भिन्न रक्तगटाच्या रुग्णाचे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण; नायर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया मुंबई : कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनलॉकनंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत. अशा वेळी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयात रक्तगट न जुळताही म्हणजेच एबीओ पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आले.  शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना कोरोना संसर्गाची भीती आजही लोकांमध्ये दिसते. त्यामुळे रक्तदानासोबतच उपचार घेण्यासही रुग्ण घाबरत आहेत. परिणामी अवयवदानाची संख्या ही कमी होऊन अवयव प्रत्यारोपणाचा आकडाही घटला. मात्र अशा परिस्थितीत नायर रुग्णालयाने गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडदात्याची वाट पाहत असलेल्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डायलिसिसचा खर्च या रुग्णास दीर्घ काळ परवडणारा नव्हता. त्यामुळे समान रक्तगट नसताना ही वैद्यकीय निकषांचे पालन करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेही वाचा  ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे प्रत्यारोपित करण्यात आलेला अवयव शरीराने नाकारू नये, यासाठी प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी प्लाझ्माअफेरेसिस प्रक्रियेची मदत घेण्यात आली, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या इतर औषधांचाही वापर करण्यात आला. योग्य ती वैद्यकीय काळजी घेत हे प्रत्यारोपण करण्यात आले. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, साडेसात महिन्यानंतर दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नायर रुग्णालयाच्या नेफ्रॉलोजी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना मेहता यांनी आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत फळाली आली असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.  हेही वाचा - मुंबई पोलिस बेस्ट! उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक तपासण्या करूनच निर्णय  मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये रुग्ण व दाता या दोघांचेही रक्तगट, तसेच आरोग्यविषयक इतर निकष पूरक असल्याचे सर्व वैद्यकीय चाचण्या करून निश्‍चित केले जाते. यात रक्तगटाचे साधर्म्य महत्त्वाचे असते. शरीरातील प्रतिजैविकांच्या उपस्थितीमुळे रुग्णाच्या शरीरातून हा परकीय अवयव दूर लोटला जाऊ शकतो. मात्र समान रक्तदाता उपलब्ध न झाल्यास अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तपासण्या करून घेण्यात येतो, असेही ते म्हणाले.    नायर रुग्णालयाने एका चाळीस वर्षीय रुग्णाची रक्तगट जुळत नसतानाही एबीओ पद्धतीने यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप आहेत. पालिका रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक गरीब रुग्णांना जीवदान मिळणार आहे.  - डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय. Successful kidney transplantation of a patient of a different blood type Successful surgery at Nair Hospital ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 31, 2020

भिन्न रक्तगटाच्या रुग्णाचे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण; नायर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया मुंबई : कोरोना काळात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनलॉकनंतर आता हळूहळू पालिका रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहेत. अशा वेळी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयात रक्तगट न जुळताही म्हणजेच एबीओ पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाला जीवदान देण्यात आले.  शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना कोरोना संसर्गाची भीती आजही लोकांमध्ये दिसते. त्यामुळे रक्तदानासोबतच उपचार घेण्यासही रुग्ण घाबरत आहेत. परिणामी अवयवदानाची संख्या ही कमी होऊन अवयव प्रत्यारोपणाचा आकडाही घटला. मात्र अशा परिस्थितीत नायर रुग्णालयाने गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडदात्याची वाट पाहत असलेल्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डायलिसिसचा खर्च या रुग्णास दीर्घ काळ परवडणारा नव्हता. त्यामुळे समान रक्तगट नसताना ही वैद्यकीय निकषांचे पालन करून प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेही वाचा  ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे प्रत्यारोपित करण्यात आलेला अवयव शरीराने नाकारू नये, यासाठी प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी प्लाझ्माअफेरेसिस प्रक्रियेची मदत घेण्यात आली, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या इतर औषधांचाही वापर करण्यात आला. योग्य ती वैद्यकीय काळजी घेत हे प्रत्यारोपण करण्यात आले. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, साडेसात महिन्यानंतर दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नायर रुग्णालयाच्या नेफ्रॉलोजी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना मेहता यांनी आणि त्यांच्या पथकाने घेतलेली मेहनत फळाली आली असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.  हेही वाचा - मुंबई पोलिस बेस्ट! उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक तपासण्या करूनच निर्णय  मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये रुग्ण व दाता या दोघांचेही रक्तगट, तसेच आरोग्यविषयक इतर निकष पूरक असल्याचे सर्व वैद्यकीय चाचण्या करून निश्‍चित केले जाते. यात रक्तगटाचे साधर्म्य महत्त्वाचे असते. शरीरातील प्रतिजैविकांच्या उपस्थितीमुळे रुग्णाच्या शरीरातून हा परकीय अवयव दूर लोटला जाऊ शकतो. मात्र समान रक्तदाता उपलब्ध न झाल्यास अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तपासण्या करून घेण्यात येतो, असेही ते म्हणाले.    नायर रुग्णालयाने एका चाळीस वर्षीय रुग्णाची रक्तगट जुळत नसतानाही एबीओ पद्धतीने यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून दाता आणि रुग्ण हे दोघेही सुखरूप आहेत. पालिका रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक गरीब रुग्णांना जीवदान मिळणार आहे.  - डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय. Successful kidney transplantation of a patient of a different blood type Successful surgery at Nair Hospital ----------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mJF92T

No comments:

Post a Comment