‘लोजप’बाबत भाजपच निर्णय घेईल ; शपथविधी दिवाळीनंतर  पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय ‘एनडीए’च्या बैठकीत होईल आणि लोक जनशक्ती पक्षाबाबतही (लोजप) भाजप निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘लोजप’मुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागा बऱ्याच कमी झाल्याने नितीश यांची या पक्षाबाबत नाराजी आहे. तसेच, पक्षाला जागा कमी मिळाल्याने भाजपने आश्‍वस्त करूनही मुख्यमंत्रिपदाबाबत फेरविचार होऊ शकतो, असे सूतोवाच नितीशकुमार यांनी आज दिले.  चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीत केवळ नितीशकुमार यांनाच लक्ष्य करत प्रचार केला. त्यामुळे भाजपला फायदा झाला तर त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या ‘जेडीयू’ला मात्र चांगलाच फटका बसला. नितीशकुमार हेच ‘एनडीए’तर्फे मुख्यमंत्री असतील, असे भाजपने निवडणुकीआधी आणि निकालानंतरही स्पष्ट केले आहे. मात्र, नितीश यांनी स्वत:हून भाजपकडे हे पद सोपवावे, अशीही कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीशकुमार यांना विचारले असता, ज्यांनी मते खाल्ली त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते भाजपच ठरवेल, असे त्यांनी उत्तर दिले. तसेच, आज ‘एनडीए’च्या घटक पक्षांची अनौपचारिक बैठक होत असून त्यातच शपथविधीबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शपथविधी दिवाळीनंतर  बिहारमध्ये दिवाळीनंतर नवीन सरकार स्थापन होईल, असे  सूत्राकडून सांगण्यात आले. एनडीएच्या सरकारमध्ये भाजप, जेडीयू, व्हिआयपी आणि हम पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत. सरकार स्थापनेबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी जेडीयू आमदारांची काल बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्याला आलेल्या आमदारांशी चर्चा केली. यादरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत चर्चा केली.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महाआघाडीचीही बैठक  माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीचीही बैठक झाली. या बैठकीत राजद, कॉंग्रेस, डावे पक्ष यांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी व्हिआयपी, हम आणि एनडीएच्या विरोधात मत मिळवणाऱ्या अन्य पक्षांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काँग्रेसला घरचा आहेर  कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी माजी खासदार तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे महाआघाडीचा पराभव झाला, असे म्हटले आहे. या पराभवाचे विश्‍लेषण व्हायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. बिहारमध्ये पक्षाला ७० जागा मिळालेल्या असताना योग्य उमेदवारांची निवड न होणे आणि प्रचारही प्रभावीपणे न होणे, या गोष्टी कॉंग्रेसच्या अपयशाला कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 12, 2020

‘लोजप’बाबत भाजपच निर्णय घेईल ; शपथविधी दिवाळीनंतर  पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय ‘एनडीए’च्या बैठकीत होईल आणि लोक जनशक्ती पक्षाबाबतही (लोजप) भाजप निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘लोजप’मुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागा बऱ्याच कमी झाल्याने नितीश यांची या पक्षाबाबत नाराजी आहे. तसेच, पक्षाला जागा कमी मिळाल्याने भाजपने आश्‍वस्त करूनही मुख्यमंत्रिपदाबाबत फेरविचार होऊ शकतो, असे सूतोवाच नितीशकुमार यांनी आज दिले.  चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीत केवळ नितीशकुमार यांनाच लक्ष्य करत प्रचार केला. त्यामुळे भाजपला फायदा झाला तर त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या ‘जेडीयू’ला मात्र चांगलाच फटका बसला. नितीशकुमार हेच ‘एनडीए’तर्फे मुख्यमंत्री असतील, असे भाजपने निवडणुकीआधी आणि निकालानंतरही स्पष्ट केले आहे. मात्र, नितीश यांनी स्वत:हून भाजपकडे हे पद सोपवावे, अशीही कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीशकुमार यांना विचारले असता, ज्यांनी मते खाल्ली त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते भाजपच ठरवेल, असे त्यांनी उत्तर दिले. तसेच, आज ‘एनडीए’च्या घटक पक्षांची अनौपचारिक बैठक होत असून त्यातच शपथविधीबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शपथविधी दिवाळीनंतर  बिहारमध्ये दिवाळीनंतर नवीन सरकार स्थापन होईल, असे  सूत्राकडून सांगण्यात आले. एनडीएच्या सरकारमध्ये भाजप, जेडीयू, व्हिआयपी आणि हम पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत. सरकार स्थापनेबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी जेडीयू आमदारांची काल बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्याला आलेल्या आमदारांशी चर्चा केली. यादरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत चर्चा केली.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महाआघाडीचीही बैठक  माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीचीही बैठक झाली. या बैठकीत राजद, कॉंग्रेस, डावे पक्ष यांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी व्हिआयपी, हम आणि एनडीएच्या विरोधात मत मिळवणाऱ्या अन्य पक्षांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काँग्रेसला घरचा आहेर  कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी माजी खासदार तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे महाआघाडीचा पराभव झाला, असे म्हटले आहे. या पराभवाचे विश्‍लेषण व्हायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. बिहारमध्ये पक्षाला ७० जागा मिळालेल्या असताना योग्य उमेदवारांची निवड न होणे आणि प्रचारही प्रभावीपणे न होणे, या गोष्टी कॉंग्रेसच्या अपयशाला कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nkVriM

No comments:

Post a Comment