नागरिक बिनधास्त, विसरले मास्क ! नागपूर : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप संपुष्टात आला नाही. मात्र नागरिकांची बेफिकिरी वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांत मास्कशिवाय फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे महापालिकेने कारवाईवरून दिसून येत आहे. दररोज बेजबाबदार नागरिकांच्या संख्येत भर पडत असल्याने प्रशासनात चिंता व्यक्त केली जात आहे.  महापालिकेचे उपद्रव शोध पथक मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करीत आहे. आतापर्यंत १६ हजार ७८३ लोकांकडून ६४ लाख ४९ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आज या शोधपथकाने मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३२८ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० रुपयेप्रमाणे १ लक्ष ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. काल, २ नोव्हेंबरला मास्कशिवाय २६८ नागरिक आढळून आले. १ नोव्हेंबरला रविवार असल्याने सुटी होती. त्यापूर्वी ३१ नोव्हेंबरला २२५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत मास्क न घालणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने भर पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज शेकडो बाधित आढळून येत आहे. मात्र, नागरिक कोरोना संपुष्टात आल्यासारखे वागत असल्याने प्रशासन पुन्हा चिंतेत पडले आहे. नागरिकांची बेफिकिरी पुन्हा कोरोना वाढण्यास मदत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच तज्ज्ञांनी थंडीमध्ये कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, नागरिक बेजबाबदारपणे मास्कशिवाय फिरत असल्याने प्रशासनापुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मोकळे भूखंड डेंगी, मलेरियाचे ‘हॉटस्पॉट` दरम्यान, आज महापालिकेच्या पथकाने लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ७६, धरमपेठ झोनमध्ये ४०, हनुमाननगर झोनमध्ये २०, धंतोलीत ७, नेहरुनगरमध्ये ११, गांधीबागमध्ये १६, सतरंजीपूरा झोनमध्ये १४, लकडगंजमंध्ये १२, आशीनगरमध्ये २१, मंगळवारीमध्ये सर्वाधिक १०८ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.   दंडाची रक्कम वाढविल्यानंतरही बेफिकिरी नागरिकांनी स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आरोग्य धोक्यात घालू नये, म्हणून दंडाची रक्कम दोनशेवरून पाचशे रुपये करण्यात आली. १५ सप्टेंबरपासून ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. नागरिक दंडाच्या रकमेतून खिशावर पडलेला भुर्दंड सहन करीत आहे. परंतु मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांवर आणखी कोणती कारवाई करता येईल, यावर आता महापालिका विचार करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

नागरिक बिनधास्त, विसरले मास्क ! नागपूर : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप संपुष्टात आला नाही. मात्र नागरिकांची बेफिकिरी वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांत मास्कशिवाय फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे महापालिकेने कारवाईवरून दिसून येत आहे. दररोज बेजबाबदार नागरिकांच्या संख्येत भर पडत असल्याने प्रशासनात चिंता व्यक्त केली जात आहे.  महापालिकेचे उपद्रव शोध पथक मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करीत आहे. आतापर्यंत १६ हजार ७८३ लोकांकडून ६४ लाख ४९ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आज या शोधपथकाने मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३२८ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० रुपयेप्रमाणे १ लक्ष ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. काल, २ नोव्हेंबरला मास्कशिवाय २६८ नागरिक आढळून आले. १ नोव्हेंबरला रविवार असल्याने सुटी होती. त्यापूर्वी ३१ नोव्हेंबरला २२५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत मास्क न घालणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने भर पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज शेकडो बाधित आढळून येत आहे. मात्र, नागरिक कोरोना संपुष्टात आल्यासारखे वागत असल्याने प्रशासन पुन्हा चिंतेत पडले आहे. नागरिकांची बेफिकिरी पुन्हा कोरोना वाढण्यास मदत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच तज्ज्ञांनी थंडीमध्ये कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, नागरिक बेजबाबदारपणे मास्कशिवाय फिरत असल्याने प्रशासनापुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मोकळे भूखंड डेंगी, मलेरियाचे ‘हॉटस्पॉट` दरम्यान, आज महापालिकेच्या पथकाने लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ७६, धरमपेठ झोनमध्ये ४०, हनुमाननगर झोनमध्ये २०, धंतोलीत ७, नेहरुनगरमध्ये ११, गांधीबागमध्ये १६, सतरंजीपूरा झोनमध्ये १४, लकडगंजमंध्ये १२, आशीनगरमध्ये २१, मंगळवारीमध्ये सर्वाधिक १०८ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.   दंडाची रक्कम वाढविल्यानंतरही बेफिकिरी नागरिकांनी स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आरोग्य धोक्यात घालू नये, म्हणून दंडाची रक्कम दोनशेवरून पाचशे रुपये करण्यात आली. १५ सप्टेंबरपासून ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. नागरिक दंडाच्या रकमेतून खिशावर पडलेला भुर्दंड सहन करीत आहे. परंतु मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांवर आणखी कोणती कारवाई करता येईल, यावर आता महापालिका विचार करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32cjOqW

No comments:

Post a Comment