यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करूया! फटाके म्हणजेच दिवाळी या पायंड्याला कायमचा लगाम लावण्याची आता वेळ आली आहे. विशेषतः कोरोनाचे संकट कायम असताना आपला दृष्टिकोन बदललाच पाहिजे. प्रत्येक पुणेकराने फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यातच यंदा सर्वांचे हित आहे. गोडधोड; तसेच खमंग पदार्थांचा फराळ, घरापुढे सुंदर रांगोळी, अभ्यंगस्नान, नवीन कपडे आणि आप्तांच्या भेटीगाठी या जुन्या परंपरागत दिवाळीला उजाळा देण्याची हीच खरी वेळ आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. कोरोनाकाळातील ही दिवाळी उत्साहाबरोबरच तितक्‍याच गांभीर्याने साजरा करण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. खरे तर दिवाळी हा दिव्यांचा सण. घरोघरी आकर्षक आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून तो साजरा करणे अभिप्रेत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्णकर्कश फटाक्‍यांच्या दणदणाटात दिवाळी साजरी करण्याची जणू प्रथाच पडली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना किमान यंदा तरी आपण प्रचंड प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्‍यांना फाटा देणार का हा यक्षप्रश्‍न आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हेच यावेळचे पुणेकरांपुढील मोठे आव्हान आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आतापर्यंत कोरोनाने एकट्या पुणे जिल्ह्यात आठ हजार जणांचा बळी घेतला आहे. आता रुग्णसंख्या थोडी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरचा ताण थोड्या प्रमाणात का होईना हलका होण्यास मदत झाली आहे. याचा परिणाम म्हणजे पुण्याचे जनजीवन, अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. मात्र, हा दिलासा कायम टिकवायचा असेल तर प्रत्येकानेच त्यासाठी योगदान देण्याची आवश्‍यकता आहे. थंडीच्या वातावरणात फटाक्‍यांच्या प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने दिल्ली व पंजाब सरकारने यंदा फटाके फोडण्यास बंदीच घातली आहे. तर फटाक्‍यांचा धुराचा श्‍वसनाला त्रास होत असल्याने यावेळी महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी  करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्याला सर्वांनीच साथ देण्याची आवश्‍यकता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनावाढीला आमंत्रण नको  दिवाळीतील फटाके आणि त्यापासून होणारे वायू व ध्वनी प्रदूषण ही दरवर्षीची समस्या झालेली आहे. दरवेळी यावर चर्चा होते; पण पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे हा प्रश्न वाढतच जातो; पण कोरोनामुळे फटाक्‍यांचा धोका यावर्षी शेकडोपटीने वाढलेला आहे. मुलांच्या नावाखाली घरात फटाके खरेदी होते; पण उडवतात ती मोठी माणसेच. फटाक्‍यांच्या धोक्‍याबाबत पालकही जागरूक नसतात. फटाक्‍यांची रंगीबेरंगी रोषणाई नजर खिळवून ठेवते; पण ही रंगांची नवलाई फुकट मिळत नाही, त्यासाठी आरोग्याच्या रूपातही मोठी किंमत द्यावी लागते. फटाक्‍यांमध्ये ॲल्युमिनियम, अँन्टिमनी सल्फाईड, बेरियम नायट्रेट; तसेच, तांबे, शिसे, लिथियम, स्ट्रॉन्शियम, अर्सेनिक यांसारख्या घटकांची घातक संयुगे वापरली जातात. फटाक्‍यांमधून निघणारा धूर अनेक व्याधींना निमंत्रण देतो. दमा-अस्थमा असणाऱ्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. श्वसनाचे विकार निर्माण करतो किंवा ते आधीच असतील तर त्यांची तीव्रता वाढवतो. त्यामुळे यंदा फटाक्‍यांची आतषबाजी करणे कोरोनावाढीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा फटाके म्हणजेच दिवाळी नव्हे  लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना फटाक्‍यांचा त्रास होतोच होतो; पण यावेळी कोरोनामुळे फटाके फोडणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. सध्या मुळातच कोरोनामुळे रुग्णालयांत ॲडमिट असलेल्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे. अशांना ध्वनी व वायू प्रदूषणाचा अधिक धोका आहे. या सर्वांचा विचार करणे हे प्रत्येक जबाबदार पुणेकराचे कर्तव्य आहे. फटाके म्हणजेच दिवाळी या चुकीच्या पायंड्याला कायमचा लगाम लावण्याची आता वेळ आली आहे. प्रत्येक पालकाने आधी स्वतः फटाकेविरहित दिवाळीचे महत्त्व पटवून घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांना त्याच्या धोक्‍याची जाणीव करून दिली पाहिजे. गोडधोड; तसेच खमंग पदार्थांचा फराळ, घरापुढे सुंदर रांगोळी, अभ्यंगस्नान, नवीन कपडे आणि आप्तांच्या भेटीगाठी या जुन्या परंपरागत दिवाळीला आता उजाळा देण्याची हीच खरी वेळ आहे. प्रत्येक पुणेकराने फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यातच यंदा सर्वांचे हित आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा थंडी व फटाक्‍याच्या धुरामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता बळावते. या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘मोटारींच्या धुरात कार्बन मोनॉक्‍साईड असतो; पण फटाक्‍यांचा धूर यापेक्षाही विषारी व घातक असतात. कोरोना हा मुळातच श्वसनाशी संबंधित विकार आहे. फटाक्‍यांच्या धुराने श्‍वासनलिकेला सूज येते. यामुळे सर्दी, खोकला, धाप लागण्याचा त्रास होतो. ज्यांना मुळातच दमा, अस्थमा, सीओपीडी त्रास आहे त्यांचा त्रास फटक्‍यांच्या धुरामुळे आणखी वाढतो. धुरामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढतील. त्यांना कोरोना होण्याची शक्‍यता बळावते. त्यातही डॉक्‍टरांना कोरोनाचा रुग्ण कोणता व साध्या सर्दी, खोकल्याचा रुग्ण कोणता हे ओळखणे या काळात कठीण जाणार आहे. फटाक्‍यांचा धूर हा प्रामुख्याने गर्भवती महिला, नवजात अर्भके, लहान मुले व ज्येष्ठ्य नागरिकांसाठी धोक्‍याचाच आहे. त्या सर्वांनी अधिक काळजी घ्यायला हवी. यंदाच नव्हे तर यापुढेही कायम फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करूया! फटाके म्हणजेच दिवाळी या पायंड्याला कायमचा लगाम लावण्याची आता वेळ आली आहे. विशेषतः कोरोनाचे संकट कायम असताना आपला दृष्टिकोन बदललाच पाहिजे. प्रत्येक पुणेकराने फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यातच यंदा सर्वांचे हित आहे. गोडधोड; तसेच खमंग पदार्थांचा फराळ, घरापुढे सुंदर रांगोळी, अभ्यंगस्नान, नवीन कपडे आणि आप्तांच्या भेटीगाठी या जुन्या परंपरागत दिवाळीला उजाळा देण्याची हीच खरी वेळ आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यंदाची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. कोरोनाकाळातील ही दिवाळी उत्साहाबरोबरच तितक्‍याच गांभीर्याने साजरा करण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. खरे तर दिवाळी हा दिव्यांचा सण. घरोघरी आकर्षक आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून तो साजरा करणे अभिप्रेत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्णकर्कश फटाक्‍यांच्या दणदणाटात दिवाळी साजरी करण्याची जणू प्रथाच पडली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना किमान यंदा तरी आपण प्रचंड प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्‍यांना फाटा देणार का हा यक्षप्रश्‍न आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हेच यावेळचे पुणेकरांपुढील मोठे आव्हान आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आतापर्यंत कोरोनाने एकट्या पुणे जिल्ह्यात आठ हजार जणांचा बळी घेतला आहे. आता रुग्णसंख्या थोडी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरचा ताण थोड्या प्रमाणात का होईना हलका होण्यास मदत झाली आहे. याचा परिणाम म्हणजे पुण्याचे जनजीवन, अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. मात्र, हा दिलासा कायम टिकवायचा असेल तर प्रत्येकानेच त्यासाठी योगदान देण्याची आवश्‍यकता आहे. थंडीच्या वातावरणात फटाक्‍यांच्या प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने दिल्ली व पंजाब सरकारने यंदा फटाके फोडण्यास बंदीच घातली आहे. तर फटाक्‍यांचा धुराचा श्‍वसनाला त्रास होत असल्याने यावेळी महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी  करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्याला सर्वांनीच साथ देण्याची आवश्‍यकता आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनावाढीला आमंत्रण नको  दिवाळीतील फटाके आणि त्यापासून होणारे वायू व ध्वनी प्रदूषण ही दरवर्षीची समस्या झालेली आहे. दरवेळी यावर चर्चा होते; पण पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे हा प्रश्न वाढतच जातो; पण कोरोनामुळे फटाक्‍यांचा धोका यावर्षी शेकडोपटीने वाढलेला आहे. मुलांच्या नावाखाली घरात फटाके खरेदी होते; पण उडवतात ती मोठी माणसेच. फटाक्‍यांच्या धोक्‍याबाबत पालकही जागरूक नसतात. फटाक्‍यांची रंगीबेरंगी रोषणाई नजर खिळवून ठेवते; पण ही रंगांची नवलाई फुकट मिळत नाही, त्यासाठी आरोग्याच्या रूपातही मोठी किंमत द्यावी लागते. फटाक्‍यांमध्ये ॲल्युमिनियम, अँन्टिमनी सल्फाईड, बेरियम नायट्रेट; तसेच, तांबे, शिसे, लिथियम, स्ट्रॉन्शियम, अर्सेनिक यांसारख्या घटकांची घातक संयुगे वापरली जातात. फटाक्‍यांमधून निघणारा धूर अनेक व्याधींना निमंत्रण देतो. दमा-अस्थमा असणाऱ्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. श्वसनाचे विकार निर्माण करतो किंवा ते आधीच असतील तर त्यांची तीव्रता वाढवतो. त्यामुळे यंदा फटाक्‍यांची आतषबाजी करणे कोरोनावाढीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा फटाके म्हणजेच दिवाळी नव्हे  लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना फटाक्‍यांचा त्रास होतोच होतो; पण यावेळी कोरोनामुळे फटाके फोडणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. सध्या मुळातच कोरोनामुळे रुग्णालयांत ॲडमिट असलेल्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे. अशांना ध्वनी व वायू प्रदूषणाचा अधिक धोका आहे. या सर्वांचा विचार करणे हे प्रत्येक जबाबदार पुणेकराचे कर्तव्य आहे. फटाके म्हणजेच दिवाळी या चुकीच्या पायंड्याला कायमचा लगाम लावण्याची आता वेळ आली आहे. प्रत्येक पालकाने आधी स्वतः फटाकेविरहित दिवाळीचे महत्त्व पटवून घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांना त्याच्या धोक्‍याची जाणीव करून दिली पाहिजे. गोडधोड; तसेच खमंग पदार्थांचा फराळ, घरापुढे सुंदर रांगोळी, अभ्यंगस्नान, नवीन कपडे आणि आप्तांच्या भेटीगाठी या जुन्या परंपरागत दिवाळीला आता उजाळा देण्याची हीच खरी वेळ आहे. प्रत्येक पुणेकराने फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यातच यंदा सर्वांचे हित आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा थंडी व फटाक्‍याच्या धुरामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता बळावते. या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘मोटारींच्या धुरात कार्बन मोनॉक्‍साईड असतो; पण फटाक्‍यांचा धूर यापेक्षाही विषारी व घातक असतात. कोरोना हा मुळातच श्वसनाशी संबंधित विकार आहे. फटाक्‍यांच्या धुराने श्‍वासनलिकेला सूज येते. यामुळे सर्दी, खोकला, धाप लागण्याचा त्रास होतो. ज्यांना मुळातच दमा, अस्थमा, सीओपीडी त्रास आहे त्यांचा त्रास फटक्‍यांच्या धुरामुळे आणखी वाढतो. धुरामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढतील. त्यांना कोरोना होण्याची शक्‍यता बळावते. त्यातही डॉक्‍टरांना कोरोनाचा रुग्ण कोणता व साध्या सर्दी, खोकल्याचा रुग्ण कोणता हे ओळखणे या काळात कठीण जाणार आहे. फटाक्‍यांचा धूर हा प्रामुख्याने गर्भवती महिला, नवजात अर्भके, लहान मुले व ज्येष्ठ्य नागरिकांसाठी धोक्‍याचाच आहे. त्या सर्वांनी अधिक काळजी घ्यायला हवी. यंदाच नव्हे तर यापुढेही कायम फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32ltIXq

No comments:

Post a Comment