'जेईएस' च्या अध्ययन केंद्रांने घेतला गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा !   जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु पंधरा वर्षांपासून सुरु असलेले अनेक उपक्रम दिशादर्शक ठरत आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा जेईएस महाविद्यालयातील अध्ययन केंद्राने घेतलेला आहे. आतापर्यंत सोळा राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर पार पडले. यात राज्यातील १ हजार ७५० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. शिक्षकांसाठी बारा कार्यशाळा पार पडल्या.या उपक्रमांतर्गत एक हजारपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होते. गांधी केंद्राच्या वतीने शिक्षकांसाठी कार्यशाळा,नॅचरोपॅथी शिबिर, निसर्ग शेती,निसर्ग कार्यशाळा ,सायकल यात्रा,पदयात्रा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कारागृहातही गांधीविचार  गांधी अध्ययन केंद्राचा विशेष उपक्रम म्हणजे कारागृहातील कैद्यांसाठी ' गांधी विचार प्रेरणा परीक्षा 'होय. या परीक्षेत अनेक कैदी सहभाग घेतात. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने पाच वर्षांपासून कैद्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत चारशे कैद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कैद्यांना बक्षीस म्हणून खादीचा ड्रेस, टॉवेल, रुमाल देण्याची अनोखी पद्धत आहे.  शालेय विद्यार्थ्यासाठी परीक्षा  जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गांधीविचार पोचवावा म्हणून अध्ययन केंद्र प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी गांधी विचार परीक्षा तेरा वर्षांपासून आयोजन करण्यात येते. या परीक्षेत ६० हजार विद्यार्थ्याचा सहभाग राहिलेला आहे.  चित्र प्रदर्शनाचा उपक्रम  केंद्राच्या वतीने गांधी जीवन चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येते. आतापर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनातून गांधी विचार समजून घेतला आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कैद्याने पाठविले भावनिक पत्र  मी जालन्याच्या जेलमध्ये होतो,तेव्हा गांधी विचार परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता. खरेतर मला तेव्हापासून गांधी विचार समजला, अशा आशयाचे पत्र कैदी संतोष खंदारे यांनी केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांना पाठविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आवर्जून हे पत्र पाठवीत केंद्राचे आभारही मानले. तसेच गांधी विचारांमुळे जीवनात आलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा संदेशही यानिमित्त जणू दिला गेला.  गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कारागृहातील कैद्यांसाठी आम्ही गांधी विचार प्रेरणा परीक्षा घेतल्या.यातून कैद्याची मानसिकता बदलू शकते आणि गांधी विचार समजू शकतो,हीच मोठी पावती आहे. - डॉ.यशवंत सोनुने, संचालक, गांधी अध्ययन केंद्र  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

'जेईएस' च्या अध्ययन केंद्रांने घेतला गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा !   जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु पंधरा वर्षांपासून सुरु असलेले अनेक उपक्रम दिशादर्शक ठरत आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! गांधी विचारांच्या प्रसाराचा वसा जेईएस महाविद्यालयातील अध्ययन केंद्राने घेतलेला आहे. आतापर्यंत सोळा राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर पार पडले. यात राज्यातील १ हजार ७५० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. शिक्षकांसाठी बारा कार्यशाळा पार पडल्या.या उपक्रमांतर्गत एक हजारपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होते. गांधी केंद्राच्या वतीने शिक्षकांसाठी कार्यशाळा,नॅचरोपॅथी शिबिर, निसर्ग शेती,निसर्ग कार्यशाळा ,सायकल यात्रा,पदयात्रा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे अडचण निर्माण झाली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कारागृहातही गांधीविचार  गांधी अध्ययन केंद्राचा विशेष उपक्रम म्हणजे कारागृहातील कैद्यांसाठी ' गांधी विचार प्रेरणा परीक्षा 'होय. या परीक्षेत अनेक कैदी सहभाग घेतात. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने पाच वर्षांपासून कैद्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत चारशे कैद्यांनी गांधी विचार परीक्षा दिली. या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कैद्यांना बक्षीस म्हणून खादीचा ड्रेस, टॉवेल, रुमाल देण्याची अनोखी पद्धत आहे.  शालेय विद्यार्थ्यासाठी परीक्षा  जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गांधीविचार पोचवावा म्हणून अध्ययन केंद्र प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी गांधी विचार परीक्षा तेरा वर्षांपासून आयोजन करण्यात येते. या परीक्षेत ६० हजार विद्यार्थ्याचा सहभाग राहिलेला आहे.  चित्र प्रदर्शनाचा उपक्रम  केंद्राच्या वतीने गांधी जीवन चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येते. आतापर्यंत ४० हजार विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनातून गांधी विचार समजून घेतला आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कैद्याने पाठविले भावनिक पत्र  मी जालन्याच्या जेलमध्ये होतो,तेव्हा गांधी विचार परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता. खरेतर मला तेव्हापासून गांधी विचार समजला, अशा आशयाचे पत्र कैदी संतोष खंदारे यांनी केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांना पाठविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आवर्जून हे पत्र पाठवीत केंद्राचे आभारही मानले. तसेच गांधी विचारांमुळे जीवनात आलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा संदेशही यानिमित्त जणू दिला गेला.  गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कारागृहातील कैद्यांसाठी आम्ही गांधी विचार प्रेरणा परीक्षा घेतल्या.यातून कैद्याची मानसिकता बदलू शकते आणि गांधी विचार समजू शकतो,हीच मोठी पावती आहे. - डॉ.यशवंत सोनुने, संचालक, गांधी अध्ययन केंद्र  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30pK6VI

No comments:

Post a Comment