विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले जातात अंत्यसंस्कार; शोधावी लागते जागा  काकडा (जि. अमरावती) ः मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रशासकीय लालफीतशाहीला मानवतेचा कळवळा असतोच, असे नाही. पर्यायाने मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते. हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. स्मशानभूमी नसल्याने काकडा येथील नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात, ही एक शोकांतिका आहे. आजच्या परिस्थितीत कोणत्याही लहानमोठ्या गावात रस्ते असो की नसो, नाल्यांची दुरवस्था असो मात्र स्मशानभूमी ही असतेच. परंतु त्याला काकडा हे गाव अपवाद ठरले आहे. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गावात स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात साधे स्मशानभूमीचे शेड नाही. ही बाब दुर्देवाची म्हणावी लागेल.  नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहे. स्मशानभूमीच नसल्याने बहुतांश मृतदेहांवर शिंदी बु. येथील वळणरस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळा, पावसाळा तसेच कडाक्‍याच्या थंडीत अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची पार त्रेधातिरपट उडते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिढ्यान्‌ पिढ्या अशीच परिस्थिती चालत आल्याने आजचे चित्र समोर आहे. गावकरी तसेच लोकप्रतिनिधी मिळून स्मशानभूमीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीसंदर्भात ग्रामपंचायतमधून सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. -ईश्‍वरदास वानखडे,  सरपंच. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीचे शेड नसल्याने नागरिकांना आप्तस्वकियांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी प्रशासनकडे शेडची मागणी करण्यात येईल. -देवेंद्र पेटकर,  पं. स. सदस्य. हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्‍न निकाली काढावा. -अविनाश भोंडे,  नागरिक.   संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 1, 2020

विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले जातात अंत्यसंस्कार; शोधावी लागते जागा  काकडा (जि. अमरावती) ः मृत व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रशासकीय लालफीतशाहीला मानवतेचा कळवळा असतोच, असे नाही. पर्यायाने मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते. हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल. स्मशानभूमी नसल्याने काकडा येथील नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात, ही एक शोकांतिका आहे. आजच्या परिस्थितीत कोणत्याही लहानमोठ्या गावात रस्ते असो की नसो, नाल्यांची दुरवस्था असो मात्र स्मशानभूमी ही असतेच. परंतु त्याला काकडा हे गाव अपवाद ठरले आहे. गावातील अनेकांच्या पिढ्या गेल्या मात्र या गावात स्मशानभूमीच नसल्याचे वास्तव आहे. स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असतानाही गावात साधे स्मशानभूमीचे शेड नाही. ही बाब दुर्देवाची म्हणावी लागेल.  नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींकडून कुठलाही पाठपुरावा नसल्याने ही समस्या कायम आहे. स्मशानभूमीच नसल्याने बहुतांश मृतदेहांवर शिंदी बु. येथील वळणरस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळा, पावसाळा तसेच कडाक्‍याच्या थंडीत अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची पार त्रेधातिरपट उडते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिढ्यान्‌ पिढ्या अशीच परिस्थिती चालत आल्याने आजचे चित्र समोर आहे. गावकरी तसेच लोकप्रतिनिधी मिळून स्मशानभूमीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीसंदर्भात ग्रामपंचायतमधून सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविण्यात आला आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. -ईश्‍वरदास वानखडे,  सरपंच. काकडा येथे हिंदू स्मशानभूमीचे शेड नसल्याने नागरिकांना आप्तस्वकियांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी प्रशासनकडे शेडची मागणी करण्यात येईल. -देवेंद्र पेटकर,  पं. स. सदस्य. हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्‍न निकाली काढावा. -अविनाश भोंडे,  नागरिक.   संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mVmdyj

No comments:

Post a Comment