शाळेचे विद्यार्थीच झाले मुख्याध्यापक, गणित विषयातही तज्ज्ञ अचलपूर (जि. अमरावती) : व्यक्ती कितीही मोठा अथवा छोटा असो बालपण अन्‌ शाळेतील आठवणी सर्वांना आपसूकच आठवतात. ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाल्याची आगळीवेगळी कहाणी निश्‍चितच भूषणावह अशीच राहते. अशीच कहाणी अचलपूर शहरातील गणित विषयांत तज्ज्ञ म्हणून ख्याती असलेले संजय चौबे यांची आहे. संजय चौबे यांनी शहरातील सुबोध हायस्कूलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच शाळेच्या मुख्याध्यापक पदाचे कर्तव्य बजावण्याचा त्यांना बहुमान मिळाला आहे. संजय चौबे यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुबोध शाळेत घेतले होते. त्यानंतर 1993 साली याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. 27 वर्षांपासून ते या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत असून गणित विषयाचे ते तज्ज्ञ मानले जातात. अध्यापन करण्याबरोबरच शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांत त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. विशेष म्हणजे आई शालिनी, वडील प्रभाकर चौबे यांनी हॉटेलचा व्यवसाय चालवीत संजय चौबे यांच्यासह इतर भावांचे शिक्षण पूर्ण केले. संजय चौबे यांनी बीएससी बीएड, डीसीएम शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली, तर चौबे यांच्या सहचारिणी स्वाती यादेखील बीएससी बीएड उच्चशिक्षित आहेत. आज ज्या शाळेत खडतर परिस्थितीचा सामना करीत शिक्षण पूर्ण केले, त्याच शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाल्याने चौबे यांच्यासह कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्यासाठी आनंदाचा दिवस - ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेचे मुख्याध्यापकपदी माझी निवड झाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरला आहे. निश्‍चितपणे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम राबवत शाळेची यशस्वी घोडदौड अशीच पुढे सुरू राहील, यासाठी मी प्रयत्न करेल. - संजय चौबे, मुख्याध्यापक, सुबोध हायस्कूल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 10, 2020

शाळेचे विद्यार्थीच झाले मुख्याध्यापक, गणित विषयातही तज्ज्ञ अचलपूर (जि. अमरावती) : व्यक्ती कितीही मोठा अथवा छोटा असो बालपण अन्‌ शाळेतील आठवणी सर्वांना आपसूकच आठवतात. ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाल्याची आगळीवेगळी कहाणी निश्‍चितच भूषणावह अशीच राहते. अशीच कहाणी अचलपूर शहरातील गणित विषयांत तज्ज्ञ म्हणून ख्याती असलेले संजय चौबे यांची आहे. संजय चौबे यांनी शहरातील सुबोध हायस्कूलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच शाळेच्या मुख्याध्यापक पदाचे कर्तव्य बजावण्याचा त्यांना बहुमान मिळाला आहे. संजय चौबे यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुबोध शाळेत घेतले होते. त्यानंतर 1993 साली याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. 27 वर्षांपासून ते या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत असून गणित विषयाचे ते तज्ज्ञ मानले जातात. अध्यापन करण्याबरोबरच शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांत त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. विशेष म्हणजे आई शालिनी, वडील प्रभाकर चौबे यांनी हॉटेलचा व्यवसाय चालवीत संजय चौबे यांच्यासह इतर भावांचे शिक्षण पूर्ण केले. संजय चौबे यांनी बीएससी बीएड, डीसीएम शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली, तर चौबे यांच्या सहचारिणी स्वाती यादेखील बीएससी बीएड उच्चशिक्षित आहेत. आज ज्या शाळेत खडतर परिस्थितीचा सामना करीत शिक्षण पूर्ण केले, त्याच शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाल्याने चौबे यांच्यासह कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्यासाठी आनंदाचा दिवस - ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेचे मुख्याध्यापकपदी माझी निवड झाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरला आहे. निश्‍चितपणे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा, उपक्रम राबवत शाळेची यशस्वी घोडदौड अशीच पुढे सुरू राहील, यासाठी मी प्रयत्न करेल. - संजय चौबे, मुख्याध्यापक, सुबोध हायस्कूल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GCoUVX

No comments:

Post a Comment