कोरोनाच्या काळात स्वीकारली जोखीम, तरी तीन महिन्यांपासून वेतन नाही, न्याय देणार कोण?   नागपूर  : कोरोनाच्या संकटकाळातही सर्वप्रकारच्या जोखीम स्वीकारून सेवा देणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे कामगारांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने नऊ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. इंटकनेही न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले. एसटी महामंडळाची तर पुरती वाताहत झाली आहे. कठीण काळातही एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवारत आहेत. यानंतरही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन थकले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे.  हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता   लासलगाव येथे एसटीच्या वाहक महिलेने मुलीसह रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. पण, त्याची दखलही सरकारकडून घेतली गेली नाही. एसटीचे राज्यभरात सुमारे सव्वालाख कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी २५० कोटींचा खर्च होतो. पण, गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. ७ ऑगस्टपर्यंत किमान जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन द्यावे अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यभरात विभागीय स्तरावर उपोषण करीत आत्मक्लेष केले जाईल असा इशारा संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार व विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे हा महामंडळाने केलेला कायद्याचा भंग आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास महामंडळाविरोधात न्यायालयात जाण्याचा सोबतच महामंडळाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे. त्यापूर्वी २ ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून करण्यात आला आहे.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

कोरोनाच्या काळात स्वीकारली जोखीम, तरी तीन महिन्यांपासून वेतन नाही, न्याय देणार कोण?   नागपूर  : कोरोनाच्या संकटकाळातही सर्वप्रकारच्या जोखीम स्वीकारून सेवा देणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे कामगारांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेने नऊ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. इंटकनेही न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले. एसटी महामंडळाची तर पुरती वाताहत झाली आहे. कठीण काळातही एसटी कर्मचारी रात्रंदिवस सेवारत आहेत. यानंतरही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन थकले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे.  हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता   लासलगाव येथे एसटीच्या वाहक महिलेने मुलीसह रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. पण, त्याची दखलही सरकारकडून घेतली गेली नाही. एसटीचे राज्यभरात सुमारे सव्वालाख कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी २५० कोटींचा खर्च होतो. पण, गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. ७ ऑगस्टपर्यंत किमान जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन द्यावे अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यभरात विभागीय स्तरावर उपोषण करीत आत्मक्लेष केले जाईल असा इशारा संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार व विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे हा महामंडळाने केलेला कायद्याचा भंग आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास महामंडळाविरोधात न्यायालयात जाण्याचा सोबतच महामंडळाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे. त्यापूर्वी २ ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेकडून करण्यात आला आहे.  संपादन  : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2EUqstu

No comments:

Post a Comment