पिढ्यान पिढ्या असनिये गाव रोगांपासून दूर बांदा (सिंधुदुर्ग) - स्वच्छता ही परंपरा म्हणून पाळणारा असनिये गाव कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित राहिला आहे. विशेष म्हणजे लोक कोरोनासाठी आता सांगितल्या जाणाऱ्या स्वच्छतेविषयी गोष्टी अनेक पिढ्यांपासून पाळत आले आहेत. हे गाव प्लेगच्या महामारी काळातही या स्वच्छता संस्कृतीमुळे सुरक्षित राहिले होते.  कोरोनाच्या वैश्‍विक संकटातून अद्यापही जग सावरलेले नाही. कोरोनाला प्रतिबंधासाठी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी यासाठी "मीच माझा रक्षक' या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यविषयक सूचना देण्यात येत असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन होत आहे; मात्र सावंतवाडी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य असनियेतील ग्रामस्थ ही नियमावली शेकडो वर्षे पिढ्यान्‌ पिढ्या जपत आहेत. त्यामुळेच या गावात अद्यापही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वतःच्या पर्यायाने गावाच्या काळजीसाठी ग्रामस्थांनी जपलेल्या या परंपरेचा आदर्श इतर गावांनी व शासनाने घेणे गरजेचे आहे.  कोरोना संकटात बांदा शहर व परिसरातील गावेही सापडली आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या संकटाची छाया गडद होत असताना असनिये गाव मात्र अद्याप सुरक्षित आहे. गाव कोरोनामुक्त राहण्यामागे येथील लोकांची जीवनशैली व राहणीमान कारणीभूत आहे. या गावातील ग्रामस्थ बाजारासाठी किंवा इतर कामांसाठी बांदा शहर किंवा अन्यत्र ये-जा करत असतात. गावाच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर थेट घरात न जाता शरीराची वैयक्तिक स्वच्छता व आंघोळ केल्यानंतरच घरात प्रवेश करतात. हे आज होत नाही, तर ही इथली परंपराच आहे. जिचे पालन ग्रामस्थ शेकडो वर्षे, पिढ्यान्‌ पिढ्या करत आहेत. शाळेतून घरी येणाऱ्या मुलांनाही ही शिकवण देण्यात येते. 1918 मध्ये सावंतवाडी येथे आलेल्या प्लेगच्या साथीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. प्लेगच्या जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने कित्येकांना या रोगाची बाधा झाली होती. त्यावेळीही असनिये सुरक्षित होते. बांदा दशक्रोशीत माकडतापाचा कहर सुरू असतानाही असनिये गावात याचा प्रादुर्भाव झाला नव्हता.    दृष्टिक्षेपात गाव...  - नारळ, फोफळींच्या बागांसह विस्तीर्ण जंगल  - वन्यजीव, औषधी वनस्पतींनी समृद्ध  - तब्बल 81 नैसर्गिक पाण्याचे स्रोत  - 1300 लोकवस्तीचे गाव  - निसर्ग पर्यटनासह धार्मिक अस्मितेची जपणूक  - गावात वर्षभर दारूबंदी  - धनेश (हॉर्नबिल) या पक्ष्याचे संवर्धन  - विहीर नसलेले गाव म्हणूनही ओळख   नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेले असनिये हे पूर्णपणे सुरक्षित आहे. "मीच माझा रक्षक' हे ब्रीद येथील ग्रामस्थ नित्यनेमाने पाळतात. गावात कुठल्याही प्रकारच्या दुर्धर व जीवघेण्या व्याधीने प्रवेश करू नये यासाठी पूर्वजांनी या नियमांची आखणी केली होती. जंतुसंसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थ काटेकोरपणे पालन करत आहेत. यामध्ये गावातील सर्वधर्मीय लोक सहभागी होत असल्याने गावाची एकजूट अधोरेखित झाली आहे.  - गजानन सावंत, माजी सरपंच, असनिये.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

पिढ्यान पिढ्या असनिये गाव रोगांपासून दूर बांदा (सिंधुदुर्ग) - स्वच्छता ही परंपरा म्हणून पाळणारा असनिये गाव कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित राहिला आहे. विशेष म्हणजे लोक कोरोनासाठी आता सांगितल्या जाणाऱ्या स्वच्छतेविषयी गोष्टी अनेक पिढ्यांपासून पाळत आले आहेत. हे गाव प्लेगच्या महामारी काळातही या स्वच्छता संस्कृतीमुळे सुरक्षित राहिले होते.  कोरोनाच्या वैश्‍विक संकटातून अद्यापही जग सावरलेले नाही. कोरोनाला प्रतिबंधासाठी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी यासाठी "मीच माझा रक्षक' या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यविषयक सूचना देण्यात येत असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन होत आहे; मात्र सावंतवाडी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य असनियेतील ग्रामस्थ ही नियमावली शेकडो वर्षे पिढ्यान्‌ पिढ्या जपत आहेत. त्यामुळेच या गावात अद्यापही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वतःच्या पर्यायाने गावाच्या काळजीसाठी ग्रामस्थांनी जपलेल्या या परंपरेचा आदर्श इतर गावांनी व शासनाने घेणे गरजेचे आहे.  कोरोना संकटात बांदा शहर व परिसरातील गावेही सापडली आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या संकटाची छाया गडद होत असताना असनिये गाव मात्र अद्याप सुरक्षित आहे. गाव कोरोनामुक्त राहण्यामागे येथील लोकांची जीवनशैली व राहणीमान कारणीभूत आहे. या गावातील ग्रामस्थ बाजारासाठी किंवा इतर कामांसाठी बांदा शहर किंवा अन्यत्र ये-जा करत असतात. गावाच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर थेट घरात न जाता शरीराची वैयक्तिक स्वच्छता व आंघोळ केल्यानंतरच घरात प्रवेश करतात. हे आज होत नाही, तर ही इथली परंपराच आहे. जिचे पालन ग्रामस्थ शेकडो वर्षे, पिढ्यान्‌ पिढ्या करत आहेत. शाळेतून घरी येणाऱ्या मुलांनाही ही शिकवण देण्यात येते. 1918 मध्ये सावंतवाडी येथे आलेल्या प्लेगच्या साथीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. प्लेगच्या जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने कित्येकांना या रोगाची बाधा झाली होती. त्यावेळीही असनिये सुरक्षित होते. बांदा दशक्रोशीत माकडतापाचा कहर सुरू असतानाही असनिये गावात याचा प्रादुर्भाव झाला नव्हता.    दृष्टिक्षेपात गाव...  - नारळ, फोफळींच्या बागांसह विस्तीर्ण जंगल  - वन्यजीव, औषधी वनस्पतींनी समृद्ध  - तब्बल 81 नैसर्गिक पाण्याचे स्रोत  - 1300 लोकवस्तीचे गाव  - निसर्ग पर्यटनासह धार्मिक अस्मितेची जपणूक  - गावात वर्षभर दारूबंदी  - धनेश (हॉर्नबिल) या पक्ष्याचे संवर्धन  - विहीर नसलेले गाव म्हणूनही ओळख   नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेले असनिये हे पूर्णपणे सुरक्षित आहे. "मीच माझा रक्षक' हे ब्रीद येथील ग्रामस्थ नित्यनेमाने पाळतात. गावात कुठल्याही प्रकारच्या दुर्धर व जीवघेण्या व्याधीने प्रवेश करू नये यासाठी पूर्वजांनी या नियमांची आखणी केली होती. जंतुसंसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थ काटेकोरपणे पालन करत आहेत. यामध्ये गावातील सर्वधर्मीय लोक सहभागी होत असल्याने गावाची एकजूट अधोरेखित झाली आहे.  - गजानन सावंत, माजी सरपंच, असनिये.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jGebb2

No comments:

Post a Comment