औरंगाबादेतील विदारक चित्र : व्यापाऱ्यांकडे आँक्सीमिटर तर नाहीच, सॅनिटायझरही दिसेना.   औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊननंतर चार दिवस व्यापाऱ्यांना दमबाजी करणाऱ्या प्रशासनाला आता मात्र विसर पडला आहे. बाजारपेठेत ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. दुसरीकडे नागरिक बिनधास्त विनामास्क फिरत आहेत. दुकानदारांकडे ऑक्सिमीटर तर नाहीच मात्र सॅनिटायझर दिसेनासे झाले आहे. गर्दी होत असताना दुकानदार गर्दीचे नियोजन करत नाही. विशेष म्हणजे आता प्रशासनालाही त्याचे देणेघेणे नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात १० ते १८ जुलै दरम्यान कडक लॉकडाउन करण्यात आला. या काळात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केल्याने गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी उगारलेला हा बडगा नागरिकांनी निमूटपणे सहन केला. लॉकडाउननंतर दुकानदारांवर बंधने घालण्यात आले. सॅनिटायझर, ऑक्सिमीटरची सक्ती करण्यात आली. दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी यासाठी मनपा आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली ती कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्यही होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली झाली होती. मात्र आता प्रशासनानेच डोळेझाक सुरु केल्याने नागरी आणि व्यापारीही दुर्लक्ष करत आहेत.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. प्रशासन झाले बेफिकीर  शहराच्या विविध भागातील चौकांमध्ये भाजी विक्रते, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या दुर-दूर उभ्या राहणे आवश्यक असताना त्या जवळ जवळ गर्दी होईल अशा पद्धतीने उभ्या राहत आहेत. अशा गाड्यांभोवती नागरिकही गर्दी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या विक्रेत्यांना किंवा नागरिकांना जाणीव करून देण्याची गरज मनपा अथवा पोलिस प्रशासनाला वाटत नाही. कोरोना संसर्ग वाढीस मदत करणारी गर्दी दिसत असतानाही महापालिका कर्मचारी किंवा पोलिस त्यांना रोखत नाही.  प्रबोधनावर हवाय भर  कोरोनाबरोबर भविष्यात जगावे लागणार आहे. म्हणूनच कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या विविध उपायांमध्ये फिजिकल डिस्टन्स हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले जात आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर मनपा प्रशासनानेही विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या मदतीने जाहिरातींवर भर देता येऊ शकतो मात्र त्यासाठी प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. जाणीव जागृतीची गरज  शहरात कुठेही म्हणजे जिथे जिथे गर्दी होते अशा ठिकाणी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी थेट कारवाया सुरू केल्या तरच लोकांमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी कारवाईची भीती निर्माण होऊन शिस्त लागू शकते. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी आणि संबंधित मनपा झोन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालताना दुकानदारांना वेळोवेळी जाणीव करुन देण्याची गरज आहे. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 9, 2020

औरंगाबादेतील विदारक चित्र : व्यापाऱ्यांकडे आँक्सीमिटर तर नाहीच, सॅनिटायझरही दिसेना.   औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊननंतर चार दिवस व्यापाऱ्यांना दमबाजी करणाऱ्या प्रशासनाला आता मात्र विसर पडला आहे. बाजारपेठेत ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. दुसरीकडे नागरिक बिनधास्त विनामास्क फिरत आहेत. दुकानदारांकडे ऑक्सिमीटर तर नाहीच मात्र सॅनिटायझर दिसेनासे झाले आहे. गर्दी होत असताना दुकानदार गर्दीचे नियोजन करत नाही. विशेष म्हणजे आता प्रशासनालाही त्याचे देणेघेणे नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात १० ते १८ जुलै दरम्यान कडक लॉकडाउन करण्यात आला. या काळात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केल्याने गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी उगारलेला हा बडगा नागरिकांनी निमूटपणे सहन केला. लॉकडाउननंतर दुकानदारांवर बंधने घालण्यात आले. सॅनिटायझर, ऑक्सिमीटरची सक्ती करण्यात आली. दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी यासाठी मनपा आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली ती कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्यही होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली झाली होती. मात्र आता प्रशासनानेच डोळेझाक सुरु केल्याने नागरी आणि व्यापारीही दुर्लक्ष करत आहेत.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. प्रशासन झाले बेफिकीर  शहराच्या विविध भागातील चौकांमध्ये भाजी विक्रते, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या दुर-दूर उभ्या राहणे आवश्यक असताना त्या जवळ जवळ गर्दी होईल अशा पद्धतीने उभ्या राहत आहेत. अशा गाड्यांभोवती नागरिकही गर्दी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या विक्रेत्यांना किंवा नागरिकांना जाणीव करून देण्याची गरज मनपा अथवा पोलिस प्रशासनाला वाटत नाही. कोरोना संसर्ग वाढीस मदत करणारी गर्दी दिसत असतानाही महापालिका कर्मचारी किंवा पोलिस त्यांना रोखत नाही.  प्रबोधनावर हवाय भर  कोरोनाबरोबर भविष्यात जगावे लागणार आहे. म्हणूनच कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या विविध उपायांमध्ये फिजिकल डिस्टन्स हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले जात आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर मनपा प्रशासनानेही विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या मदतीने जाहिरातींवर भर देता येऊ शकतो मात्र त्यासाठी प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. जाणीव जागृतीची गरज  शहरात कुठेही म्हणजे जिथे जिथे गर्दी होते अशा ठिकाणी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी थेट कारवाया सुरू केल्या तरच लोकांमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी कारवाईची भीती निर्माण होऊन शिस्त लागू शकते. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी आणि संबंधित मनपा झोन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालताना दुकानदारांना वेळोवेळी जाणीव करुन देण्याची गरज आहे. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35kKFmT

No comments:

Post a Comment