बातमी : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही" रात्रभर काम सुरू असल्याने जेसीबी तसेच विविध यंत्रणांचा कर्णकर्कश आवाज सुरू असतो. प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असल्याने जमिनीला जोराने हादरे बसत आहेत. कामासाठी हायलोजन लाईट लावण्यात आल्याने परिसरात लाईटमुळे प्रदूषण देखील वाढले आहे. शिवाय रात्रभर वाहन सुरू असल्याने ध्वनी तसेच वायू प्रदूषण देखील वाढले असल्याचे पिंपेटा यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या आसपास रहिवासी परिसर आहे. त्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. मात्र दिवसभर थकून घरी आल्यानंतर त्यांना नीट झोप ही घेता येत नाही. या कामामुळे अनेक राहीवाश्यांना निद्रानाशाचा त्रास होऊ लागला आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील ध्वनी प्रदूषणाचा फटका बसतोय असे ही पिंपेटा पुढे म्हणाले. महत्त्वाची बातमी :  बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी याप्रकरणी वांद्रे पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी यावर अद्याप काहीही कारवाई केली नसल्याचे पिंपेटा यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक अवैध काम करत असून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही,त्याला कुणाचे अभय आहे असा सवाल करत या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी पिंपेटा यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत केली आहे.  construction work done at odd times during night in bandra citizens are annoyed News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

SRA प्रकल्पाच्या रात्रपाळीतील अवैध कामामुळे रहिवासी त्रस्त मुंबई : वांद्रे पश्चिम येथील काडेश्वरी मंदिर मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक रात्री 10 नंतर देखील काम करत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमणात ध्वनी तसेच वायू प्रदूषण सुरू आहे. यामुळे येथील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. काडेश्वरी मंदिर मार्गावरील SRA प्रकल्पाचे काम सुरू आहे. हरेकृष्णा बिल्डर ऍण्ड डेव्हलपरकडून हे काम करण्यात येतंय. अनलॉकनंतर पुन्हा एकदा हे काम सुरू करण्यात आले असून रात्री 10 नंतर देखील पहाटे हे काम सुरू असते. रात्रीच्या कामाची परवानगी नसताना देखील अवैधरित्या हे काम सुरू असल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्राय पिंपेटा यांनी सांगितले. महत्त्वाची बातमी : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही" रात्रभर काम सुरू असल्याने जेसीबी तसेच विविध यंत्रणांचा कर्णकर्कश आवाज सुरू असतो. प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असल्याने जमिनीला जोराने हादरे बसत आहेत. कामासाठी हायलोजन लाईट लावण्यात आल्याने परिसरात लाईटमुळे प्रदूषण देखील वाढले आहे. शिवाय रात्रभर वाहन सुरू असल्याने ध्वनी तसेच वायू प्रदूषण देखील वाढले असल्याचे पिंपेटा यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या आसपास रहिवासी परिसर आहे. त्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. मात्र दिवसभर थकून घरी आल्यानंतर त्यांना नीट झोप ही घेता येत नाही. या कामामुळे अनेक राहीवाश्यांना निद्रानाशाचा त्रास होऊ लागला आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील ध्वनी प्रदूषणाचा फटका बसतोय असे ही पिंपेटा पुढे म्हणाले. महत्त्वाची बातमी :  बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी याप्रकरणी वांद्रे पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी यावर अद्याप काहीही कारवाई केली नसल्याचे पिंपेटा यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक अवैध काम करत असून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही,त्याला कुणाचे अभय आहे असा सवाल करत या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी पिंपेटा यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत केली आहे.  construction work done at odd times during night in bandra citizens are annoyed News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jSFgqI

No comments:

Post a Comment