आयुष्याच्या पुंजीसाठी जीव लागलाय टांगणीला कोल्हापूर ः पै पै गाठीला बांधून आयुष्याची पुंजी सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी या बॅंकेत ठेवी ठेवल्या. सप्टेंबरमध्ये पीएमसी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले आणि ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला. मिळेल ती रक्कम पदरात पडावी यासाठी बॅंकेच्या दारात रांगा लागल्या. सकाळी आठ ते रात्री आठ अशी बॅंकेची वेळ अन्य बॅंका पाच वाजता बंद होत असताना या बॅंकेचे कामकाज रात्री आठपर्यत चालायचे. उर्वरित रक्कम कधी मिळणार यासाठी ठेवीदारांचा जीव अजूनही टांगणीला लागला आहे.  सात राज्यांत 137 शाखा असा विस्तार असलेल्या मल्टीस्टेट शेड्यूल बॅंकेवर कोल्हापूरकरांनी भरभरून विश्‍वास ठेवला. निवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात ठेवींवरील व्याजाचा आधार असतो. पीएमसी बॅंकेचे वैशिष्ट्य असे की 75 टक्के ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी येथे आहेत. घरगुती काम करणाऱ्या महिलांपासून बड्या शैक्षणिक संस्था इतकेच काय अन्य बॅंकांनी पीएमसीवर विश्‍वास ठेवला. 23 सप्टेंबर 2019 ला बॅंकेवर निर्बंध आले आणि ठेवीदारांचे धाबे दणाणले. प्रारंभी हजार नंतर दहा हजार, पंचवीस हजार आणि एक लाखापर्यंतची रक्कम एकदाच देण्याची व्यवस्था केली.  बॅंक बचाव समितीच्या युवकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापासून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची याप्रश्‍नी भेट घेतली. एखादी स्थानिक बॅंक असती तर कोणाकडे तरी दाद तरी मागता आली असती; पण बॅंकेत गेल्यानंतर आमच्या हाती काही नाही असे उत्तर मिळते. 23 डिसेंबरला निर्बंध उठतील असे सांगितले जाते. शहरात बॅंकेच्या सहा शाखा आहेत.  बॅंक पूर्ववत सुरू करा अथवा सक्षम बॅंकेत विलिनीकरण करा अशी आमची मागणी आहे. ज्या ज्या यंत्रणेकडे दाद मागणे शक्‍य आहे तेथे मागितली आहे. मात्र बॅंकेच्या दारात उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत यादव यांच्या नेतत्वाखाली किमान ही दिवाळी तरी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याची वेळ येऊ नये, याची बॅंक व्यवस्थापनाने काळजी घ्यावी.  - राजन डांगरे, मोहन पाटील, बचाव कृती समिती सदस्य  दृष्टिक्षेपात सद्यःस्थिती  ठेवी-550 कोटी  कर्जे-40 कोटी  खातेदार-75 हजार  ठेवी असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या-4  बॅंकांची संख्या-30  पतसंस्था, क्रेडीट सोसायटी, गृहनिर्माण संस्थांची संख्या-200    संपादन ः रंगराव हिर्डेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

आयुष्याच्या पुंजीसाठी जीव लागलाय टांगणीला कोल्हापूर ः पै पै गाठीला बांधून आयुष्याची पुंजी सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी या बॅंकेत ठेवी ठेवल्या. सप्टेंबरमध्ये पीएमसी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले आणि ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला. मिळेल ती रक्कम पदरात पडावी यासाठी बॅंकेच्या दारात रांगा लागल्या. सकाळी आठ ते रात्री आठ अशी बॅंकेची वेळ अन्य बॅंका पाच वाजता बंद होत असताना या बॅंकेचे कामकाज रात्री आठपर्यत चालायचे. उर्वरित रक्कम कधी मिळणार यासाठी ठेवीदारांचा जीव अजूनही टांगणीला लागला आहे.  सात राज्यांत 137 शाखा असा विस्तार असलेल्या मल्टीस्टेट शेड्यूल बॅंकेवर कोल्हापूरकरांनी भरभरून विश्‍वास ठेवला. निवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात ठेवींवरील व्याजाचा आधार असतो. पीएमसी बॅंकेचे वैशिष्ट्य असे की 75 टक्के ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी येथे आहेत. घरगुती काम करणाऱ्या महिलांपासून बड्या शैक्षणिक संस्था इतकेच काय अन्य बॅंकांनी पीएमसीवर विश्‍वास ठेवला. 23 सप्टेंबर 2019 ला बॅंकेवर निर्बंध आले आणि ठेवीदारांचे धाबे दणाणले. प्रारंभी हजार नंतर दहा हजार, पंचवीस हजार आणि एक लाखापर्यंतची रक्कम एकदाच देण्याची व्यवस्था केली.  बॅंक बचाव समितीच्या युवकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापासून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची याप्रश्‍नी भेट घेतली. एखादी स्थानिक बॅंक असती तर कोणाकडे तरी दाद तरी मागता आली असती; पण बॅंकेत गेल्यानंतर आमच्या हाती काही नाही असे उत्तर मिळते. 23 डिसेंबरला निर्बंध उठतील असे सांगितले जाते. शहरात बॅंकेच्या सहा शाखा आहेत.  बॅंक पूर्ववत सुरू करा अथवा सक्षम बॅंकेत विलिनीकरण करा अशी आमची मागणी आहे. ज्या ज्या यंत्रणेकडे दाद मागणे शक्‍य आहे तेथे मागितली आहे. मात्र बॅंकेच्या दारात उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत यादव यांच्या नेतत्वाखाली किमान ही दिवाळी तरी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याची वेळ येऊ नये, याची बॅंक व्यवस्थापनाने काळजी घ्यावी.  - राजन डांगरे, मोहन पाटील, बचाव कृती समिती सदस्य  दृष्टिक्षेपात सद्यःस्थिती  ठेवी-550 कोटी  कर्जे-40 कोटी  खातेदार-75 हजार  ठेवी असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या-4  बॅंकांची संख्या-30  पतसंस्था, क्रेडीट सोसायटी, गृहनिर्माण संस्थांची संख्या-200    संपादन ः रंगराव हिर्डेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36Ftpte

No comments:

Post a Comment