...तर हिमालयात निघून जाईन ; चंद्रकांत पाटील कोल्हापूर - पक्षाने सांगितले म्हणून पुण्यातून निवडणूक लढवली. कोल्हापुरातून माझी निवडणूक लढण्याची आजही इच्छा आहे. तिथल्या कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. त्यानंतर येणारी पोटनिवडणूक मी लढवतो. हरलो तर हिमालयात निघून जाईन. असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोथरूड मतदारसंघातील वर्षपूर्तीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांना हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारणा केली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""अमित शहा यांच्या आग्रहामुळे मला पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. त्यावर अनेकांनी मी कोल्हापुरातून पळून आलो अशी टीका केली. जातीचा विषयही त्यांनी काढला; पण माझे आजही हसन मुश्रीफ यांना आव्हान आहे. कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवतो. हरणे मला माहिती नाही. जर हरलो तर हिमालयात निघून जाईन.''  आपल्या उमेदवारीबद्दल पाटील म्हणाले, ""मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानतो. काम करत राहा हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. पक्षाचा आदेश आजपर्यंत कधीच डावलला नाही. त्यामुळेच अमित शहा यांचा आदेश न जुमानणे मला शक्‍य नव्हते. अन्यथा मी कोल्हापुरातूनच निवडणूक लढवण्यास उत्सुक होतो. कोथरुडमध्ये एकास एक लढत झाली. मला एकाच मतदार संघात अडकवून ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले. लोकसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मताधिक्‍य या मतदारसंघातून भाजपला मिळाले होते. ते विधानसभा निवडणुकीत कमी झाले. मी पराभूत होईन असे भाकीत अनेकांनी केले होते. पण मी निवडून आलो.''  हे पण वाचा - राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आधीच फेटाळण्याचं फिक्स; मुश्रीफांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ राज्यपालांच्या बदनामीचा डाव  राज्यापाल नियुक्त 12 आमदारांचे प्रस्ताव फेटाळण्याचे फिक्‍सिंग राज्यपाल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ""राज्यपालांना बदनाम करण्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा डाव आहे. जे कोणी बोललेच नाही, ती गोष्ट पसरवण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी माहीर आहेत.''  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

...तर हिमालयात निघून जाईन ; चंद्रकांत पाटील कोल्हापूर - पक्षाने सांगितले म्हणून पुण्यातून निवडणूक लढवली. कोल्हापुरातून माझी निवडणूक लढण्याची आजही इच्छा आहे. तिथल्या कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. त्यानंतर येणारी पोटनिवडणूक मी लढवतो. हरलो तर हिमालयात निघून जाईन. असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोथरूड मतदारसंघातील वर्षपूर्तीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांना हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारणा केली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""अमित शहा यांच्या आग्रहामुळे मला पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. त्यावर अनेकांनी मी कोल्हापुरातून पळून आलो अशी टीका केली. जातीचा विषयही त्यांनी काढला; पण माझे आजही हसन मुश्रीफ यांना आव्हान आहे. कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवतो. हरणे मला माहिती नाही. जर हरलो तर हिमालयात निघून जाईन.''  आपल्या उमेदवारीबद्दल पाटील म्हणाले, ""मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानतो. काम करत राहा हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. पक्षाचा आदेश आजपर्यंत कधीच डावलला नाही. त्यामुळेच अमित शहा यांचा आदेश न जुमानणे मला शक्‍य नव्हते. अन्यथा मी कोल्हापुरातूनच निवडणूक लढवण्यास उत्सुक होतो. कोथरुडमध्ये एकास एक लढत झाली. मला एकाच मतदार संघात अडकवून ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले. लोकसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मताधिक्‍य या मतदारसंघातून भाजपला मिळाले होते. ते विधानसभा निवडणुकीत कमी झाले. मी पराभूत होईन असे भाकीत अनेकांनी केले होते. पण मी निवडून आलो.''  हे पण वाचा - राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आधीच फेटाळण्याचं फिक्स; मुश्रीफांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ राज्यपालांच्या बदनामीचा डाव  राज्यापाल नियुक्त 12 आमदारांचे प्रस्ताव फेटाळण्याचे फिक्‍सिंग राज्यपाल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ""राज्यपालांना बदनाम करण्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा डाव आहे. जे कोणी बोललेच नाही, ती गोष्ट पसरवण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी माहीर आहेत.''  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jRixM2

No comments:

Post a Comment