चिंताजनक! अतिवृष्टीने सिंधुदुर्गात 15 कोटींची हानी  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात एकूण 21 हजार 174 हेक्‍टर नऊ गुंठे क्षेत्र बाधित झाले असून, 56 हजार 309 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. परिणामी, 14 कोटी 90 लाख 78 हजार रुपये एवढे आर्थिक नुकसान झाले. यात भात, नाचणी, भुईमूग या क्षेत्राचा सर्वाधिक 20 हजार 703 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. उर्वरित बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. याबाबतचा अहवाल शासनाला 28 ऑक्‍टोबरला सादर करण्यात आला आहे.  जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. यंदा पाऊस पुरेसा झाल्याने हंगामी शेती चांगल्या प्रकारे झाली होती; पण ऑक्‍टोबरमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही भातशेतीचे नुकसान शासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने उभी असलेली शेती, आडवी झालेली शेती व पाण्यात कुजलेली शेती या त्रिसूत्रीनुसार पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले आहेत.  सुरवातीला जिल्ह्यात साधारण 10 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात याच्या दुप्पट नुकसान झाले आहे. जिरायती शेतीतील भात, नाचणी, भुईमूग या शेतीचे 20 हजार 703 हेक्‍टर 49 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. बागायतीमधील ऊस शेतीचे 43 हेक्‍टर 45 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. आंबा, काजू, नारळ, सुपारी या फळ पिकांचे 427 हेक्‍टर 96 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात जिरायती, बागायत व फळ पीक या तिन्ही क्षेत्रांतील पिकांचे 21 हजार 174 हेक्‍टर नऊ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. यामुळे तब्बल 56 हजार 309 शेतकरी, बागायतदार बाधित झाले आहेत. 14 कोटी 90 लाख 78 एवढ्या रुपयांचे हे आर्थिक नुकसान झाले.  सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्‍यात  जिरायती शेतीत सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्‍यात नऊ हजार 599 हेक्‍टर 20 गुंठे क्षेत्राचे झाले आहे. या पाठोपाठ मालवण तालुक्‍यात तीन हजार 507 हेक्‍टर क्षेत्राचे, सावंतवाडी तालुक्‍यात दोन हजार 707 हेक्‍टर 47 गुंठे क्षेत्राचे, वैभववाडी तालुक्‍यात एक हजार 532 हेक्‍टर 37 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. कणकवली तालुक्‍यात एक हजार 384 हेक्‍टर, देवगड तालुक्‍यात 998 हेक्‍टर 56 गुंठे, वेंगुर्ले तालुक्‍यात 582 हेक्‍टर 36 गुंठे, दोडामार्ग तालुक्‍यात 392 हेक्‍टर 53 गुंठे अशाप्रकारे तालुकानिहाय नुकसान झाले आहे. दोडामार्ग- 1537, सावंतवाडी- 8558, वैभववाडी- 5183, मालवण- 8895, कणकवली- 5709, देवगड- 5448, वेंगुर्ले- 2963, कुडाळ- 18,016 अशा प्रकारे शेतकरी बाधित झाले आहेत.  हंगामात तीन वेळा नुकसान  चालू शेती हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तीन वेळा नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यातील 554 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले. तीन हजार 200 शेतकरी बाधित झाले असून, 40 लाख रुपयांचे एकूण नुकसान आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 48 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यात 313 शेतकरी बाधित होत तीन लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये झालेले तिसरे नुकसान आहे. तिन्ही वेळच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.  असे आहे मंजूर नुकसान  *जिरायती पिकासाठी हेक्‍टरी सहा हजार 800 रुपये  *बागायती पिकाला हेक्‍टरी 10 हजार 500 रुपये  *फळ पिकाला हेक्‍टरी 18 हजार रुपये    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

चिंताजनक! अतिवृष्टीने सिंधुदुर्गात 15 कोटींची हानी  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात एकूण 21 हजार 174 हेक्‍टर नऊ गुंठे क्षेत्र बाधित झाले असून, 56 हजार 309 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. परिणामी, 14 कोटी 90 लाख 78 हजार रुपये एवढे आर्थिक नुकसान झाले. यात भात, नाचणी, भुईमूग या क्षेत्राचा सर्वाधिक 20 हजार 703 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. उर्वरित बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. याबाबतचा अहवाल शासनाला 28 ऑक्‍टोबरला सादर करण्यात आला आहे.  जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. यंदा पाऊस पुरेसा झाल्याने हंगामी शेती चांगल्या प्रकारे झाली होती; पण ऑक्‍टोबरमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही भातशेतीचे नुकसान शासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने उभी असलेली शेती, आडवी झालेली शेती व पाण्यात कुजलेली शेती या त्रिसूत्रीनुसार पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले आहेत.  सुरवातीला जिल्ह्यात साधारण 10 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात याच्या दुप्पट नुकसान झाले आहे. जिरायती शेतीतील भात, नाचणी, भुईमूग या शेतीचे 20 हजार 703 हेक्‍टर 49 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. बागायतीमधील ऊस शेतीचे 43 हेक्‍टर 45 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. आंबा, काजू, नारळ, सुपारी या फळ पिकांचे 427 हेक्‍टर 96 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात जिरायती, बागायत व फळ पीक या तिन्ही क्षेत्रांतील पिकांचे 21 हजार 174 हेक्‍टर नऊ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. यामुळे तब्बल 56 हजार 309 शेतकरी, बागायतदार बाधित झाले आहेत. 14 कोटी 90 लाख 78 एवढ्या रुपयांचे हे आर्थिक नुकसान झाले.  सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्‍यात  जिरायती शेतीत सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्‍यात नऊ हजार 599 हेक्‍टर 20 गुंठे क्षेत्राचे झाले आहे. या पाठोपाठ मालवण तालुक्‍यात तीन हजार 507 हेक्‍टर क्षेत्राचे, सावंतवाडी तालुक्‍यात दोन हजार 707 हेक्‍टर 47 गुंठे क्षेत्राचे, वैभववाडी तालुक्‍यात एक हजार 532 हेक्‍टर 37 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. कणकवली तालुक्‍यात एक हजार 384 हेक्‍टर, देवगड तालुक्‍यात 998 हेक्‍टर 56 गुंठे, वेंगुर्ले तालुक्‍यात 582 हेक्‍टर 36 गुंठे, दोडामार्ग तालुक्‍यात 392 हेक्‍टर 53 गुंठे अशाप्रकारे तालुकानिहाय नुकसान झाले आहे. दोडामार्ग- 1537, सावंतवाडी- 8558, वैभववाडी- 5183, मालवण- 8895, कणकवली- 5709, देवगड- 5448, वेंगुर्ले- 2963, कुडाळ- 18,016 अशा प्रकारे शेतकरी बाधित झाले आहेत.  हंगामात तीन वेळा नुकसान  चालू शेती हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तीन वेळा नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यातील 554 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले. तीन हजार 200 शेतकरी बाधित झाले असून, 40 लाख रुपयांचे एकूण नुकसान आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 48 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यात 313 शेतकरी बाधित होत तीन लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये झालेले तिसरे नुकसान आहे. तिन्ही वेळच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.  असे आहे मंजूर नुकसान  *जिरायती पिकासाठी हेक्‍टरी सहा हजार 800 रुपये  *बागायती पिकाला हेक्‍टरी 10 हजार 500 रुपये  *फळ पिकाला हेक्‍टरी 18 हजार रुपये    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I1CWkg

No comments:

Post a Comment