अपघाताच्या धोक्यापेक्षा वाहनाचा विमाही ठरू शकतो अधिक धोकादायक ! औरंगाबाद : वाहनांचा विमा ही कायदेशीर बाब आहे. वाहनांच्या विम्याचे विविध प्रकार आहेत. कुठल्या प्रकारातील विमा उतरवला त्यानुसार विमा क्लेम दिला जातो. यामध्ये मृत्यूचे दावे तसेच ओन ॲण्ड डॅमेजेसचा समावेश आहे. वाहनाचा विमा उतरवताना अत्यंत जागरूक असले पाहिजे, आणि नियम अटी समजून घेतल्या पाहिजेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! मोटार वाहन विमा  मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्यामुळे अपघाताच्या धोक्यापासून काही प्रमाणात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. विमा नसलेले वाहन चालविणे हे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. विमा संरक्षण नसलेले वाहन चालविणे किंवा चालवू देणे या दोन्ही प्रकारात अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. विशेष म्हणजे हे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे.  अपघातग्रस्ताला भरपाईची तरतूद  मोटार वाहन कायद्याच्या कलम १४० मधील तरतुदीनुसार कुठलीही चूक नसल्याचा दावा करीत रस्ते अपघातग्रस्त झालेली कुठलीही व्यक्ती नुकसान भरपाई प्राप्त करू शकते. तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १६३ नुसार धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनांमुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीतही भरपाई देण्याची तरतूद आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहन विम्याचे प्रकार  व्यापक विमा (फुल्ल इन्शुरन्स) : मोटर वाहनासाठी ही सर्वाधिक महागडी पॉलिसी आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच तृतीय पक्षाचा (थर्ड पार्टी) समावेश आहे. या पॉलिसीला प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे आवश्यक आहे. ही पॉलिसी वैधता संपण्याच्या दोन महिन्याच्या आत भारतात कोठेही नूतनीकरण करता येऊ शकते. वाहनाचा मालक बदलल्यास संबंधित विमा कंपनीकडे अर्ज करून विम्याचे हस्तांतरण करता येऊ शकते.  तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी तथा टीपीए)  थर्ड पार्टी या विमा प्रकारात केवळ त्रयस्थ व्यक्तीला (थर्ड पार्टी) झालेल्या नुकसानीच्या संरक्षणाचा समावेश आहे. वैयक्तिक किंवा तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाचा यात समावेश नाही. असे असले तरीही काही कंपन्या थोडासा अधिक प्रिमियम घेऊन तुमचा वैयक्तीक (वाहनाचा नाही) विमा देण्याची तयारी दर्शवतात. या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. वाहनाचा मालक बदलल्यास थर्ड पार्टी विम्याचे हस्तांतरण आपोआप होते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुचाकीचाही विमा  दुचाकी वाहनांसाठी व्यापक विमा (फुल्ल इन्शुरन्स) काढता येतो. याला प्रत्येक वर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. तर थर्ड पार्टी विमा दुचाकी वाहनाच्या मुदतीपर्यंतही काढता येऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेल्या विमा पॉलीसीपैकी ही सर्वांत स्वस्त पॉलिसी आहे. पॉलिसी संपण्याच्या दोन महिन्यांच्या अगोदर या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 24, 2020

अपघाताच्या धोक्यापेक्षा वाहनाचा विमाही ठरू शकतो अधिक धोकादायक ! औरंगाबाद : वाहनांचा विमा ही कायदेशीर बाब आहे. वाहनांच्या विम्याचे विविध प्रकार आहेत. कुठल्या प्रकारातील विमा उतरवला त्यानुसार विमा क्लेम दिला जातो. यामध्ये मृत्यूचे दावे तसेच ओन ॲण्ड डॅमेजेसचा समावेश आहे. वाहनाचा विमा उतरवताना अत्यंत जागरूक असले पाहिजे, आणि नियम अटी समजून घेतल्या पाहिजेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! मोटार वाहन विमा  मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १४६ आणि १४७ अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्यामुळे अपघाताच्या धोक्यापासून काही प्रमाणात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. विमा नसलेले वाहन चालविणे हे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. विमा संरक्षण नसलेले वाहन चालविणे किंवा चालवू देणे या दोन्ही प्रकारात अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. विशेष म्हणजे हे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे.  अपघातग्रस्ताला भरपाईची तरतूद  मोटार वाहन कायद्याच्या कलम १४० मधील तरतुदीनुसार कुठलीही चूक नसल्याचा दावा करीत रस्ते अपघातग्रस्त झालेली कुठलीही व्यक्ती नुकसान भरपाई प्राप्त करू शकते. तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १६३ नुसार धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनांमुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीतही भरपाई देण्याची तरतूद आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वाहन विम्याचे प्रकार  व्यापक विमा (फुल्ल इन्शुरन्स) : मोटर वाहनासाठी ही सर्वाधिक महागडी पॉलिसी आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच तृतीय पक्षाचा (थर्ड पार्टी) समावेश आहे. या पॉलिसीला प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे आवश्यक आहे. ही पॉलिसी वैधता संपण्याच्या दोन महिन्याच्या आत भारतात कोठेही नूतनीकरण करता येऊ शकते. वाहनाचा मालक बदलल्यास संबंधित विमा कंपनीकडे अर्ज करून विम्याचे हस्तांतरण करता येऊ शकते.  तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी तथा टीपीए)  थर्ड पार्टी या विमा प्रकारात केवळ त्रयस्थ व्यक्तीला (थर्ड पार्टी) झालेल्या नुकसानीच्या संरक्षणाचा समावेश आहे. वैयक्तिक किंवा तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाचा यात समावेश नाही. असे असले तरीही काही कंपन्या थोडासा अधिक प्रिमियम घेऊन तुमचा वैयक्तीक (वाहनाचा नाही) विमा देण्याची तयारी दर्शवतात. या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. वाहनाचा मालक बदलल्यास थर्ड पार्टी विम्याचे हस्तांतरण आपोआप होते.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुचाकीचाही विमा  दुचाकी वाहनांसाठी व्यापक विमा (फुल्ल इन्शुरन्स) काढता येतो. याला प्रत्येक वर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. तर थर्ड पार्टी विमा दुचाकी वाहनाच्या मुदतीपर्यंतही काढता येऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेल्या विमा पॉलीसीपैकी ही सर्वांत स्वस्त पॉलिसी आहे. पॉलिसी संपण्याच्या दोन महिन्यांच्या अगोदर या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kLWPKe

No comments:

Post a Comment