मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे. "टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही. पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले.  ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते. महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो. mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 28, 2020

मुंबईच्या तटांवर पसरतेय रोगराई, कांदळवनांवर "हायब्लिया प्युएरा" रोगाचे थैमान मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली आहे. "टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले आहे. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकली आहेत. यामुळे सर्व पाने सुकून गेली असून खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात आहे. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना काहीही बाधा झालेली नाही. पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर नंतर या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोहोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून गेल्यानंतर झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच टवटवीत होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला आहे. मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले.  ठाणे, नवी मुंबईसह शिवडी, माहीममधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. मात्र या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे शिवडी,माहीम खाडीत या अळ्यांचा प्रादुर्भाव अद्याप झाला नसल्याचे दिसते. महत्त्वाची बातमी : राज्यात लवकरच रेस्टॉरंट सुरु होण्याची चिन्ह, मार्गदर्शक तत्व अंतिम झाल्यावर निर्णय टीग डीफॉलिएटर, हायब्लिया प्यूएरा हा दक्षिण-पूर्व आशियातील पतंग आहे. पीटर क्रेमर यांनी पहिल्यांदा त्याचे वर्णन केले होते. ही प्रजाती नुकतीच मध्य अमेरिका आणि आफ्रिकेतही आढळली आहेत.हा पतंग कांदळवन, सुरवंट, सागवान व इतर झाडांवर पोसतो. हा जगभरातील सागवानांच्या कीटकांपैकी एक मानला जातो. mangrove jungle around mumbai and thane are facing threat of hyblia puera News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30bKRld

No comments:

Post a Comment