दोडामार्गचे महसूल अधिकारी धारेवर  दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वझरे येथे बंद चिरेखाणीतील पाण्यात बुडून दोघा भावंडांच्या मृत्यूप्रकरणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी केलेल्या प्रश्‍नांच्या सरबत्तीला कर्मचारी उत्तर देवू शकले नाही; मात्र प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी बंद खाणीभोवती कुंपण करण्याची आणि त्या बुजविण्याची जबाबदारी खाणमालकाची आहे आणि त्यांनी त्या अटी शर्ती पाळल्या की नाही हे पाहण्याची जबाबदारी तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदारांची असल्याचे मान्य केले. या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचेही कबूल केले.  यावेळी त्या मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. उघड्या खाणी बुजविणे, महसूलकडून आर्थिक मदत देणे आणि संबंधितांवर कारवाई करणे याबाबत 15 दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. वझरे धनगरवाडी येथील धोंडीराम भगवान जंगले (वय 7) व नागू विठ्ठल जंगले (वय 6) या भावंडांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी आणि नियमांची पायमल्ली करुन सुरु असणाऱ्या खाणी बंद करुन दोषी खाणमालक व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्याची प्रत तहसीलदारांना देऊन सर्वांनी चर्चा केली. श्री. कर्पे यांनी माहिती देण्यासाठी नायब तहसीलदार एन. एन. देसाई, मंडळ अधिकारी राजन गवस, आयी तलाठी श्रीमती पाटील, वझरे तलाठी श्रीमती परब-मयेकर यांना बोलावले. दोन्ही तलाठी एकदम मागे थांबल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा-पुन्हा मागे वळून बोलावे लागे. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना समोर येऊन बोला, असे सांगितले; मात्र श्री. कर्पे यांनी त्या काय आरोपी आहेत काय, बोलू द्या तिथून असे उत्तर दिले. त्या खाणीबाबत आपल्याकडे काहीही रेकॉर्ड नाही, असे श्रीमती परब-मयेकर म्हणाल्या तर श्री. देसाई यांनी आपल्याकडे रेकॉर्ड आहे सांगितले. रेकॉर्ड असेल तर उत्खनन करणारा व्यावसायिक कोण? असे विचारताच त्याचे उत्तर देणे मात्र सर्वांनीच टाळले. तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नझिर शेख, जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, व्हीजेएनटी सेलचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष संदेश वरक, दीपक जाधव, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  चिरेखाणीची नोंदच नाही  ज्या चिरेखाणीत बुडून मुलांचा मृत्यू झाला ती खाण सर्वे नंबर 186 मध्ये आहे. शिवाय ती 2012 पासून बंद आहे. तत्पुर्वी अनेक वर्षे त्यातून जांभा दगड काढलेही होते; मात्र त्या खाणीची नोंदच महसूल विभागाकडे नाही. त्यामुळे ती अनेक वर्षे महसूलच्या आशीर्वादाने बेकायदेशीररित्या सुरु होती हे सिद्ध झाले.  फेरपंचनाम्याची मागणी  संबंधित तलाठी श्रीमती मयेकर-परब यांनी केलेला पंचनामा वाचण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरल्यावर तो मंडळ अधिकारी राजन गवस यांनी वाचून दाखवला. त्या पंचनाम्यात खाणीची खोली, रुंदी, लांबी, क्षेत्र याची नोंद करण्यात नव्हती. त्यावर आक्षेप घेत फेरपंचनामा करण्याची मागणी केली गेली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

दोडामार्गचे महसूल अधिकारी धारेवर  दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वझरे येथे बंद चिरेखाणीतील पाण्यात बुडून दोघा भावंडांच्या मृत्यूप्रकरणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी केलेल्या प्रश्‍नांच्या सरबत्तीला कर्मचारी उत्तर देवू शकले नाही; मात्र प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी बंद खाणीभोवती कुंपण करण्याची आणि त्या बुजविण्याची जबाबदारी खाणमालकाची आहे आणि त्यांनी त्या अटी शर्ती पाळल्या की नाही हे पाहण्याची जबाबदारी तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदारांची असल्याचे मान्य केले. या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचेही कबूल केले.  यावेळी त्या मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. उघड्या खाणी बुजविणे, महसूलकडून आर्थिक मदत देणे आणि संबंधितांवर कारवाई करणे याबाबत 15 दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. वझरे धनगरवाडी येथील धोंडीराम भगवान जंगले (वय 7) व नागू विठ्ठल जंगले (वय 6) या भावंडांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी आणि नियमांची पायमल्ली करुन सुरु असणाऱ्या खाणी बंद करुन दोषी खाणमालक व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्याची प्रत तहसीलदारांना देऊन सर्वांनी चर्चा केली. श्री. कर्पे यांनी माहिती देण्यासाठी नायब तहसीलदार एन. एन. देसाई, मंडळ अधिकारी राजन गवस, आयी तलाठी श्रीमती पाटील, वझरे तलाठी श्रीमती परब-मयेकर यांना बोलावले. दोन्ही तलाठी एकदम मागे थांबल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा-पुन्हा मागे वळून बोलावे लागे. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना समोर येऊन बोला, असे सांगितले; मात्र श्री. कर्पे यांनी त्या काय आरोपी आहेत काय, बोलू द्या तिथून असे उत्तर दिले. त्या खाणीबाबत आपल्याकडे काहीही रेकॉर्ड नाही, असे श्रीमती परब-मयेकर म्हणाल्या तर श्री. देसाई यांनी आपल्याकडे रेकॉर्ड आहे सांगितले. रेकॉर्ड असेल तर उत्खनन करणारा व्यावसायिक कोण? असे विचारताच त्याचे उत्तर देणे मात्र सर्वांनीच टाळले. तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नझिर शेख, जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, व्हीजेएनटी सेलचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष संदेश वरक, दीपक जाधव, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  चिरेखाणीची नोंदच नाही  ज्या चिरेखाणीत बुडून मुलांचा मृत्यू झाला ती खाण सर्वे नंबर 186 मध्ये आहे. शिवाय ती 2012 पासून बंद आहे. तत्पुर्वी अनेक वर्षे त्यातून जांभा दगड काढलेही होते; मात्र त्या खाणीची नोंदच महसूल विभागाकडे नाही. त्यामुळे ती अनेक वर्षे महसूलच्या आशीर्वादाने बेकायदेशीररित्या सुरु होती हे सिद्ध झाले.  फेरपंचनाम्याची मागणी  संबंधित तलाठी श्रीमती मयेकर-परब यांनी केलेला पंचनामा वाचण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरल्यावर तो मंडळ अधिकारी राजन गवस यांनी वाचून दाखवला. त्या पंचनाम्यात खाणीची खोली, रुंदी, लांबी, क्षेत्र याची नोंद करण्यात नव्हती. त्यावर आक्षेप घेत फेरपंचनामा करण्याची मागणी केली गेली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36LRjmO

No comments:

Post a Comment