शताब्दी रुग्णालय विस्ताराचा प्रस्ताव नाकारला; मुंबई उपनगरांवर परिणाम शक्‍य मुंबई : गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या विस्ताराचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नाकारण्यात आल्याने त्याचा परिणाम पूर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे. गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयासह मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून कागदावरच आहे.  अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने 2006 मध्ये घेतला होता; मात्र अद्याप या विस्ताराचे काम सुरू झाले नाही. स्थायी समितीच्या बैठकीत 580 खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. सध्या येथे 210 खाटांचे रुग्णालय आहे; मात्र पूर्वीपेक्षा 40 कोटी रुपये खर्च होणार, त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार प्रत्यक्षकामासाठी उपकंत्राटदार नियुक्त करणार असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीत बाजूला ठेवला. गेल्या 14 वर्षांपासून हे रुग्णालय विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर महापालिकेने उपनगरातील आरोग्स सुविधा बळकट करण्यासाठी उपनगरी रुग्णालयांचा विस्तार केला. त्यात पश्‍चिम उपनगरातील दोन रुग्णालयांचा विस्तार झाला तर जोगेश्‍वरी येथे ट्रामा केअर हे नवे रुग्णालयही उभे राहिले; मात्र पूर्व उपनगरातील रुग्णालयाचा अद्याप विस्तार झालेला नाही.  हज यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; कोरोना चाचणी आवश्यक मुलुंड पश्‍चिम येथील अगरवाल रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने 2009 मध्ये घेतला होता; मात्र प्रत्यक्षात हे काम गेल्या वर्षी सुरू केले. आता ते कामही रडतखडत सुरू आहे, अशी माहिती भाजपचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली. 2013 पासून हे रुग्णालय उभारण्यासाठी आंदोलने करत आहे. आता जर 120 खाटांच्या जागी 450 खाटांचे रुग्णालय उभे राहिले असते तर कोव्हिडकाळात त्याचा वापर करता आला असता, असेही गंगाधरे यांनी नमूद केले. हे रुग्णालय उभारण्याचे काम ज्या कंत्राटदारला मिळाले आहे, त्याने उपकंत्राटदार नियुक्त केला आहे. त्यामुळे हे काम रखडले असून, दर्जाचाही प्रश्‍न असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.  अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचे राज्य सरकारकडून समर्थन शताब्दी का महत्त्वाचे?  गोवंडी हा भाग मुंबईच्या प्रवेशाद्वाराजवळ आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना आजही शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. शताब्दी रुग्णालयात ट्रामा केअर सुविधा निर्माण झाल्यास शीव रुग्णालयावरील भार कमी होणार आहे. तसेच उपनगरातील अपघातग्रस्तांनाही तत्काळ दर्जेदार सुविधा मिळणे शक्‍य होणार आहे.  ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 7, 2020

शताब्दी रुग्णालय विस्ताराचा प्रस्ताव नाकारला; मुंबई उपनगरांवर परिणाम शक्‍य मुंबई : गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या विस्ताराचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नाकारण्यात आल्याने त्याचा परिणाम पूर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे. गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयासह मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून कागदावरच आहे.  अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने 2006 मध्ये घेतला होता; मात्र अद्याप या विस्ताराचे काम सुरू झाले नाही. स्थायी समितीच्या बैठकीत 580 खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. सध्या येथे 210 खाटांचे रुग्णालय आहे; मात्र पूर्वीपेक्षा 40 कोटी रुपये खर्च होणार, त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार प्रत्यक्षकामासाठी उपकंत्राटदार नियुक्त करणार असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीत बाजूला ठेवला. गेल्या 14 वर्षांपासून हे रुग्णालय विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर महापालिकेने उपनगरातील आरोग्स सुविधा बळकट करण्यासाठी उपनगरी रुग्णालयांचा विस्तार केला. त्यात पश्‍चिम उपनगरातील दोन रुग्णालयांचा विस्तार झाला तर जोगेश्‍वरी येथे ट्रामा केअर हे नवे रुग्णालयही उभे राहिले; मात्र पूर्व उपनगरातील रुग्णालयाचा अद्याप विस्तार झालेला नाही.  हज यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; कोरोना चाचणी आवश्यक मुलुंड पश्‍चिम येथील अगरवाल रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय महापालिकेने 2009 मध्ये घेतला होता; मात्र प्रत्यक्षात हे काम गेल्या वर्षी सुरू केले. आता ते कामही रडतखडत सुरू आहे, अशी माहिती भाजपचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली. 2013 पासून हे रुग्णालय उभारण्यासाठी आंदोलने करत आहे. आता जर 120 खाटांच्या जागी 450 खाटांचे रुग्णालय उभे राहिले असते तर कोव्हिडकाळात त्याचा वापर करता आला असता, असेही गंगाधरे यांनी नमूद केले. हे रुग्णालय उभारण्याचे काम ज्या कंत्राटदारला मिळाले आहे, त्याने उपकंत्राटदार नियुक्त केला आहे. त्यामुळे हे काम रखडले असून, दर्जाचाही प्रश्‍न असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.  अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचे राज्य सरकारकडून समर्थन शताब्दी का महत्त्वाचे?  गोवंडी हा भाग मुंबईच्या प्रवेशाद्वाराजवळ आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना आजही शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. शताब्दी रुग्णालयात ट्रामा केअर सुविधा निर्माण झाल्यास शीव रुग्णालयावरील भार कमी होणार आहे. तसेच उपनगरातील अपघातग्रस्तांनाही तत्काळ दर्जेदार सुविधा मिळणे शक्‍य होणार आहे.  ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I5y1PJ

No comments:

Post a Comment