दिवाळीसाठी तीनशे विद्यार्थी बनवणार हजारावर आकाश कंदिल  सांगली : यंदाच्या दिवाळीत तुमच्या घरी असा आकाश कंदिल आणा की त्याने त्यांच्या संघर्षमय आयुष्य उजळेल. शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या तीनशेंवर मुलांनी यंदाच्या दिवाळीसाठी सुमारे हजारांवर आकाश कंदिल तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. ही सारी मुले कष्टकरी कुटुंबातील, निराधार, एकल पालक असलेल्या कुटुंबातील आहेत. स्वावलंबनाचे धडे घेत शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी तुम्ही हा आकाश कंदिल खरेदी कराच.  येथील आकार फौंडेशनच्या वतीने विद्यार्थी दत्तक शिष्यवृत्ती योजनेतील ही सारी मुले आहेत. ज्यांच्या डोईवरचे आई वडिलांपैकी एकाचे छत्र हरवले आहे. जी मुले आपल्या नातलगांकडे राहून शिक्षण घेत आहेत, अशा गरीब कुुटुंबातील मुलांसाठी समाजाच्या सहभागातून ही योजना राबवली जाते. कौटुंबिक साहित्य व शालेय मदतीबरोबरच या मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातात. त्यांच्या जगण्याची कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा तीनशेंवर मुलांना आकाश कंदिल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.  येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील पालिका शिक्षण मंडळाच्या वर्गखोल्यांमध्ये रोज चौदा मुलांना आकाश कंदिल बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत दिडशेंवर मुलांनी कार्डशीटपासून तीनशेंवर आकाश कंदिल बनवले आहेत. हे आकाश कंदिल रात्रीच्या उजेडात आकर्षक दिसतातच. पण दिवसाही ते आकर्षक दिसावेत यासाठी सजावट केली जात आहे. अवघ्या शंभर रुपयांमध्ये ते उपलब्ध आहेत. एक नोव्हेंबरपासून त्याचे प्रदर्शनही या पालिका शाळेतील आकार फौंडेशनच्या कार्यालयात मांडले जाणार आहे.  मुलांनी बनवलेले आकाश दिवे अतिशय आकर्षक आणि सजावटपुर्ण आहेत. त्यातून मुले अर्थाजन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीसाठी मदत देणार आहेत. स्वतःसाठी खरेदी करीत आहेत. आपली शंभर रुपयांची खरेदी त्यांच्यात आत्मविश्‍वास तयार करेल.  - सुप्रिया वाटवे, आकार फौंडेशन   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 30, 2020

दिवाळीसाठी तीनशे विद्यार्थी बनवणार हजारावर आकाश कंदिल  सांगली : यंदाच्या दिवाळीत तुमच्या घरी असा आकाश कंदिल आणा की त्याने त्यांच्या संघर्षमय आयुष्य उजळेल. शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या तीनशेंवर मुलांनी यंदाच्या दिवाळीसाठी सुमारे हजारांवर आकाश कंदिल तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. ही सारी मुले कष्टकरी कुटुंबातील, निराधार, एकल पालक असलेल्या कुटुंबातील आहेत. स्वावलंबनाचे धडे घेत शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी तुम्ही हा आकाश कंदिल खरेदी कराच.  येथील आकार फौंडेशनच्या वतीने विद्यार्थी दत्तक शिष्यवृत्ती योजनेतील ही सारी मुले आहेत. ज्यांच्या डोईवरचे आई वडिलांपैकी एकाचे छत्र हरवले आहे. जी मुले आपल्या नातलगांकडे राहून शिक्षण घेत आहेत, अशा गरीब कुुटुंबातील मुलांसाठी समाजाच्या सहभागातून ही योजना राबवली जाते. कौटुंबिक साहित्य व शालेय मदतीबरोबरच या मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातात. त्यांच्या जगण्याची कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा तीनशेंवर मुलांना आकाश कंदिल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.  येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील पालिका शिक्षण मंडळाच्या वर्गखोल्यांमध्ये रोज चौदा मुलांना आकाश कंदिल बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आत्तापर्यंत दिडशेंवर मुलांनी कार्डशीटपासून तीनशेंवर आकाश कंदिल बनवले आहेत. हे आकाश कंदिल रात्रीच्या उजेडात आकर्षक दिसतातच. पण दिवसाही ते आकर्षक दिसावेत यासाठी सजावट केली जात आहे. अवघ्या शंभर रुपयांमध्ये ते उपलब्ध आहेत. एक नोव्हेंबरपासून त्याचे प्रदर्शनही या पालिका शाळेतील आकार फौंडेशनच्या कार्यालयात मांडले जाणार आहे.  मुलांनी बनवलेले आकाश दिवे अतिशय आकर्षक आणि सजावटपुर्ण आहेत. त्यातून मुले अर्थाजन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीसाठी मदत देणार आहेत. स्वतःसाठी खरेदी करीत आहेत. आपली शंभर रुपयांची खरेदी त्यांच्यात आत्मविश्‍वास तयार करेल.  - सुप्रिया वाटवे, आकार फौंडेशन   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kJdIFz

No comments:

Post a Comment