फराळाचे बुकिंग व्हॉटस्‌ ऍपवरून ; कोल्हापुरातून इतर राज्यातही डिलीव्हरी कोल्हापूर - दिवाळी म्हटले की गोडधोड फराळ, फटाके, नवे कपडे, आकाश कंदिलांच्या खरेदीसह मिठाई अन्‌ नमकीन-तिखट चिवड्यावर ताव मारण्यास सर्वच उत्सुक असतात; पण यंदा दिवाळीला कोरोनाच्या संकटाची किनार असली तरी त्यावरही मात करत यंदा दीपोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. फराळ खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत सध्या 20 टक्के ग्राहकांची संख्या कमी असली तरी आठ दिवसांत खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळेल. पदार्थांची बुकिंग करत ऍडव्हॉन्स ऑनलाईन... दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही टळले नसल्याने लोक थेट बाजारात जाण्याचे टाळत आहेत. तयार फराळाला पसंती देणाऱ्या ग्राहकांना मिठाईवाल्यांनी ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. पदार्थांचे रेट कार्ड ग्राहकांच्या व्हॉट्‌स ऍपवर पाठवून त्यांनी निवडलेल्या पदार्थांची बुकिंग करत ऍडव्हॉन्स ऑनलाईन पाठवला जात आहे. हव्या त्या तारखेला थेट होम डिलीव्हरी ग्राहकांना मिळत आहे. कोल्हापुरातून कर्नाटकबरोबरच इतर राज्यातही घरपोच डिलीव्हरी दिली जाते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन... ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही, असे तयार फराळाला पसंती देत असतात. कोरोनाच्या सावटामुळे एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून जायला अनेक जण या वेळी टाळणार असले तरी फराळाचे डबे देण्याची परंपरा मात्र जपली जाणार आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आवर्जुन केले जाणार आहे. शुगर फ्री लाडूही बाजारात... लॉकडाउनमुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने फराळ किमान 10 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. तेलकट पदार्थांची मागणी घटली आहे. यंदा दुकानात शुगर फ्री लाडू तसेच विविध फ्लेवरच्या मिठाई तसेच चिवड्यात मक्‍याच्या चिवडा, ज्वारीच्या लाह्याचा चिवडा असे प्रकार नव्याने आल्याने त्या पदार्थांना मागणी आहे. लॉकडाउनमध्ये उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने यंदा लोकांची आर्थिक परिस्थिती जरा बिकट असल्याने अजून तरी ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. परंतु हळूहळू ऑर्डरची संख्या वाढेल, हे नक्की. कारण दिवाळीला अजूनही आठ दिवस बाकी आहेत. - अनिल जोशी, राधेशाम फराळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

फराळाचे बुकिंग व्हॉटस्‌ ऍपवरून ; कोल्हापुरातून इतर राज्यातही डिलीव्हरी कोल्हापूर - दिवाळी म्हटले की गोडधोड फराळ, फटाके, नवे कपडे, आकाश कंदिलांच्या खरेदीसह मिठाई अन्‌ नमकीन-तिखट चिवड्यावर ताव मारण्यास सर्वच उत्सुक असतात; पण यंदा दिवाळीला कोरोनाच्या संकटाची किनार असली तरी त्यावरही मात करत यंदा दीपोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. फराळ खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत सध्या 20 टक्के ग्राहकांची संख्या कमी असली तरी आठ दिवसांत खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळेल. पदार्थांची बुकिंग करत ऍडव्हॉन्स ऑनलाईन... दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही टळले नसल्याने लोक थेट बाजारात जाण्याचे टाळत आहेत. तयार फराळाला पसंती देणाऱ्या ग्राहकांना मिठाईवाल्यांनी ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. पदार्थांचे रेट कार्ड ग्राहकांच्या व्हॉट्‌स ऍपवर पाठवून त्यांनी निवडलेल्या पदार्थांची बुकिंग करत ऍडव्हॉन्स ऑनलाईन पाठवला जात आहे. हव्या त्या तारखेला थेट होम डिलीव्हरी ग्राहकांना मिळत आहे. कोल्हापुरातून कर्नाटकबरोबरच इतर राज्यातही घरपोच डिलीव्हरी दिली जाते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन... ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही, असे तयार फराळाला पसंती देत असतात. कोरोनाच्या सावटामुळे एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून जायला अनेक जण या वेळी टाळणार असले तरी फराळाचे डबे देण्याची परंपरा मात्र जपली जाणार आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आवर्जुन केले जाणार आहे. शुगर फ्री लाडूही बाजारात... लॉकडाउनमुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने फराळ किमान 10 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. तेलकट पदार्थांची मागणी घटली आहे. यंदा दुकानात शुगर फ्री लाडू तसेच विविध फ्लेवरच्या मिठाई तसेच चिवड्यात मक्‍याच्या चिवडा, ज्वारीच्या लाह्याचा चिवडा असे प्रकार नव्याने आल्याने त्या पदार्थांना मागणी आहे. लॉकडाउनमध्ये उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने यंदा लोकांची आर्थिक परिस्थिती जरा बिकट असल्याने अजून तरी ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. परंतु हळूहळू ऑर्डरची संख्या वाढेल, हे नक्की. कारण दिवाळीला अजूनही आठ दिवस बाकी आहेत. - अनिल जोशी, राधेशाम फराळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/352rD4s

No comments:

Post a Comment