गडावरील पायवाटेने घेतला मोकळा श्वास पन्हाळा ः आम्हाला दररोज या ना त्या कारणाने गडावर जावं लागतंय... गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने रस्ता खचला... ऐतिहासिक पायवाटेवर दगड-माती साचलीय... इकडे ना ग्रामपंचायतीचे लक्ष, ना पन्हाळा नगरपरिषदेचे. पन्हाळा नाक्‍याखालील तटबंदीची भिंत कोसळून बरीच वर्षे झाली. त्यातून गडावरील सांडपाणी वाहतंय, वयस्कर माणसांना चालताही येत नाही. साहजिकच गडाखालील ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला आणि वाकत, थकत, भागत, थांबत थांबत मंगळवार पेठ ते गडावर येणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत पायवाट जाण्या-येण्यास योग्य केली.  पन्हाळगडाखालची मंगळवार पेठ ही पूर्वीची बाजारपेठ. पेठेतूनच गडावर यायला चार दरवाजातील दगडी फरशीचा रस्ता. या रस्त्याखालून साधोबा तलावातील जादा पाणी वाहून जाण्यासाठी अंतर्गत व्यवस्था, भाग उताराचा असल्याने नगरपालिकेने गावातील सांडपाणी याच रस्त्याखालून पाईपद्वारे काढले. कालांतराने वरून दगड पडून पाईप फुटले. सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले, त्यातूनच मंगळवार पेठ, नेबापूर, आपटी, सोमवार पेठ परिसरातील शाळकरी मुले, नागरिक, मजूर, दूधविक्रेते ये-जा करत होते. सांडपाण्याचा दुर्गंध सहन होत नव्हता. परिसरातील लोकांनी आमदारांकडे तक्रार केली. पाहणी झाली, सूचना झाल्या; पण अंमलबजावणी शून्य.  आठ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने वरची माती, दगड कचरा पेठेत वाहून आला. घरांत पाणी शिरले. त्याचबरोबर रस्ताही खराब झाला, रस्त्यावरून चालता येईना. परिसरातील लोकांना बुधवार पेठेतून फेरा मारून यायची वेळ आली. अखेर पेठेतील विरुपाक्ष लुपणे, बाबूराव मणेर, लहू गवळी या ज्येष्ठ नागरिकांनी सुनील मुळे, संतोष जंगम, बाबूराव पाटील यांच्या सहकार्याने धापा टाकत रस्त्यावरील माती, दगडधोंडे, कचरा, जाळ्या-झुडपे बाजूला केली. धक्‍क्‍याजवळून वर मुख्य रस्त्यापर्यंत यायला पायवाट केली, आता लोक फेरा चुकवून याच पायवाटेवरून ये-जा करू लागले आहेत.  बऱ्याच वर्षांपासून परिसरातील लोकांची या ऐतिहासिक पायवाटेबाबत तक्रार आहे. सांडपाणी तसेच दगडधोंड्यातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. अर्ज-विनंत्या करूनही लोकांची फरफट थांबलेली नाही. कुणीच लक्ष देत नसल्याने नाईलाजाने आम्हा ज्येष्ठ व्यक्तींना पायवाट स्वच्छ करावी लागली.  - विरुपाक्ष लुपणे, ज्येष्ठ नागरिक संपादन ः रंगराव हिर्डेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

गडावरील पायवाटेने घेतला मोकळा श्वास पन्हाळा ः आम्हाला दररोज या ना त्या कारणाने गडावर जावं लागतंय... गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने रस्ता खचला... ऐतिहासिक पायवाटेवर दगड-माती साचलीय... इकडे ना ग्रामपंचायतीचे लक्ष, ना पन्हाळा नगरपरिषदेचे. पन्हाळा नाक्‍याखालील तटबंदीची भिंत कोसळून बरीच वर्षे झाली. त्यातून गडावरील सांडपाणी वाहतंय, वयस्कर माणसांना चालताही येत नाही. साहजिकच गडाखालील ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला आणि वाकत, थकत, भागत, थांबत थांबत मंगळवार पेठ ते गडावर येणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत पायवाट जाण्या-येण्यास योग्य केली.  पन्हाळगडाखालची मंगळवार पेठ ही पूर्वीची बाजारपेठ. पेठेतूनच गडावर यायला चार दरवाजातील दगडी फरशीचा रस्ता. या रस्त्याखालून साधोबा तलावातील जादा पाणी वाहून जाण्यासाठी अंतर्गत व्यवस्था, भाग उताराचा असल्याने नगरपालिकेने गावातील सांडपाणी याच रस्त्याखालून पाईपद्वारे काढले. कालांतराने वरून दगड पडून पाईप फुटले. सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले, त्यातूनच मंगळवार पेठ, नेबापूर, आपटी, सोमवार पेठ परिसरातील शाळकरी मुले, नागरिक, मजूर, दूधविक्रेते ये-जा करत होते. सांडपाण्याचा दुर्गंध सहन होत नव्हता. परिसरातील लोकांनी आमदारांकडे तक्रार केली. पाहणी झाली, सूचना झाल्या; पण अंमलबजावणी शून्य.  आठ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने वरची माती, दगड कचरा पेठेत वाहून आला. घरांत पाणी शिरले. त्याचबरोबर रस्ताही खराब झाला, रस्त्यावरून चालता येईना. परिसरातील लोकांना बुधवार पेठेतून फेरा मारून यायची वेळ आली. अखेर पेठेतील विरुपाक्ष लुपणे, बाबूराव मणेर, लहू गवळी या ज्येष्ठ नागरिकांनी सुनील मुळे, संतोष जंगम, बाबूराव पाटील यांच्या सहकार्याने धापा टाकत रस्त्यावरील माती, दगडधोंडे, कचरा, जाळ्या-झुडपे बाजूला केली. धक्‍क्‍याजवळून वर मुख्य रस्त्यापर्यंत यायला पायवाट केली, आता लोक फेरा चुकवून याच पायवाटेवरून ये-जा करू लागले आहेत.  बऱ्याच वर्षांपासून परिसरातील लोकांची या ऐतिहासिक पायवाटेबाबत तक्रार आहे. सांडपाणी तसेच दगडधोंड्यातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. अर्ज-विनंत्या करूनही लोकांची फरफट थांबलेली नाही. कुणीच लक्ष देत नसल्याने नाईलाजाने आम्हा ज्येष्ठ व्यक्तींना पायवाट स्वच्छ करावी लागली.  - विरुपाक्ष लुपणे, ज्येष्ठ नागरिक संपादन ः रंगराव हिर्डेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dd5Fhy

No comments:

Post a Comment