बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क  अमरावती : दिवाळी म्हंटलं की डोळ्यासमोर येतात दिवे, रोषणाई, नवीन कपडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आणि मिठाई. चविष्ट मिठाई आणि दिवाळीचं समीकरणच भन्नाट. लहान मुलांपासून तर अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आनंदाने दिवाळी साजरी करतात. मित्रांना आणि नातेवाईकांना मिठाई भेट देतात. बाजारात अनेक प्रकारच्या महागड्या मिठाई उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकलंय? हो. आम्ही खऱ्याखुऱ्या सोन्याच्या मिठाईबद्दल बोलतोय. या मिठाईमुळे अमरावतीच्या बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी बघायला मिळत आहे.        दिवाळीचा आनंद तोंडाला पाणी सोडणाऱ्या मिठाईशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यातच सोन्याची मिठाई म्हणजे सोन्याहून पिवळे. अमरावती येथील एका प्रतिष्ठानाच्या संचालकांनी यंदाच्या दिवाळीत सोन्याचा अर्क चढविलेली मिठाई तयार केली आहे.  हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप विशेष म्हणजे मिठाईवर लावण्यात आलेला सोन्याचा अर्क हा शुद्ध २४ कॅरेट सोन्याचाच आहे. या मिठाईची किंमत म्हणाल तर सोन्याला साजेशी म्हणजेच सात हजार रुपये प्रती किलो. सर्वसामांन्यांच्या आवाक्‍यापलीकडे असलेली ही सोनेरी मिठाई सध्या चांगलाच भाव खात आहे. दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर सदर प्रतिष्ठानाच्या वतीने नवीन संकल्पना केली जाते. संचालकांनी सांगितले, की सोनेरी मिठाईमध्ये मामरा बादाम, शुद्ध केसर, पिस्ता, हेजलनट आदींचा समावेश आहे. या सोनेरी मिठाईची विशेषतः म्हणजे सात हजार रुपये किलोच्या या मिठाईसोबत ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचा वर्क असलेले प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते. इतर मिठाईसोबतच सध्या सोनेरी मिठाई चर्चेचा विषय ठरलेली आहे. सविस्तर वाचा - युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विक्री सोन्याची अर्क लावलेल्या सोनेरी मिठाईची किंमत अधिक वाटत असली तरी सध्याच्या सोन्याच्या वाढत्या किंमत पाहता निर्धारित करण्यात आलेली आहे. सोन्याच्या भावानुसारच या मिठाईचा दर निश्‍चित करण्यात आला असून ना नफा ना तोटा, या तत्त्वावर ही मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संचालकांनी सांगितले.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 12, 2020

बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क  अमरावती : दिवाळी म्हंटलं की डोळ्यासमोर येतात दिवे, रोषणाई, नवीन कपडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आणि मिठाई. चविष्ट मिठाई आणि दिवाळीचं समीकरणच भन्नाट. लहान मुलांपासून तर अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आनंदाने दिवाळी साजरी करतात. मित्रांना आणि नातेवाईकांना मिठाई भेट देतात. बाजारात अनेक प्रकारच्या महागड्या मिठाई उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकलंय? हो. आम्ही खऱ्याखुऱ्या सोन्याच्या मिठाईबद्दल बोलतोय. या मिठाईमुळे अमरावतीच्या बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी बघायला मिळत आहे.        दिवाळीचा आनंद तोंडाला पाणी सोडणाऱ्या मिठाईशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यातच सोन्याची मिठाई म्हणजे सोन्याहून पिवळे. अमरावती येथील एका प्रतिष्ठानाच्या संचालकांनी यंदाच्या दिवाळीत सोन्याचा अर्क चढविलेली मिठाई तयार केली आहे.  हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप विशेष म्हणजे मिठाईवर लावण्यात आलेला सोन्याचा अर्क हा शुद्ध २४ कॅरेट सोन्याचाच आहे. या मिठाईची किंमत म्हणाल तर सोन्याला साजेशी म्हणजेच सात हजार रुपये प्रती किलो. सर्वसामांन्यांच्या आवाक्‍यापलीकडे असलेली ही सोनेरी मिठाई सध्या चांगलाच भाव खात आहे. दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर सदर प्रतिष्ठानाच्या वतीने नवीन संकल्पना केली जाते. संचालकांनी सांगितले, की सोनेरी मिठाईमध्ये मामरा बादाम, शुद्ध केसर, पिस्ता, हेजलनट आदींचा समावेश आहे. या सोनेरी मिठाईची विशेषतः म्हणजे सात हजार रुपये किलोच्या या मिठाईसोबत ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचा वर्क असलेले प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते. इतर मिठाईसोबतच सध्या सोनेरी मिठाई चर्चेचा विषय ठरलेली आहे. सविस्तर वाचा - युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विक्री सोन्याची अर्क लावलेल्या सोनेरी मिठाईची किंमत अधिक वाटत असली तरी सध्याच्या सोन्याच्या वाढत्या किंमत पाहता निर्धारित करण्यात आलेली आहे. सोन्याच्या भावानुसारच या मिठाईचा दर निश्‍चित करण्यात आला असून ना नफा ना तोटा, या तत्त्वावर ही मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संचालकांनी सांगितले.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lvmQOz

No comments:

Post a Comment