घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते?  औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही.  वाहनचालक परवाना  वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहनाचे कागदपत्र  विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो.  मद्य प्राशन केले असेल तर...  अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. खासगी वाहन, व्यावसायिक वापर  वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते.    वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो.  -ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ  (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 29, 2020

घ्या जाणून ! वाहन विमा कंपनी क्लेम का फेटाळते?  औरंगाबाद : वाहनाचा विमा उतरवला म्हणजे तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. कारण विमा कंपनीने अनेक हक्क राखून ठेवलेले असतात. काही हक्क कायदेशीर पद्धतीने विमा कंपनीला मिळालेले आहेत. त्यामुळेच वाहनचालक, मालकाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यात कसूर झाला तर विमा कंपनी तुमचा दावा फेटाळून लावू शकते. दावा केवळ वाहनापुरता असेल तर ठीक; पण मृत्यूचा दावा असेल तर मात्र आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते हे समजून घेण्याची गरज आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वाहनाचा विमा वेळेत नोंदवणे ही चांगली बाब आहे. मात्र, वैध विमा असला म्हणजे झाले असे नाही. त्याच्या जोडीला वैध वाहन परवाना, वाहनाचे वैध कागदपत्र आणि वाहनाची योग्य परिस्थिती (फिटनेस) अशा अनेक बाबा महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय विमा कंपनी क्लेम मंजूर करतच नाही.  वाहनचालक परवाना  वाहनाचा विमा असला तरीही योग्य आणि वैध वाहन परवाना आवश्यक असतो. वाहनाच्या अपघाताच्या वेळी चालकाजवळ योग्य परवाना आवश्यक आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर टीआर, फोर व्हीलर एलएमव्ही, फोर व्हीलर टीआर, अवजड वाहतूक ट्रान्स व अन्य अशा विविध प्रकारचे परवाने असतात. चालकाजवळ यातील योग्य आणि वैध परवाना (वेळीच नूतनीकरण केलेला) आवश्यक असतो. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा कंपनी वैध विमा असतानाही दावा फेटाळून लावते. त्यामुळे वेळेत वाहन परवाना नूतनीकरण करा.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहनाचे कागदपत्र  विमा दावा करताना वैध वाहनचालक परवाना, वैध विमा प्रमाणपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, वैध कर प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), परिवहन वाहनासाठी वैध परवाना, परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्वेयरचा रिपोर्ट आवश्यक आहे. यातील कुठलीही त्रुटी असेल तर विमा क्लेम नाकारला जातो.  मद्य प्राशन केले असेल तर...  अपघाताच्या वेळी चालकाने मद्य प्राशन केलेले असेल तर विमा कंपनीला दावा फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारात कुठलेही न्यायालय तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. अपघातानंतर चालक अथवा प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर रुग्णालय ही माहिती पोलिसांना देते. दारूचा अंमल रेकॉर्डवर आल्यानंतर विमा कंपनी दावा फेटाळून लावते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. खासगी वाहन, व्यावसायिक वापर  वैयक्तिक खासगी वापराचे वाहन (पांढरी पाटी) व्यावसायिक कामासाठी (पिवळी पाटी) वापरता येत नाही. जर तुम्ही तसे केले आणि गाडीला अपघात झाला तर विमा कंपनी तुमचे दावे फेटाळून लावेल. तसेच ओव्हरशीट असेल तरीही कंपनी दावा फेटाळून लावते.    वाहनाचा उपयोग नियमाप्रमाणे होत नसल्यास आणि वैध योग्य परवाना, कागदपत्र नसले तर किंवा ओव्हरशीट, मद्यप्राशन करून वाहन चालवणे यामुळे दावा फेटाळला जाऊ शकतो; मात्र त्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो.  -ॲड. संदेशकुमार शिंदे, मोटार अपघात दावे तज्ज्ञ  (संपादन-प्रताप अवचार)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jgFite

No comments:

Post a Comment