Winter tips : कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक; वाचा काय सांगतात डॉ. प्रशांत पाटील नागपूर : वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु, पारा खाली वर होत असला की आजार होणार हे निश्‍चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते. वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. दुपारी ऊन, रात्री थंडी अशा विषम तापमानाचा शरीरावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक असतात. वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात, दमा असे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले. हिवाळ्यात त्वचा व केसांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, उडती धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार थंडीच्या काळात जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसात रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते. क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल... परंतु, अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला खाज सुटू शकते तसेच तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार असतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भीती असते, असे मेडिकलच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली शिंगाडे यांनी सांगितले. कोरोनाचा हा त्रासदायक काळ शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो. सध्या कोरोनाचा हा त्रासदायक काळ आहे. थंडीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची भीती आहे. - डॉ. प्रशांत पाटील, मेडिसीन विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल हे करा उबदार कपड्यांचा वापर करा आहारात स्निग्ध पदार्थ घ्या आले घातलेला चहा प्या ताक, दही, आइस्क्रीम खाऊ नका दुचाकीवरून जाताना काळजी घ्या अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधा संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 1, 2020

Winter tips : कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक; वाचा काय सांगतात डॉ. प्रशांत पाटील नागपूर : वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु, पारा खाली वर होत असला की आजार होणार हे निश्‍चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते. वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. दुपारी ऊन, रात्री थंडी अशा विषम तापमानाचा शरीरावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक असतात. वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात, दमा असे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले. हिवाळ्यात त्वचा व केसांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, उडती धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार थंडीच्या काळात जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसात रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते. क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल... परंतु, अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला खाज सुटू शकते तसेच तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार असतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भीती असते, असे मेडिकलच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली शिंगाडे यांनी सांगितले. कोरोनाचा हा त्रासदायक काळ शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो. सध्या कोरोनाचा हा त्रासदायक काळ आहे. थंडीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची भीती आहे. - डॉ. प्रशांत पाटील, मेडिसीन विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल हे करा उबदार कपड्यांचा वापर करा आहारात स्निग्ध पदार्थ घ्या आले घातलेला चहा प्या ताक, दही, आइस्क्रीम खाऊ नका दुचाकीवरून जाताना काळजी घ्या अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधा संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mJPWKo

No comments:

Post a Comment