वित्त विभागाच्या सुस्तीने कर्मचाऱ्यांवर दंडाचा भुर्दण्ड नागपूर : मनपाच्या वित्त विभागाची रुळावर आलेली गाडी पुन्हा घसरली असून कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने सुरू झाले. वेतनातून कर्मचाऱ्यांचे विमा तसेच कर्जाच्या हप्त्याची कपात करण्यात आली. परंतु अद्यापही धनादेश न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर विमा कंपनीच्या दंडाचा भुर्दण्ड बसणार आहे. एवढेच नव्हे कर्जाच्या हप्ता वेळेवर पोहोचत नसल्याने बॅंकाकडूनही व्याज आकारले जात आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या बडग्यामुळे अनेक वर्षांनी शिस्तीत आलेल्या वित्त विभाग आता पुन्हा सुस्त झाल्याचा फटका महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. मुंढे यांची बदली होताच वित्त विभाग पुन्हा जुन्याच कासवगतीवर आल्याचे गेल्या महिन्यात तसेच या महिन्यात विलंबाने झालेल्या वेतनावरून दिसून येत आहे. विविध विभागाने वेतनासंबंधी सर्व कार्यवाही वेळेवर केल्यानंतरही या महिन्यात २० तारखेनंतर वेतन झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नमूद केले. वित्त विभागाने सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विमा हप्त्याची कपात केली. जेवढ्या रकमेच्या विमा हप्त्याची कपात केली, तेवढ्या रकमेचा धनादेश कर्मचाऱ्यांना देण्याचा नियम आहे. विमा हप्त्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी हा धनादेश कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. उद्योगातील ऑक्सिजनमध्ये होणार आणखी कपात  परंतु अद्यापही हा धनादेश न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर विमा हप्त्याचा विलंब शुल्काचा भुर्दण्ड बसणार आहे. काही कर्मचाऱ्यांना घेतलेल्या कर्जाबाबतही हीच स्थिती असून बॅंकेचे व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी वित्त विभागातील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आयुक्तांचेही दुर्लक्ष वित्त विभागातील प्रमुख वित्त व लेखा अधिकारी महिन्यातून अनेक दिवस गैरहजर असतात. उपस्थित असले तरी कक्षात दिसून येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत वेळेवर होणारे वेतन विलंबाने होत आहे. याबाबत आयुक्तही वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 24, 2020

वित्त विभागाच्या सुस्तीने कर्मचाऱ्यांवर दंडाचा भुर्दण्ड नागपूर : मनपाच्या वित्त विभागाची रुळावर आलेली गाडी पुन्हा घसरली असून कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने सुरू झाले. वेतनातून कर्मचाऱ्यांचे विमा तसेच कर्जाच्या हप्त्याची कपात करण्यात आली. परंतु अद्यापही धनादेश न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर विमा कंपनीच्या दंडाचा भुर्दण्ड बसणार आहे. एवढेच नव्हे कर्जाच्या हप्ता वेळेवर पोहोचत नसल्याने बॅंकाकडूनही व्याज आकारले जात आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या बडग्यामुळे अनेक वर्षांनी शिस्तीत आलेल्या वित्त विभाग आता पुन्हा सुस्त झाल्याचा फटका महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. मुंढे यांची बदली होताच वित्त विभाग पुन्हा जुन्याच कासवगतीवर आल्याचे गेल्या महिन्यात तसेच या महिन्यात विलंबाने झालेल्या वेतनावरून दिसून येत आहे. विविध विभागाने वेतनासंबंधी सर्व कार्यवाही वेळेवर केल्यानंतरही या महिन्यात २० तारखेनंतर वेतन झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नमूद केले. वित्त विभागाने सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विमा हप्त्याची कपात केली. जेवढ्या रकमेच्या विमा हप्त्याची कपात केली, तेवढ्या रकमेचा धनादेश कर्मचाऱ्यांना देण्याचा नियम आहे. विमा हप्त्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी हा धनादेश कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. उद्योगातील ऑक्सिजनमध्ये होणार आणखी कपात  परंतु अद्यापही हा धनादेश न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर विमा हप्त्याचा विलंब शुल्काचा भुर्दण्ड बसणार आहे. काही कर्मचाऱ्यांना घेतलेल्या कर्जाबाबतही हीच स्थिती असून बॅंकेचे व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी वित्त विभागातील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आयुक्तांचेही दुर्लक्ष वित्त विभागातील प्रमुख वित्त व लेखा अधिकारी महिन्यातून अनेक दिवस गैरहजर असतात. उपस्थित असले तरी कक्षात दिसून येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत वेळेवर होणारे वेतन विलंबाने होत आहे. याबाबत आयुक्तही वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cswDkE

No comments:

Post a Comment