Nashik Corona Updates : कोरोनाबळींची संख्या पंधराशेच्‍या उंबरठ्यावर; मृतांपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण चाळिशीपुढील  नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या पंधराशेच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. आतापर्यंत एक हजार ४९८ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. शुक्रवार (ता. ९)पर्यंतच्‍या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्‍युदर १.७७ टक्‍के असून, आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण हे चाळिशीपुढील आहेत.  जिल्ह्याचा मृत्‍युदर १.७७ टक्‍के जिल्ह्यातील एकूण मृत्‍यूंपैकी नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक ७९५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झालेला आहे. त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणमधील ५०८, मालेगाव महापालिका हद्दीत १६०, तर जिल्‍हाबाह्य ३५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. जिल्ह्यात पहिला बळी मालेगाव परिसरातील गेला होता. पहिल्‍या टप्प्‍यात मालेगावमध्ये कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला. मात्र, तेथील परिस्‍थिती आटोक्‍यात आल्‍यानंतर नाशिक शहर व ग्रामीण भागातील मृतांची संख्या वाढत गेली आहे.  एकूण मृतांपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण चाळिशीपुढील  दरम्‍यान, आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंपैकी तब्‍बल ९०८ रुग्‍णांना यापूर्वी कुठल्‍याही स्‍वरूपाची आरोग्‍यविषयक तक्रार नव्‍हती. तर उच्च रक्‍तदाब (हायपर टेन्शन) असलेल्‍या १९६ रुग्‍णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मधुमेहाची पार्श्‍वभूमी असलेले २२९, गंभीर स्‍वरूपाचे आजार असलेले ६५, तर अन्‍य व्‍याधींनी त्रस्‍त शंभर रुग्‍णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.  हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना  पुरुषांचे प्रमाण ७०.८९ टक्के  एकूण मृतांपैकी एक हजार ६२ पुरुष रुग्‍ण असून, हे प्रमाण ७०.८९ टक्‍के इतके आहे. तर ४३६ महिला रुग्‍णांचा कोरोनाने मृत्‍यू झालेला आहे. रुग्‍णालयात दाखल करण्यापूर्वीच तेरा रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला होता. तर उपचाराच्‍या पहिल्‍या दिवशी ३०८, उपचार सुरू झाल्‍याच्या दुसऱ्या दिवशी १९३, तिसऱ्या दिवशी १३२ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. उपचार घेत असताना शर्थीचे प्रयत्‍न करूनही प्राण वाचविण्यात यश न आल्‍याने चौथ्या दिवशी मृत्‍यू होणाऱ्या रुग्‍णांची संख्या ८५२ इतकी आहे.  हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज वयोगटनिहाय मृत्यू  वयोगट मृत्‍यू  ०-१२ २  १३-२५ २०  २६-४० १०९  ४१-६० ५८०  ६१ पेक्षा अधिक ७८७   संपादन - ज्योती देवरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 9, 2020

Nashik Corona Updates : कोरोनाबळींची संख्या पंधराशेच्‍या उंबरठ्यावर; मृतांपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण चाळिशीपुढील  नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या पंधराशेच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. आतापर्यंत एक हजार ४९८ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. शुक्रवार (ता. ९)पर्यंतच्‍या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्‍युदर १.७७ टक्‍के असून, आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण हे चाळिशीपुढील आहेत.  जिल्ह्याचा मृत्‍युदर १.७७ टक्‍के जिल्ह्यातील एकूण मृत्‍यूंपैकी नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक ७९५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झालेला आहे. त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणमधील ५०८, मालेगाव महापालिका हद्दीत १६०, तर जिल्‍हाबाह्य ३५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. जिल्ह्यात पहिला बळी मालेगाव परिसरातील गेला होता. पहिल्‍या टप्प्‍यात मालेगावमध्ये कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला. मात्र, तेथील परिस्‍थिती आटोक्‍यात आल्‍यानंतर नाशिक शहर व ग्रामीण भागातील मृतांची संख्या वाढत गेली आहे.  एकूण मृतांपैकी ९१.२५ टक्‍के रुग्‍ण चाळिशीपुढील  दरम्‍यान, आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंपैकी तब्‍बल ९०८ रुग्‍णांना यापूर्वी कुठल्‍याही स्‍वरूपाची आरोग्‍यविषयक तक्रार नव्‍हती. तर उच्च रक्‍तदाब (हायपर टेन्शन) असलेल्‍या १९६ रुग्‍णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मधुमेहाची पार्श्‍वभूमी असलेले २२९, गंभीर स्‍वरूपाचे आजार असलेले ६५, तर अन्‍य व्‍याधींनी त्रस्‍त शंभर रुग्‍णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.  हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना  पुरुषांचे प्रमाण ७०.८९ टक्के  एकूण मृतांपैकी एक हजार ६२ पुरुष रुग्‍ण असून, हे प्रमाण ७०.८९ टक्‍के इतके आहे. तर ४३६ महिला रुग्‍णांचा कोरोनाने मृत्‍यू झालेला आहे. रुग्‍णालयात दाखल करण्यापूर्वीच तेरा रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला होता. तर उपचाराच्‍या पहिल्‍या दिवशी ३०८, उपचार सुरू झाल्‍याच्या दुसऱ्या दिवशी १९३, तिसऱ्या दिवशी १३२ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. उपचार घेत असताना शर्थीचे प्रयत्‍न करूनही प्राण वाचविण्यात यश न आल्‍याने चौथ्या दिवशी मृत्‍यू होणाऱ्या रुग्‍णांची संख्या ८५२ इतकी आहे.  हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज वयोगटनिहाय मृत्यू  वयोगट मृत्‍यू  ०-१२ २  १३-२५ २०  २६-४० १०९  ४१-६० ५८०  ६१ पेक्षा अधिक ७८७   संपादन - ज्योती देवरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3loihVU

No comments:

Post a Comment